सोमवार, २१ डिसेंबर, २०१५

बाजीराव-मस्तानी


बाजीराव-मस्तानी

बाजीराव मस्तानी या दोघांवर सोशल साईट्सवर इतकी चर्चा घडलेली आहे कि या सिनेमाचा इतिहासाशी, ब्राह्मणांशी संबंध हे सोडून फक्त एक कलाकृती म्हणून याच एनालिसिस होण कठीण वाटते आहे पण तरीही संजय लीला भन्साळीला या अप्रतिम कलाकृतीबद्दल श्रेय हे विरोधकही देतील याचा भरवसा वाटतो. 

बाजीराव पेशवे हे शूर योद्धे होते हे मान्य पण त्यांच्याबद्दल महाराष्ट्राबाहेर त्यांचा उल्लेख शूर म्हणून न होता मस्तानी प्रकरणामुळे होतो. मी स्वत: गुजरात मध्ये काही वर्ष काढलेली आहेत आणि हे अनुभवलेलं आहे. त्यांची ब्राह्मण जात आणि मस्तानी या दोन गोष्टींचा उल्लेख त्यांच्या शुरत्वावर कडी करतो हे मी बघितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी संजय लीला भन्साळी यांचे या मराठी मानसिकतेला अवघड विषयाला हात घातल्याबद्दल कौतुक कारण त्यांनी पूर्ण सिनेमात बाजीरावांचे  मस्तानीवर प्रेम होते ती त्यांची रखेल-अंगवस्त्र नव्हती  या वास्तविकतेवर भन्साळींनी फोकस केलेला आहे. बाजीरावांची मस्तानीशी झालेली पहिली भेट इथपासून सुरवात करून त्यांचे रंगलेले प्रेम इत्यादी अवघड विषयाला अप्रतिमरीत्या भन्साळीने हाताळलेल आहे.

बाजीराव पेशवे यांची झालेली मस्तानी या नर्तकीशी भेट अन त्या मस्तानीला तिच्या वडलांनी बाजीरावांना  केलेले नजर. तिचा पुण्यात/त्यांच्या घरात प्रवेश आणि शेवटी दोघांचाही झालेला (वेगवेगळा) मृत्यू या धाग्याभोवती विविध अंगाने फुलणारी कहाणी म्हणजे बाजीराव-मस्तानी.नागनाथ इनामदार यांच्या "राऊ" या पुस्तकावर बेतलेली कहाणी असा उल्लेख पहिल्यांदाच आहे. मला अपेक्षा होती कि आधी घडलेला गदारोळ बघता भन्साळी "काल्पनिक कथा वास्तविकतेशी संबंध नाही" अशी सूचना आधी देईल. पण तसे काहीही घडले नाही.

काशीबाई साहेबांचा या कहाणीत आपोआप प्रवेश होतो कारण त्या श्रीमंतांच्या प्रथम पत्नी. त्यांचे आगमन कथेत झालावरही कथा मस्तानी आणि मस्तानीवर भाळलेला बाजीराव अशी न झुकता बाजीरावांचे शौर्य या गोष्टींवर फोकस करते या साठी भन्साळीचे खरोखर कौतुक.

बाजीरावांनी अवघ्या चाळीस वर्षांच्या जीवनात जवळपास सगळ्या प्रकारचे युद्धकौशल्य आत्मसात केले होते. मैदानी युद्धकलांत तर ते निपुण होतेच पण राजकारणी बाजूनेहि ते तरबेज होते. कथेत ओझरताच उल्लेख असला तरी निजामावर त्यांनी मिळवलेला विजय हा  त्यांच्या कुटनिति अन कावेबाज डावपेचात्मक राजकारणाचा अप्रतीम नमुना होता/आहे, अगदी फिरंग्यांनी त्यांच्या केम्ब्रिज विद्यापीठात अभ्यासण्याइतका. असल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला पडद्यावर उभे करणे हि  निश्चितच एक  कठीण गोष्ट होती. पण रणवीर सिंग कदाचित त्याच्या आतापर्यंतच्या अभिनयात्मक कारकिर्दीतील अप्रतिम कामगिरी यात करून गेलाय. मस्तानीच्या प्रेमात पडलेला पण स्त्रीलंपट नसलेला अशी त्यांची योग्य अशी प्रतिमा रणवीर सिंग मुळे निर्माण होण्यास मदत होईल हे नक्की.

मस्तानीच्या भूमिकेत आहे दीपिका पदुकोण. मस्तानी हि रखेल नव्हती पण तिचा आणि श्रीमंतांचा विवाह झालेला होता असा उल्लेख भन्साळीला कदाचित इतिहासात सापडला नसावा. कारण त्या दोघांचा विवाह झाल्याच्या उल्लेख/प्रसंग सिनेमात नाही. पण श्रीमंत ज्या व्यक्तिमत्वावर भाळले असतील असे व्यक्तिमत्व पडद्यावर उभे करण्यात मात्र दीपिका पदुकोण यशस्वी होते हे नक्की. आपल्या सौंदर्याचा अभिमान असलेली एक स्त्री, युद्धकलानिपुण पण श्रीमंतांच्या रूपावर/व्यक्तिमत्वावर भाळलेली स्त्री उभे करणे हे एक कठीण काम होते, नानासाहेबांचे व्यक्तिमत्व कथेत आल्यावर त्यांच्या रूपाने त्यांच्यासकट सगळ्या पेशवे घराण्याचा विरोध सहन करताना श्रीमंतांवर  असलेली  निष्ठा  डळमळीत न होऊ देणारी स्त्री असल्या छटा फक्त तीन तासांत एका अभिनेत्याने पडद्यावर उभ्या करणे हे किचकट काम होते. पण दीपिका पुरून उरली दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर हे नक्की.  

काशीबाई राणीसाहेबांच्या   भूमिकेत आहेत प्रियंका चोप्रा. काशीबाईंची भूमिकाही एक कठीण भूमिका होती. घरात नवर्याला होत असलेला विरोध कमी करण्याचा प्रयत्न करत नवर्याच्या चुका पोटात घालून त्याला तोलामोलाची साथ देणारी एक कुलीन भार्या प्रियंकाने शब्दश: पडद्यावर उभी केलेली आहे. मस्तानीला समजून घेणारी पण तिने तिच्या मोठ्या बहिणीचा दर्जा देताच त्या दर्जाला नाकारणारी अन फक्त पतीपेमाने तुला आपलंस करते आहे हे तिला जाणवून देणारी राणी अप्रतिम रित्या प्रियंकाने उभी केलेली आहे.       

पिंगा अन मल्हारी या गाण्याला विविध कारणाने विरोध झाला. या गाण्यामुळे प्रतिमा खालावतेय या अन अश्या आशयाच्या पतिक्रिया मी तथाकथित पेशव्यांच्या वंशजांकडून वाहिन्यांवर बघितल्या. हे दोन गाणे अन माननीय काशीबाई साहेबांची प्रतिमा उभारण्यात दिग्दर्शकाने घेतलेली cinematic लिबर्टी आपण दुर्लक्षित करू पण तीन तासांची एक अप्रतिम ऐतिहासिक कथा विनादोष निर्माण करण्यात संजय लीला भन्साळी हे यशस्वी झालेत याचा आनंद होऊन मी चित्रपट ४१/२* (साडेचार) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर                     


रविवार, ६ डिसेंबर, २०१५

उर्फी-मराठी चित्रपट


लेखक-दिग्दर्शक विक्रम प्रधान हे प्रथमेश परब (आपला टाईमपास मधला दगडू)  आणि नवीन तारका मिताली मयेकर यांना नवीन चित्रपटात घेऊन आले आहेत. मराठी चित्रपटाचा जीव म्हणजे "प्रेम" तर यात आहेच पण या बरोबरच मैत्री, कुंभमेळा आणि दहशवाद असल्या पूर्णपणे विरुद्ध कोनी विषयांना हा चित्रपट स्पर्श करतो. प्रयत्न चांगला असला तरी प्रेक्षक कितपत स्वीकारतात हे बघणेबल राहील.
विक्रम प्रधान किंवा स्वत: प्रथमेश परब या दोघांपैकी कुणीतरी किंवा दोघेही अजूनही "दगडू" या व्यक्तिरेखेच्या अमलाखालीच असावेत असे वाटते. या चित्रपटातली 'देवा' ची एन्ट्री पासूनच अनेक प्रसंगात दगडूची छाप व्यक्तिरेखेवर अनेकदा जाणवते. दगडू हा जसा टपोरी टाईपचा असामी होता आणि एका ब्राह्मण मुलीच्या प्रेमात पडून तिला गटवतो असली कहाणी टाईमपास १ आणि २ मध्ये होती आणि अप्रतिम दिग्दर्शन-अभिनय आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे संगीत या पुंजीवर तगून गेली. पण हि किंवा असली कहाणी दर वेळेस प्रथमेश परब सोबत चालून जाइल या गैरसमजाला काय म्हणावं? तरी इथे स्पष्ट उल्लेख कसलाच नाही पण अंगुलीनिर्देश तसल्या प्रकारच्या कहाणीकडे आहे हे कविता लाड आणि मिलिंद पाठक यांच्या व्यक्तिरेखा अनेकदा प्रेक्षकांना जाणवून देतात. अभिनयासाठी उपेंद्र लिमयेंच्या ए सी पी कुलकर्णी या व्यक्तिरेखेचा उल्लेख करावाच लागेल कारण त्यांनी अगदी दमदारपणे एक ATS अधिकारी उभा केलेला आहे जो शून्यातून कथेच्या मूळ कारणाशी पोचतो. भलेही शेवट जरा दुखान्त या सदरात मोडत असला तरी तेथेही प्रेक्षकांची सहानुभूती हि देव म्हणजे मुख्य व्यक्तिरेखेला मिळायला हवी पण घेऊन जातात उपेंद्र लिमये.
मिताली मयेकरचा हा पहिलाच चित्रपट आणि तिला प्रत्येक गोष्टीत लेखक-दिग्दर्शक विक्रम प्रधान यांनी इतक्यांदा महत्व दिलेले आहे कि ती कहाणीत नसताना पटकथेचा तोल जातो व कहाणीच भरकटण्याची शक्यता निर्माण होते. यात कोणताही हेतू नसावा हे स्पष्ट आहे पण अजाणतेपणी अस घडलंय खर. देवाची आणि अमृताची जोडी जमणे अन तुटणे या आणि इतक्याच हेतूत कुंभमेळा-दहशतवाद झालंच तर धर्मोल्लेख असल्या अनेक बाबींना विक्रम प्रधान हे स्पर्श करतात. या मागे कथा पुढे जावी इतकाच हेतू असला तरीही इतक्या चित्रविचित्र बाबींचे परस्परसंबंध दाखवताना किंवा चितारताना असे म्हणू विक्रम प्रधान हे शब्दश: अपयशी ठरलेत. या अपयशामागे इतर काहीही नसून चित्रविचित्र बाबींना स्पर्शण्यात सुटलेली कथेवरची पकड इतकेच एक कारण आहे. चिनार-महेश या संगीतकार जोडगोळीचा टाईमपास १ नंतरचा एक उत्तम प्रयत्न असा उर्फिचा उल्लेख करावाच लागेल.  
अभिनयात आधीच उल्लेखल्याप्रमाणे दगडू अका प्रथमेश परब आणि अमृता (मिताली मयेकर) या दोघांनीही आपापल्या भूमिकेसोबत पूर्ण न्याय केलेला आहे. मिताली मयेकर चा स्क्रीन प्रेझेन्स हा सुखावह  वाटतो. इशकझादे मधल्या परिणीती चोप्राची आठवण करून देते ती कित्येकदा. कारण तो हि अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट असला तरी तिला मुख्य बिंदूपाशी ठेवून तिच्या सभोवती पूर्ण कथा चित्रपटाची फिरली होती इशकझादेत. यशराजचा तो एक माइलस्टोन अशी त्याची ओळख आज असली तरी त्या यशात तिचा सहभाग हा सर्वोच्च होता. हि तुलना करावीशी वाटली कारण अमृताच्या व्यक्तिरेखेलाहि दिग्दर्शकाने तसेच अतिमहत्व दिलेले आहे. इतके कि तिच्या अपघातानंतर कहाणीवरची पकड सुटण्याइतकी ढिली पडते!!  
उर्फी हे टायटल का तर नाशिकचा कुंभमेळा अन त्या अनुषंगाने कथेत आलेला एक दहशतवादी हल्ला. त्यात जर मुख्य अभिनेत्याचा समावेश लेखकाला करायचा होता तर आधी त्याचा थोडातरी सहभाग प्रेक्षकांना पाटण्यासारखा दाखवायला नको?? एकदम त्याला आणून काय ते विशद करायला हा हिंदी सिनेमा आहे का? असले अनेक प्रश्न प्रेक्षकांसाठी विक्रम प्रधान सोडतात. याचे उत्तर बघणारे मराठी प्रेक्षक  कितपत शोधतात  हे बघण्यासारखे असेल
मिताली मयेकर ची मराठी चित्रपटातली एन्ट्री आश्वासक रित्या झालेली आहे. हि कथाच कदाचित तशी असल्यामुळे वाटत असावं कि काय हे नंतर तिच्या पुढील चित्रपटातून  कळेलच पण तिच्यासाठी आणि उपेंद्र लिमयेसाठी  मी चित्रपटाला 1* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा. 

-समीर

सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

तमाशा

तमाशा

दिग्दर्शक इम्तियाज आली हे आजच्या जमान्यातील पडद्यावर अन पडद्या बाहेर दोन्ही कडे (वेगवेगळी/एकत्र) गाजणारी जोडी रणबीर कपूर -दीपिका पादुकोण ला घेऊन हा नवीन सिनेमा घेऊन आलेले आहेत.लेखक देखील तेच आल्यामुळे या प्रयत्नाच्या प्रेक्षकांना वाटणाऱ्या सगळ्या यश-अपयशाचे धनी तेच एकटेच.

"काम करताना किंवा निवडताना असे काम निवडा व करा जे करून तुम्हाला आनंद मिळायला हवा" हे समजवण्यासाठी दिग्दर्शकाने पूर्ण कहाणी वाहून घेतलेली आहे. वेद वर्धन-सोहोनी (रणबीर कपूर) आणि तारा माहेश्वरी (दीपिका पदुकोण) यांची अपघाताने झालेली भेट अन त्या भेटीला पुढे आलेली प्रेमाची भरती या धाग्याभोवती फिरणारी कहाणी म्हणजे "तमाशा".

इम्तियाज आली स्वत:च लेखक आल्यामुळे कदाचित पण त्याने बर्याच ठिकाणी गोष्टी आपोआप समजतील अशी काळजी घेतल्याचे जाणवते. पण तरीही जो फरक पडायचा तो पडतोच. एक उदाहरण घेऊ, "तमाशा" हे शीर्षक का तर हे समजावताना त्याने वेद वर्धन-सोहोनीच्या पूर्वायुष्याचा संदर्भ वापरलेला/दिलेला आहे. त्याच्या पूर्वायुष्यातील आवडत्या गोष्टीत तमाशाचा समावेश करून त्याद्वारे त्याने त्या कलेला सरतेशेवटी तो आपले पोटाचे साधन कसे बनवतो हे बेमालूमपणे इम्तियाज manage करतो. एक हे हि उदाहरण घेऊ कि दिग्दर्शकच लेखक असला तरी काही गोष्टी समजावताना कसा कमी पडू शकतो, कसं/कुठे तर तारा माहेश्वरी आणि वेदची भेट होते, ताटातूट होते मान्य पण ताटातुटीच्या पाच वर्षांच्या कालखंडात (कालखंड दाखवलेला आहे) काहीही फरक पडत नाही?? मागील पानावरून पुढे अशी कहाणी त्यांची भेट झाल्यावर सरकते?? ती दिल्ली अन तो शिमला असे वेगवेगळ्या शहरातील असूनही?? इथे दिग्दर्शक प्रेक्षकांना "समजून जातील ब्वा" असे manage करतो. तारा माहेश्वरी या दीपिका पदुकोणच्या व्यक्तिरेखेच्या उल्लेख केवळ ती आहे इतपतच करावा लागेल कारण इम्तियाज आली आपल्याच "रॉकस्टार" पटाकडून इतका इम्प्रेस वाटतो कि तिला जास्त स्कोपच त्याने ठेवलेला नाही. बर्याच काळ तर ती कहाणीच्या बाहेरच असते.
या असल्या गोष्टी संगीतात दाबून जातात आणि प्रेक्षकांच्या स्म्रुतिपटलावरुन थिएटरच्या बाहेर पडताना पुसल्या जातात पण श्री रा.रा.ए आर रहमान हे पुन्हा एकदा पार्श्वसंगीत आघाडीवर अपयशी ठरलेले आहेत. दोन किंवा तीन गाणेही आहेत पण ते "सो सो" category त येतात.
इम्तियाज अली ने लेखक म्हणून कहाणी लिहिताना कहाणीचा हेतू ठरवताना गफलत केल्याचे जाणवते किंवा नंतर एका कहाणीच एका चित्रपटात रूपांतरण करताना जे बदल घडले असतील त्या बदलत कहाणी भरकटली असे वाटते. कारण काहीही असो पण कहाणी भरकटली बरेच काळ असे इम्प्रेशन घेऊन प्रेक्षक बाहेर पडतात. एक साधा मुलगा कला क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणारा मग घरच्यांच्या दबावाखाली झुकून
इंजी. इत्यादी क्षेत्रात नशीब आजमावलेला. मग तिथे यशस्वी झाल्यानंतर बॉलीवूडसदृश्य कर्मधर्मसंयोगाने तसलीच परिस्थिती बनून प्रेमात पडलेला. मग ताटातूट झालेला. या ताटातुटिचे कारण हि शब्दश: "हास्यास्पद" असलेला. हे कारण हास्यास्पद बनले कारण लेखक/दिग्दर्शक या कारणाची गहनता प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात सपशेल अपयशी ठरलेत. पियुष मिश्राच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख करावाच लागेल. कहाणी लहान मुलांना सांगणारा/समजावणारा एका म्हातार्याची व्यक्तिरेखा त्याने निभावलेली आहे. पण कहाणी पुढे सरकवण्यात इतक्या ठिकाणी त्याचा संदर्भ येतो कि जर तो कमी पडला असता तर अक्खा चित्रपटच हास्यास्पद बनला असता.

"काम करताना किंवा निवडताना असे काम निवडा व करा जे करून तुम्हाला आनंद मिळायला हवा" हे समजावण्याचा लेखक/दिग्दर्शक इम्तियाज अलीचा प्रयत्न त्याचे कमर्शियल रूपांतरण करताना भरकटल्याचे जाणवते. मी या चित्रपटाला १ स्टार १* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

मुंबई-पुणे-मुंबई 2



मुंबई-पुणे-मुंबई=2 

मुंबई-पुणे-मुंबई या आपल्याच गाजलेल्या आधीच्या सिनेमाचा पार्ट-२ म्हणजेच सिक्वेल घेऊन दिग्दर्शक सतीश राजवाडे आलेले असून आधीच्याच कहाणीला पुढे नेत त्यांनी एक उत्तम प्रयत्न सादर केलेला आहे. दिवाळीला एकमेकांसोबतच तीन चित्रपट प्रदर्शित झालेत आणि त्यापैकी दोन मराठी पण सांगण्यात आनंद  कि दोन्ही मराठी चित्रपट अक्षरश: पुरून उरलेले आहेत राजश्रीच्या चित्रपटाला.  "कट्यार काळजात घुसली" आणि "मुंबई-पुणे-मुंबई २" हे सिद्ध करतात कि चांगले  मराठी चित्रपट असले तर आजच्याहि  जमान्यात  मल्टिप्लेक्सलाहि तिकीट मिळत नाही इतकी गर्दी खेचू शकतात. सुट्टी असो वा नसो पण मराठी चित्रपटांनी आजच्या जमान्यात तिकीट बारीवर शब्दश: अलोट गर्दी खेचणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे दोघंही आधीच्याच भागाप्रमाणे याही भागात असून त्यांनी त्यांची कहाणी पुढे नेलेली आहे आणि आधीच्या भागात  त्यांची नावे नव्हती फक्त एक मुंबईचा आणि एक मुंबईची अशी सारवासारव होती पण या भागात नामकरण करून गौतम प्रधान आणि गौरी देशपांडे यांची कहाणी नीटपणे मांडलेली आहे.
गौतम प्रधान हा पुण्याचा मुलगा आणि गौरी प्रधान हि मुंबईची मुलगी यांचा विवाहसोहळा संपन्न कसा होतो या धाग्याभोवती वेवेगळ्या अंगांनी फिरणारी कहाणी म्हणजे मुंबई-पुणे-मुंबई २. पण यात समाधान कि कहाणीत कोणतेही फिल्मी ट्विस्ट नाही. वास्तविक बघता अंगद म्हैसकर (अर्णव) च्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना अशी शंका बरेचदा येते आणि त्यातही अभिनेत्री तिच्या निर्णयाबद्दल पक्की राहात नाही त्यामुळे या संशयाला बळकटी मिळते पण सरतेशेवटी चित्रपट "शेवट गोड" करून संपतो. पण सतीश राजवाडे हे लेखक-दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांना थोडेफार कन्फ्युज करण्यात यशस्वी ठरलेले आहेत.
चित्रपटाची पहिल्या भागातील लोकप्रियता लक्षात घेता दुसया भागाची लोकप्रियता आधीच आगाऊ ठरवून/अपेक्षित धरून सतीश राजवाडेंनी बरेचसे प्रयोग करून बघितलेत मार्केटींगचे या भागात. बाकी जाऊ देऊ पण खानविलकर कि कोणीतरी या बिल्डर्सची जाहिरात करून देण्याची पद्धत त्यांनी वापरली. 
अविनाश-विश्वजित या संगीतकार जोडीलाच पहिल्या भागाप्रमाणे याहि भागात राजवाडेंनी रिपिट केलेले आहे. पण पहिल्या भागात "कधी तू" आणि "का कळेना" या दोनच गाण्यांनी जो प्रभाव या जोडीने निर्माण केला होता त्यांच्या १०%हि या वेळेस नाही. मान्य असो वा नसो पण या दोन गाण्यांचे पहिल्या भागाच्या यशातील योगदान दुर्लक्षित करण्यासारखे नव्हते. या वेळेस त्यांना ती जादू री-क्रिएट करणे अजिबात जमलेले नाही.
प्रेम आणि त्यानंतर लग्नाची/लग्नासाठी/लग्नापर्यंत इत्यादी इत्यादी जुळवाजुळव हा नाही म्हटले तरी सर्व वयोगटांत इंटरेस्टिंग विषय आहे. यावर मराठी चित्रपटात प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे संवाद (dialogues ) पण अश्विनी  शेंडे  या लेखिकेने पटकथा आणि संवाद हि दुहेरी जबाबदारी सांभाळूनही दोन्हीकडे उत्तम न्याय केलेला आहे. त्यातही त्यांच्या संवाद लेखनासाठी त्यांचे विशेष कौतुक.
स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या जोडीला सांभाळत सतीश राजवाडेंनी त्या दोघांकडूनही उत्तम अभिनय करवून घेतलाय पण मागील भागातली अविनाश-विश्वजित हि जोडी संगीत आघाडीवर सपशेल अपयशी ठरलेली आहे. काही प्रसंगात "कधी तू" हे background म्हणून वापरले असते तरी चालले असते असे उगाचच प्रेक्षकांना बरेचदा वाटून जाते. मला सगळंच आवडल विशेष करून संवाद पण संगीताने माझा भ्रमनिरास केला म्हणून मी चित्रपटाला साडे तीन (३१/२)* स्टार देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर


बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

प्रेम रतन धन पायो


करिष्माई निर्माते-दिग्दर्शक सुरज बडजात्या हे नवीन चित्रपट त्यांची आवडती व्यक्तिरेखा "प्रेम" आणि या वेळेस प्रेम च्या भूमिकेत सलमान खान दुहेरी भूमिकेत असल्या तिकीट बारीवर गाजण्याच्या दृष्टीने परिपूर्ण मसाल्या सहित आलेले आहेत. पहिल्या विकेंडलाच गाठलेला शंभर कोटींचा आकडा हा दाखवतो कि जनता आधीपासूनच फक्त बडजात्याच्या करिष्म्यावर विश्वास ठेवून आहे. पण कितीही नाकारले तरी रिपीट ऑडीयंस हि सुरज बडजात्या फिल्मची मागील काहीवेळची बनलेली  खासियत  या वेळेस कितपत चालते यावर या सिनेमाचे यश अवलंबून असेल. दिग्दर्शकाचे आणि मुख्य अभिनेत्याच्या जोडीचे प्री-इम्प्रेशनच इतके जबरदस्त कि पहिल्या तीन दिवसातच हिटचा दर्जा चित्रपटाने मिळवला पण यशस्वी होण्याचा दर्जा या  नंतर सुरु होईल, आणि तो मिळेल का हे अनुभवणे मजेशीर राहील !!!! 

सुरज बडजात्याचा सिनेमा म्हणजे पूर्ण शाकाहारी थोडक्यात पूर्ण कुटुंबाला सोबत नेउन देखील कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला आवडेल असे काही ना काही सापडणारा एक दुर्मिळ सिनेमा असे आजवर इम्प्रेशन होते. मैने प्यार किया, हम आप के है कौन, हम साथ साथ  है आणि  विवाह   असल्या  एक से एक उत्तम कलाकृती सादर करणारा हा गडी. अर्थात मै प्रेम कि दिवानी हु सारखा अपवाद पण या केस मध्ये हा अपवाद देखील "सन्माननीय अपवाद"  आपोआप बनतो.  

सलमान खान दुहेरी भूमिकेत आणि त्यातही एक भूमिका राजाची आणि एक त्याच राज्यातल्या प्रजाजनाची. या दोन भूमिकांचा आपसात-सहकलाकारांशी  मेळ जमवताना लेखक स्वत:च कन्फ्युज झालाय का अशी शंका प्रेक्षकांना येते.  या दोन पैकी एक भूमिका जवळपास तीनही तासभर कहाणीच्या बाहेर असूनही हे विशेष. कहाणीलेखक-पटकथा लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता या चारही महत्वाच्या भूमिकांत सुरज बडजात्याच असल्यामुळे जसे विवाहच्या केसमध्ये उत्कंठावर्धक आणि तारुण्यपिटिकेला गवसणी घालणारी आगळी- वेगळी कथा असली वाहवा त्याने सगळ्या वयोगटातून त्याने मिळवली  त्याचप्रमाणे या  वेळेस रिपीट ऑडीयंस तर  सोडा पण मागील पुण्याईमुळे मिळालेला ऑडीयंसहि छी-थु करेल अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.  

लेखकाने cinematic लिबर्टी इत्यादी इत्यादी संकल्पनांचा आधार घेत  प्रेक्षकांना गृहीत धरणे हे हिंदी प्रेक्षकांसाठी नवीन नाही पण सुरज बडजात्या सारख्या प्रथितयश (!!!!!!) लेखक-दिग्दर्शकाने प्रेक्षकांना मूर्ख समजण्या इतपत कमतरता ठेवाव्यात याचा धक्का बसल्याशिवाय राहात नाही. जास्त नाही आपण एकंच छोट  उदाहरण घेऊ एक राजाच्या कुटुंबातल्या आंतरिक बाबी भलेही बाहेरचा व्यक्ती राजवाड्यात त्यांचा आत्मज म्हणून शिरला तरीही इतक्या सहजा-सहजी बाहेरपर्यंत झिरपाव्यात?? बाकी प्रसंग हि सांगता येतील गृहीत धरल्याचे पण आधीची पुण्याई बघता इतकच सध्या पुरे बाकी बघणाऱ्या प्रेक्षकांनी आपापले ठरवावे.

आलोक नाथ हा सुरज बडजात्याचा लकी चार्म वाटायचा मला कारण त्याच्या गाजलेल्या प्रत्येक सिनेमात तो एक महत्वपूर्ण भूमिकेत होता."मै प्रेम कि दिवानी हु" मध्ये नव्हता आणि असा सिनेमा होता हे कोणाला आठवते का या प्रश्नाच्या उत्तरातच मला असे का वाटते याचे उत्तर आहे का?? या सिनेमातही आलोक नाथ नाही !!!! वास्तविक बघता अनुपम खेरच्या जागी त्याला बसवता आल असत पण.........

मुख्य अभिनेत्री म्हणून सोनम कपूर आहे पण तिला प्रोमोसाठी वापरलेल्या गाण्यात कंबर हलवणे सोडून इतर काही महत्व नाही. सहाय्यक भूमिकेत नील नितीन मुकेशहि आहे पण त्याला तोंडी लावण्यापुरतेही महत्व नाही.
२००६ सालच्या विवाह मध्ये स्व.रवींद्र जैन यांचा म्हणजेच एका मेन स्ट्रीम चित्रपट क्षेत्रात नवीन संगीतकाराचा  वापर करून त्यांनी दिलेल्या संगीताच्या बळावर चित्रपट यशस्वी करून दाखवल्या नंतर सुरज बडजात्याची हिंमत वाढली अन या वेळेस त्याने संगीतासाठी चक्क  हिमेश रेशमियाचा वापर केला. पण ज्याप्रमाणे रवींद्र जडेजा कितीही फुगला तरी कसोटीत त्रिशतक मारू शकेल का?? यातच जाणकारांना रेशमिया महाशयांना वापरणे योग्य कि अयोग्य  समजून जायला हवे. 

चित्रपटाला मी अर्धा स्टार देईन अभिनेत्यांच्या मेहनतीसाठी आणि दिग्दर्शकाच्या पूर्वपुण्याईसाठी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

तलवार


२००८ सालच्या आरुषी तलवार "ऑनर किलिंग" या गाजलेल्या प्रकरणावर मेघना गुलजार या घेऊन आल्या आहेत "तलवार". या गाजलेल्या प्रकरणात काय घडले असेल याची उत्सुकता त्या काळात शिगेला पोचली होती. नव्हे मिडियाने पोचवली होती. त्यात काय घडले असेल याची नाट्यमय कहाणी म्हणजे “तलवार”.
सध्या निकाल लागलेल्या त्या प्रकरणावर पूर्णपणे आधारित आहे हा चित्रपट. आरुषी तिचे आई-वडील अन नोकर हेमराज यांना त्या काळात मिडीयाने लोकप्रिय (?) बनवले होते.   जर ते "ऑनर किलिंग" असेल तर त्यात काय घडले असेल? मुळात ऑनर किलंग असेल कि नसेल? इत्यादी थिअरिजला स्पर्श करत सरते शेवटी CBI या तपाससंस्थेतील अंतर्गत राजकारणात/लाथाळ्यात तिच्या आई-वडिलांना झालेली शिक्षा हि निर्दोष असूनही झाली होती/आहे असे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याइतपत डिटेल समीक्षण करते. त्यासाठी लेखक विशाल भारद्वाजचे आणि दिग्दर्शक मेघना गुलजारचे खरोखर कौतुक.
या कहाणीच्या आत थोडक्यात शिरताना भारतीय नोकरशाहीत अंतर्गत राजकारण किती खोलवर रुजलेले आहे कि ते असल्या मोठमोठ्या प्रकरणांच्या कोर्टाच्या निकालावर तपासाद्वारे प्रभाव टाकू शकते हे दिसून येते. लेखक विशाल भारद्वाजने भारतीय नोकरशाहीवर कोणतीही टिकाटिप्पणी करण्याचे टाळून माझ्यामते कहाणीला भरकटण्यापासून वाचवलेले आहे. आरुषीच्या निकालावर कोणतीही थेट टिप्पणी न करता कहाणी पूर्णपणे त्या तपासाभोवती फिरते आणि शेवटी फक्त निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण करून प्रेक्षकांना ठरवण्यास बाध्य करते. भारतीय नोकरशाहीत राजकारण आहे पण ते असे दृष्टीकोनात्मक पद्धतीने सीबीआय सारख्या तपास संस्थेत प्रभाव टाकत असेल हे खरोखर धक्कादायक आहे.

इरफान खान हा पोलिस अधिकारी अश्विन कुमार आणि नीरज काबी हा रमेश टंडन पक्षी आरुषीचे वडील डॉ. राजेश तलवार यांच्या भूमिकेत आहेत. कोंकणा सेन-शर्मा हि आरुषी उर्फ श्रुती टंडन (सिनेमात) हिच्या आईच्या भूमिकेत आहे. इरफान खान आणि नीरज काबी हे उत्कृष्टरित्या आपापल्या भूमिकांना वठवतात कारण सिनेमा पूर्णवेळ या दोघांभोवतीच फिरतो.
मेघना गुलजारचे कौतुक करावेच लागेल कारण ती विशाल भारद्वाज सोबत सहपटकथा लेखिकाही आहे आणि कहाणी कुठेही संथ बनून प्रेक्षक कंटाळणार नाहीत याची काळजी तिने लेखक सोबतीने घेतलेली पदोपदी जाणवते. आरुषीच्या मृत्यूसंदर्भात दुसरी थियरी मांडताना म्हणजे ज्यामुळे डॉ राजेश तलवारला शिक्षा झाली ते विषद करताना कहाणी वरील पकड सुटण्याची पूर्ण संधी होती. पण त्या मुळ कारणाला विषद करणारी जी मिटिंग असते त्यात (धर्मप्रचारक) विनोद पेरणी करून त्या विनोदाखाली ते कारण तिने व्यवस्थित हाताळल आहे.   
आरुषी प्रकरण मीडियानेच मोठे केले होते २००८ साली आणि ऑनर किलिंगचा मुलामा देऊन वाढवले होते पण चित्रपटात विषद केलेली दुसरी थियरी देखील शक्य होती आणि कदाचित खरीही असू शकते. आरुषीची कहाणी चित्रपट रुपात प्रेक्षकांसमोर आली म्हणजे भविष्यात सध्या गाजणारे शिना बोरा प्रकरण हि भविष्यात येइलच याची खात्री वाटते.

मी चित्रपटाला विशाल भारद्वाजची कथा/पटकथा आणि मेघना गुलजार चे दिग्दर्शन यांच्या उत्कृष्टतेसाठी मुख्यत्वे तीन ३* देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.


-समीर

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०१५

मराठी - दगडी चाळ





मराठी-दगडी चाळ

"दगडी चाळ" या दोन शब्दांनी सगळ्यात आधी काय आठवते? तर मुंबईतला राजकारणी बनलेला डॉन अरुण गवळी अन त्याच्या कारवाया. कारण दगडी चाळ हा मुंबईतला भायखळा भागातला भाग हा त्याचा अड्डा किंवा घर होते कैक काळ. त्यामुळे दिग्दर्शकाने कितीही स्पष्ट पाटी दिली (सुरु होण्या आधी) तरी चित्रपटाच्या नावावरून आणि एका मुख्य व्यक्तिरेखेचे नाव आणि बाकी डीटेल्स वरून प्रेक्षकांना काय तो अंदाज लागतोच.

दगडी चाळ आणि १९९६च्या आसपास असलेली तिथली मुंबईतली दहशत अन या दहशतीखाली फुलणारे प्रेम या धाग्याभोवती फिरणारी कहाणी म्हणजे दगडी चाळ.   

अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हे नायक व नायिका म्हणून कहाणीला लाभलेले आहेत आणि मकरंद देशपांडे हे डॅडी उर्फ अरुण गवळी च्या भूमिकेत आहेत.मकरंद देशपांडे यांनी अगदी अप्रतिम रित्या दगडी चाळ मधला डॉन डॅडी उभा केलेला आहे. त्यात राजकारणात घुसल्यामुळे कि काय पण अरुण गवळी च्या इमेजला धक्का न लावता त्याला थोडं उच्च पातळीवर पोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे अगदीच त्याचे निर्दोष असणे सिद्ध करणे हा हेतू नसला तरी त्याच्या प्रतिमेला उंचावणे हा हेतू आहे आणि मकरंदजी यात दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर पुरेपूर उतरतात. पूजा सावंत हिच्या "सोनल" या भूमिकेचा उल्लेख करावाच लागेल कारण तिने उत्तम रित्या सगळी जबाबदारी निभावलेली आहे.
चंद्रकांत कणसे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. नवीन वाटताहेत कारण या आधी त्यांचे नाव मी तरी कधीच ऐकले नाही. त्यांचा हेतू अरुण गवळी यांची प्रतिमा उंचावणे अन जमल्यास प्रेक्षकांचे मनोरंजनहि करावे असा सीमित जाणवतो बर्याच प्रसंगात.

अमित राज यांचे संगीत चित्रपटाला असून अजय ताम्हाणे आणि प्रविण कमले यांची गीते आहेत. गाणे सगळे ठीक आहेत पण "धागा धागा" या हर्ष वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायलेल्या गाण्याचा उल्लेख हा करावाच लागेल कारण ते गाणे शब्दश: अप्रतिम आहे. पूजा सावंत हिचे त्या  गाण्यातले सौंदर्य लक्षवेधक आहे.

मोरया मोरया हे सुरवातीचे गाणेही उत्तम असले तरी धागा धागा च्या सुरवातीच्या दोन ओळींचा पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटभर बर्याच ठिकाणी वापर आहे. कदाचित त्यामुळेच ते गाणे आपोआप लक्षात राहते प्रेक्षकांना.

मराठी सिनेमा अगदी डॉनची कहाणी वगेरे असला तरी "प्रेम" या कल्पनेपासून सुटलेला नाही. पण कहाणीत अजिबात टिकलेला नाही अभिनयाने तरला असला तरी मुळ कहाणीच  ठिसूळ असल्यामुळे काय बोलणार? त्यामुळे मी या चित्रपटाला मला पूजा सावंत बेहद्द आवडते म्हणून केवळ तिच्या प्रयत्नासाठी १* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर     

किस किस को प्यार करू (?)

किस किस को प्यार करू (?)

रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

पुन्हा सही रे सही (नाटक)

पुन्हा सही रे सही (नाटक)

मराठी नाटक म्हणजे काय अन ते उत्कृष्ट कसे असतात हे समजून घेण्यासाठी कमीत कमी एकदा तरी रसिकांनी बघावे असे एक नाटक म्हणजे "पुन्हा सही रे सही". या आधी सुयोग निर्मित अन केदार शिंदे लिखित/दिग्दर्शित असे हे नाटक होत पण आता टायटल बदलल "पुन्हा सही रे सही " झाल अन दिग्दर्शक तोच पण निर्माता बदलला. सौ सरिता भरत जाधव या निर्मात्या बनल्या असून त्या आता हे नाटक भरत जाधव इंटरटेनमेंट या banner खाली हे नाटक निर्मित करतात.
कोणत्याही नाटकात सिनेमासारखा डबल रोल शक्य असतो?? उत्तर आहे होय आणि दोन नाही तर दिग्दर्शकाच्या शक्कलेला अभिनेत्याच्या समर्पकतेचि जोड जर मिळाली तर एक दोन नव्हे तर चक्क चार - चार भूमिका एकच अभिनेता एकाच नाटकात उभ्या करू शकतो.

कहाणी:
मदन सुखात्मे या एका श्रीमंत उद्योगपतीच्या इस्टेटीच्या हास्यात्मक ढंगाने झालेल्या किंवा होत असलेल्या वाटण्या म्हणजे पुन्हा सही रे सही.

अभिनय:
भरत जाधव यांनी या नाटकात (मदन सुखात्मे,रंगा, हरी आणि गलगले) या चार भूमिका केलेल्या आहेत. या चार भूमिका करताना प्रत्येक भूमिकेत स्टेजवर येण्याचे टायमिंग, भूमिकेचे रंगमंचावरील विशिष्ट दार आणि प्रत्येक भूमिकेला समकक्ष सहाय्यक अभिनेत्यांशी हास्यात्मक किंवा व्यंगात्मक संवाद यांचे टायमिंग हे ज्या सहजतेने भरत जाधवला साधते ते शब्दश: अफलातूनच.मदन सुखात्मे याच्या पहिल्या भूमिकेने प्रवेश, मग हरी, रंगा आणि गलगले यांचे कहाणीतले आगमन आणि सरतेशेवटी मदन सुखात्मेने येउन केलेला शेवट या सगळ्या भूमिकांत भरत जाधव प्रेक्षकांना खिळवून टाकतो खुर्चीवर.

दिग्दर्शन:
केदार शिंदे हे या नाटकाचे दिग्दर्शक. सुयोग तर्फे जेंव्हा हे निर्मित व्हायचं तेंव्हा देखील हेच होते आणि आताही हेच आहेत. केदार शिंदेनी या नाटकात बर्याच कल्पनांना effectively वापरलेलं आहे. उदाहरणार्थ चारही भूमिकातून भरत जाधवच्या संबंधित भूमिकेचे आगमन रंगमंचावर होताच इतर भूमिकावाल्या रंगमंचावरील प्रकाशयोजना थांबवणे जेणेकरून प्रेक्षकांचे लक्ष जिथे पाहिजे तिथेच वेधल्या जाईल, भारतच्या चारपैकी तीन भूमिकांना repeatative डायलॉगज देणे इत्यादी इत्यादी. मान्य असो व नसो पण या नाटकाच्या यशात एका दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीचे श्रेय निर्विवादपणे आहेच.

अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेल्या या अप्रतिम नाटकाला मी बापडा काय रेटिंग देणार? पण फक्त पाचपैकी पाच ५* देण्याची माझी हौस मात्र मी भागवून घेईन म्हणतो.

-समीर

शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

तू हि रे (मराठी)


तू हि रे (मराठी)
मराठी चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा निर्विवादपणे तो "प्रेम" या सदैव बहारदार विषयावर बेतलेला असतो पण जर उत्तम दिग्दर्शन अन अप्रतिम संगीत (गीतांसकट आणि पार्श्वसंगीतासह) यांची साथ लाभली तर वर वर ठिसूळ वाटणारी कथा अप्रतिमरित्या चितारल्या जाऊ शकते याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे "तू हि रे" . मराठी चित्रपट हा बर्याच वेळा प्रेक्षकांना आजूबाजूला घडणाऱ्या वास्तविकतेशी साधर्म्य सांधणारा जाणवतो. आणि याच कारणामुळे कदाचित बरेच मराठी चित्रपट तग धरतात कारण मराठी मानसिकता स्वप्नाळू नाही. तुम्ही काहीही दाखवलं तर ते चालून जाणार नाही. त्याला जर काही अर्थ असला आणि थोडीफार तरी प्रेक्षकांना कहाणी पटली तरच मराठीत कोणत्याही चित्रपटाला हिटचा दर्जा मिळू शकतो. हिंदीत काही अभिनेत्यांच्या उपस्थितीमुळे किंवा अप्रतिम संगीतामुळे बरेचदा त्यांचे काम चालून जाते. दक्षिणे सारखी अभिनेत्यांची उपस्थिती हे "mandatory" नसलं तरी हिंदीतही हे कारण खुपदा चालून जाते. विषयांतर होईल पण "जय हो" सारखे तद्दन ठोकळे हे हिंदीतल्या अभिनेता उपस्थितीचे एक उदाहरण. असो, आपले मराठी प्रेक्षक हे इतर हिंदी प्रेक्षकांसारखे कामचलाऊ गोष्टींवर फक्त अभिनेत्याच्या उपस्थितीमुळे मान टाकणाऱ्या इतर अमराठी किंवा दक्षिणी मानसिकते सारखे नसल्यामुळे हे होत असावं. याचसाठी मनस्विनी लता रवींद्र या लेखिकेचे कौतुक कारण तिने अप्रतिम रित्या कहाणी काहीशी कन्फ्युजिंग असूनही निभावलेली आहे. “सिलुनु ओरु काढाल” या तमिळ चित्रपटावर अवलंबित कहाणी असूनही तिचे मराठी transformation लेखिकेने ज्या सफाईदारपणे केले ते खरोखर कौतुकास्पद आहे. कारण सूर्या या दक्षिणी सुपरस्टारचा तो चित्रपट निर्विवादपणे नायकप्रधान आणि थोडाफार "हे समजून घ्या, ते समजून घ्या" असल्या दक्षिणी पद्धतीचा असेल. पण म्हणूनच लेखिकेचे खरोखर कौतुक.
कहाणी:
स्वप्नील जोशी (सिद्धार्थ) आणि नंदिनी (सई ताम्हणकर) या अरेंज marriage केलेल्या जोडीची कथा म्हणजे तू हि रे. या कथेत "आठ वर्षांचा लीप" (म्हणजे आठ साल बाद) हि पाटी पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांना दिसते. पण लेखक आणि अनुभवी दिग्दर्शकाने नंतर सफाईदारपणे flash back ला वापरत प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युज होऊ दिले नाही. अभिनय आणि कहाणीचा फ्लो अप्रतिमरित्या प्रेक्षकांना पोचतो. मध्यंतरानंतर कहाणीत भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित) हिचे आगमन होते आणि तिथेच कहाणी प्रेक्षकांच्या समजेतून सुटण्याचा चान्स होता. पण संजय जाधव आणि मनस्विनी लता रवींद्र यांचे खरोखर कौतुक कारण त्यांनी अगदी अप्रतिमरीत्या सगळे सिच्युएशन्स हाताळले आहेत. तमिळ बेस्ड असल्यामुळे कहाणीत कितपत फरक केला असेल हे बघण्याचा आपल्याला काहीही चान्स नाही. पण अनुभव दोन्हीकडचा असल्यामुळे बराच केला असेल असा अंदाज बांधायला अजिबात हरकत नाही.
अभिनय:
मराठी चित्रपटात कास्टिंग हि अगदी बेसिक गोष्य निर्विवादपणे सगळ्यात जास्त महत्वाची आहे असे मला वाटते आणि असे वाटण्याला बळकटी देणारी कास्टिंग यात बघायला मिळते. स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई ताम्हणकर (नंदिनी) भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित), प्रसाद (सुशांत शेलार), श्री. भानुशाली (गिरीश ओक) आणि त्या दोघांची एक छोटी मुलगी हे सग्गळे आपापल्या भूमिकात शोभून गेलेले आहेत.या सगळ्यांना निवडण्यात जी चतुराई संजय जाधवने सुरवातीलाच एक कास्टिंग डायरेक्टर म्हणून दाखवली असेल त्याचा उल्लेख हा करावाच लागेल. का याचेही उदाहरण बघू भैरवी हि एका राजकारण्याची मुलगी या भूमिकेत आहे आणि नंदिनी एक खेडवळ लग्न झाल्यावर शहरात गेलेली स्त्री. या दोन भूमिकांत एक बेसिक फरक आहे. मान्य कि अभिनयामुळे हा फरक manipulate होईल पण तरीही बेसिक कास्टिंगच जर अयोग्य असत तर नक्कीच फरक पडलाच असता.
दिग्दर्शन:
संजय जाधव हे नाव दुनियादारी मुळे नावाजल्या गेले. "तू हि रे" मध्ये संजय जाधव यांनी अरेंज marriage , प्रेम (यशस्वी आणि अयशस्वी) असल्या एकदम वेगवेगळ्या विषयांना एकत्रितपणे स्पर्श केलेला आहे. यातला प्रत्येक विषय हा एकेका स्वतंत्र चित्रपटांचा विषय आहे. त्यातही चित्रपट मराठी म्हणजे स्वप्नाळू भाव-भावनेला किनारा देत बर्यापैकी वास्तविकतेची फोडणी असल्याशिवाय काहीच शक्य नाही हे नक्की.या सगळ्या कसरतीला manage करत पडद्यावर कथा चितारत असता मराठी प्रेक्षक कुठेही कन्फ्युज होणार नाहीत किंवा कंटाळणार नाहीत हि जितकी अभिनेत्यांची जबाबदारी होती तितकीच दिग्दर्शकाची. संजय जाधव या आघाडीवर पुर्णपैकी पूर्ण गुण मिळवतात हे नक्की.
संगीत आणि गीतकार:
मराठी चित्रपटात संगीताला हिंदी किंवा दक्षिणी चित्रपटापेक्षाहि जास्त महत्व असते कारण मराठी रसिक हे गाण्यांना गाणे म्हणून consider न करता एक कविता म्हणून समजतात. आणि मराठीत अक्षरश: पैश्याला पसाभर कवी आणि चारोळीकार अस्तित्वात आहेत याची जाणीव झुक्या रोजच करून देतो. त्या संख्येला बघता हे खरे असावे हे पटते. अमितराज, पंकज पडघन आणि शशांक पोवार यांचे संगीत आणि गुरु ठाकूरची गीते तू हि रे ला लाभलेली आहेत. सगळेच गाणे अगदी background म्युजिकहि अगदी चपखलपणे आपापल्या जागी बसलेले आहेत. यासाठी जितके संगीताचे कौतुक तितकेच कदाचित थोडे जास्त कौतुक गुरु ठाकुरचे.
मराठीत हिंदीसारखी अमाप चित्रपटसंख्या नसते, प्रतिसादाची पातळी बघता ते शक्यही नाही पण सर्व दृष्टीने परिपूर्ण मराठी चित्रपट कमी सापडतात हे हि तितकेच खरे आहे. तू हि रे ला एक नावं ठेवण्याची जागा नसलेला अप्रतिम मराठी चित्रपट मला वाटला म्हणून मी पूर्ण पाच 5* देईन पाचपैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

वेलकम बॅक



वेलकम बॅक 
मागील वेलकम-१ च्या कथेला पुढे नेण्याचा प्रयत्न अर्थात सिक्वेल किवा पार्ट टू म्हणून दिग्दर्शक अनिस बाझ्मी घेऊन आलेत “वेलकम बॅक”. वेलकम हा त्यांचा मागील याच्या आधीचा भाग प्रचंड गाजला होता. अनिस बाझ्मी यांचे चित्रपट तुम्ही बघायला जाता तेंव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी कि खूप मोठी पात्रांची गर्दी अन त्या प्रत्येक पात्राला महत्व मिळुन त्याचा कथेत कुठे-ना-कुठे समावेश करत सरकणारी कथा. ही नक्कीच बाझ्मी यांची खासियत आणि आपल्या कथेत गर्दीतील प्रत्येक पात्राला त्याच्या वकुबानुसार समाविष्ट करत अभिनय करवून घेणे ही एक जगावेगळी गोष्ट अनिस बाझ्मी यांना साधलेली आहे. नो एन्ट्री-रेडी आणि वेलकम-१ ही त्याची काही ठळक उदाहरणे.
कहाणी:
वेलकम बॅक मध्ये अनिस बाझ्मी यांनी आपल्या पहिल्याच वेलकम मध्ये अर्धवट सोडलेल्या कथेला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळी पात्र तीच आहे नाना-अनिल कपूर वगेरे पण नायक म्हणून जॉन अब्राहम आणि नायिका म्हणून श्रुती हसनचा समावेश आहे. मागच्याच वेलकम मधील कथेतील काही गाजलेल्या सिक्वेन्सला-डायलॉगजला वगेरे वगेरे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पुन्हा वापरण्याची चतुराई दिग्दर्शकाने दाखवलेली आहे.
दिग्दर्शन:
अनिस बाझ्मी यांनीच वेलकम-१ चे दिग्दर्शन केले होते. आधी म्हटल्याप्रमाणे पात्रगर्दी करून मग त्या गर्दीला कथेत गुंतवत कथेच्या अनुषंगाने सोडवणे ही अनिस बाझ्मी यांची खासियत. या वेळेसही त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेला जाणवतो पण डाळ गळलेली नाही. पूर्वप्रसिद्धी केल्याप्रमाणे दुबईतील शुटींगचा थरार-वाळवंटातील साहसदृश्ये इत्यादी इत्यादी जगावेगळी चाल चालण्याच्या नादात काही बेसिक गोष्टी सुटलेल्या जाणवतात.बेसिक गोष्टी उदाहरणार्थ कथेला पुढे नेताना मान्य कि कॉमेडी सिक्वेन्स असल्यामुळे वास्तविकतेशी ताडण्याचा प्रयत्न चुकीचा पण प्रेक्षकांना मूर्ख समजत कहाणीचा प्लॉट उभा असेल आणि दिग्दर्शकच जर लेखकही असेल तर काय हास्यास्पद प्रकार होईल?? सगळ्यात जास्त खुपणारी गोष्ट म्हणजे कथेचा शेवट. साहसदृश्ये वगेरे वगेरे वाळवंटातील साकारताना ती अर्धवट/अपूर्ण राहतील कि काय अशी शंका एकदाही अनुभवी दिग्दर्शकाला येऊ नये??
अभिनय:
नाना पाटेकर आणि अनिल कपूरची भाई म्हणून साकारलेली जोडगोळी पहिल्या वेलकम मध्ये प्रचंड गाजली होती. हा कथेचा पाया तोच असल्याचे ओळखत अनिस बाझ्मी यांनी त्या दोघांना परेश रावल सोबत रिपीट केलेला आहे. नाना आणि अनिल कपूर याही वेळेस आपापल्या भूमिकात शोभून जातात. पण नायक म्हणून समाविष्ट केलेला जॉन अब्राहम त्याच्या कथेतील सहभागाच्या वेळेसच प्रेक्षकांची डोक्याची शीर तडकावतो आणि जो शेवटपर्यंत जमिनीवर येत नाही. पहिल्या वेलकम मध्ये असलेल्या फिरोज खानच्या सामावेशाप्रमाणेच यात नसिरुद्दीन शहाचा समावेश आहे. पण पहिल्या वेलकम मध्ये असलेला जो विनोदाचा तडका होता तो साधने नसिरुद्दीन शहाला अभिनयातून अजिबात जमत नाही.
संगीत:
रेडी म्हणा नो एन्ट्री म्हणा व वेलकम-१ संगीत ही ठळक गोष्ट होत अनिस बाझ्मी यांच्या कलाकृतींमध्ये. या वेळेस संगीत आघाडीवर सपशेल लोटांगण आहे. कोणाचं/काय वगेरे डीटेल्स आपण दुर्लक्षित करू पण एक मला जाणवलेली ठळक गोष्ट कि एक आयटम सॉंग होत, कायको-बायको-सायको अशी गाणे दृष्टीने व्यवस्थित साधलेली यमका-यमकी होती पण पुन्हा एकदा डाळ गळलेली नाही.

अनिस बाझ्मी यांचे चित्रपट बघायला प्रेक्षक आपापल्या पुर्वानुभावाप्रमाणे जातीलच पण सिक्वेल बघताना आजही भारतीय प्रेक्षकांची मानसिकता परंपरागतच आहे. येथे आजही तनु वेडस मनु सारख्या उत्तम प्रयत्नाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळू शकतो. वेलकम बॅक हा पहिल्या वेलकमचा सिक्वेल मला तद्दन बाष्कळ आणि फालतू वाटला म्हणून मी फक्त नाना आणि अनिल कपूरच्या अभिनयासाठी एक १ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

फॅंटम



फॅंटम
भारत-पाकिस्तान संबंध त्यांतील ताणतणावासकट हा आजकाल चित्रपट निर्मात्यांचा प्रेमानंतर दुसरा एक आवडता कमवून देणारा विषय बनलेला आहे याची प्रचीती देणारा एक चित्रपट म्हणजे फॅंटम.मुंबई इव्हेन्जर्स या हुसैन झैदी यांच्या कादंबरीवर आधारित कथानक आणि आजपर्यंत कधी ही कोणत्याही चित्रपटाच्या सुरवातीस न बघितलेले "न्युट्रल कथानक" असल्याचे डिस्क्लेमर सुरवातीला मिळते कारण हाफिज सईद ने टाकलेली केस. मान्य असो व नसो पण या केसमुळे भारतात या चित्रपटाला पुरेशी पूर्वप्रसिद्धी मिळवून दिली.इतकी कि कोणतही प्रमोशन करण्याची गरज निर्माते नाडियादवाला परिवार आणि सिद्धार्थ रॉय-कपूर ला भासली नाही यातच सगळ आलं. यावर्षी सुरवातीला आलेल्या अक्षय कुमारच्या बेबी मध्ये कदाचित पहिल्यांदा एका पात्रस्वरुपात मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंड अन पाकिस्तानी कट्टरपंथी हाफिज सईद चे प्रेक्षकांना दर्शन घडले होते. या चित्रपटात त्याचे पुढचे पाऊल टाकत चक्क एक स्पष्ट पात्र म्हणून त्याचा समावेश केलेला आहे.
हाफिज सईद ने पाकिस्तानी सुप्रीम कोर्टात धाव घेत त्याच प्रदर्शन पाकिस्तानात का रोखलं असेल याच थोडफार उत्तर चित्रपटातून मिळते. स्पष्ट नाव न घेता पण इस्लाम च्या आडून पाकिस्तानी तरुण पिढीला कसा बहकवायचा प्रयत्न सदर इसम कसा यशस्वीपणे प्रयत्न करतो आहे हे कळते. भारत असो व पाकिस्तान लोकं हे चित्रपटसृष्टीला बरेच गांभीर्याने घेतात. त्याच्या लोकप्रियतेला पाकिस्तानात काही टक्के तरी ओहोटी लागण्याची शक्यता निश्चितच होती यातून. म्हणूनच कदाचित त्याने हे प्रदर्शन रोखलं असावं.
कहाणी:
२६-११ चा मुंबई हल्ला आणि त्या हल्ल्याला आपल्या रॉ मधल्या एका एजंट ने घेतलेला बदला/सूड अशी कहाणी. मुंबई हल्ल्यावर आजपर्यंत अनेक चित्रपट बनले. अमेरिकेत जर वर्ल्ड ट्रेड सेंटर चा ९-११ च्या हल्ल्यानंतर इतका गोंधळ उडून त्याची परिणीती ओसामाला शोधून,निवडून अमेरिकेने शिक्षा देण्यात होते तर २६-११ मुळे भारताला हे का जमत नाही अशी थियरी मांडून त्या सभोवताल फिरणारे हे कथानक.हि थियरी इमोशनली पटण्यासारखी असली तरी practically नाही. अमेरिकेचे जगाच्या राजकारणातील स्थान आणि अमेरिकन डॉलर अन भारतीय बापडा रुपया यातला फरक हा अतिशय स्पष्ट आहे. नाटक सिनेमात ठीक आहे पण हि कहाणी प्रत्यक्षात येण्यास अशक्य कारण माननीय पंतप्रधानांना आपण बहुमत तर दिले पण सोबत विरोधकही दिलेत. पण तरीही सैफ अली खानचा मृत्यू सोडून या कहाणीत मला काहीही वावगे वाटले नाही. भलेही प्रत्यक्षात येण्यास अशक्य का असेना पण चित्रपटांच्या कहाणीला काय सिरीयसली घ्यायचं??
अभिनय:
सैफ अली खान (दानियल खान) आणि कतरिना कैफ (नवाझ) हे दोघ एजंट. एक रॉचा एजंट आणि एक प्रायव्हेट रॉ आणि इतर सगळ्या देशांच्या एजन्सीजची अंडरकव्हर सपोर्टिंग एजंट टाईप. योगायोगाने एकमेकात मोहिमांच्या अनुषंगाने गुंतलेली नि आपोआप वाढलेली कहाणी. मुंबई हल्ला, हाफिज सईद आणि इस्लाम धर्म असल्या कदाचित वास्तविक पण स्ट्रीमलाईन कहाण्यांशी फटकून असणारी कहाणी असल्यामुळे यात अभिनय करणे हि कदाचित भविष्यकाळातील जीवाचा धोका बनण्याची रिस्क होती पण सगळ्याच कलाकारांनी व्यवस्थित निभावलेल कथानक.
दिग्दर्शन:
फॅंटम हे कबीर खान म्हणजेच एक था टायगर आणि बजरंगी भाईजान वाले. एकाच वर्षात दोन सुपरहिट (बजरंगी भाईजान आणि फॅंटम) देण्याइतके शुटींग-पोस्ट प्रोडक्शन-पास्ट प्रोडक्शन-प्रमोशन इत्यादी इत्यादी इव्हेण्ट्स मधून कसं वेळ management केलं असेल हे देवच जाणे. त्यांच्या ख्याती प्रमाणे सिनेमाचे पहिले दहा मिनिटे जे प्रेक्षकांच्या उत्सुकतेला ताणण्यास जबाबदार असतात ते पुन्हा एकदा जबरदस्त पद्धतीने manage केलेलं आहे त्यांनी. वास्तविक बघता हाफिज सईद आणि पाकिस्तान यांच्यावर इस्लाम धर्माथ्रू टिप्पण्या असल्यामुळे नाही म्हटले तरी स्फोटक विषय होता हा. पण सांगण्यास कौतुक कि कबीर खान यांनी सगळ्या अनुभवाला व्यवस्थित पणाला लावून सगळ हाताळल आहे.
फॅंटम हे एक इंग्रजी काल्पनिक पात्र, batman-सुपरमन-शेरलॉक होम्स यांसारखे. त्याच्या ख्यातीप्रमाणे तो गायब असतो व जेंव्हा गरज पडते तेंव्हाच प्रकट होतो. याचप्रमाणे आपल्या फॅंटम मध्येही आपला नायक कहाणी घडण्याआधी काही वर्षे अदृश्य असतो (विविध कारणांनी) आणि कहाणी execute करायला प्रकटतो. कदाचित या कारणामुळे चित्रपटाचे नाव फॅंटम असावे.

मला चित्रपटाचे नाव हे का दिले हे समजले नाही, संगीत जवळपास नव्हतच आणि शेवटचा सैफ अली खानचा मूत्यू पटला नाही पण सगळ्या कमतरतेवर कडी करणारे दिग्दर्शन आणि अभिनय आवडला म्हणून मी चित्रपटला चार ४* देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

सोमवार, २४ ऑगस्ट, २०१५

दोन स्पेशल (मराठी नाटक)

दोन स्पेशल (मराठी नाटक) 
क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित नाटक “दोन स्पेशल” हे जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले यांच्या अभिनयाने प्रेमकथेच्या समकक्ष धाटणीत प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे.मराठी नाटक आपण बघायला जातो तेंव्हा उपलब्ध दोन-तीन अंकात लेखक दिग्दर्शक पूर्ण कथा बसवतात आणि त्या कथेला उपलब्ध अभिनेता-अभिनेत्री आपापल्या अभिनयाने सजवतात. 
कहाणी: 
दोन स्पेशल हि दोन दुरावलेल्या प्रेमी जीवांची कथा असे कदाचित आपण म्हणू शकू. जितेंद्र जोशी हा एक पत्रकार-उपसंपादक आणि गिरीजा ओक हि त्याच कार्यालयातली त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी. या दोघांची दुरावण्याची कथा दोन अंकात फिरून शेवटी का दुरावलेत याचे त्या दोघांना उत्तर मिळून कथा संपते.
अभिनय:
मुळात कथा प्रेम कहाणी समकक्ष असे म्हटले कारण प्रेम कहाणी पूर्वाश्रमीची असल्यामुळे जराही तोल ढळू न देत जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले आपापल्या भूमिकांत पुरून उरतात. नाटकात सिनेमा सारखे टेक-रिटेक्स असे प्रकरण नसल्यामुळे कदाचित खराखुरा अभिनय असे नाटकाला म्हणता येईल. दोन स्पेशल मध्ये जितेंद्र जोशी पहिल्या अंकात आणि गिरीजा ओक-गोडबोले दुसर्या अंकात खरोखर एक एक संवाद म्हणतात जो कदाचित एका धड्याइतका असेल. हा महाप्रचंड संवाद सदर करताना दोघांचाही तोल ढळत नाही. कथेला पुढे सरकवण्यासाठी अतिशय मोक्याचे असलेले ते दोन वेगवेगळ्या अंकातील संवाद हे कठीण असूनही आपोआप नाटकाचा प्राण बनलेत.पूर्वाश्रमीची कथा एका नाटकात विशद करताना नाटकात flashback ची सोय नसल्यामुळे सगळे काही मंचावरील अभिनेत्यांच्या हातात असते कि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना कोणतेही कन्फ्युजन न व्हावे आणि लेखक-दिग्दर्शकाला अपेक्षित कथा प्रेक्षकांपर्यंत नीट पोचावी. पण सांगण्यात समाधान कि जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले हे कुठेही कमी पडत नाहीत.

दिग्दर्शन:
क्षितीज पटवर्धन हे या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक. प्रेक्षकांना कन्फ्युज न होऊ देत कथा त्यांच्यापर्यंत पोचावी हा त्यांचा प्रयत्न बरेच ठिकाणी कळून येतो. फक्त नायक नायिकेच्या संवादांच्या सहाय्याने जेंव्हा दिग्दर्शकाला flashback उभा करायचा असतो तेंव्हा तो कसा उभा करावा याचे एक खरेखुरे प्रात्यक्षिक म्हणजे "दोन स्पेशल"

दोन स्पेशल हा बघावा जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले च्या अप्रतिम अभिनयासाठी. त्या दोघांच्या अभिनयासाठी मी हे नाटक रेकमंड करीन आणि मी नाटकाल पाचपैकी तीन ३* देईन माझ्याकडून बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५

शोले



शोले 
शोले चित्रपटाला आज रिलीज होऊन अर्थात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्याची संधी मिळून आज चाळीस वर्षे पूर्ण झाली. कधी कधी मी विचार करतो कि मला शोले का आवडला? १.आजूबाजूचे सगळे कौतुक करत असल्याचा तो मानसिक परिणाम असेल काय? कि २.खरच त्यातला अभिनय/संगीत/कथा/पात्रनिवड/पटकथा/संवाद मला आवडले असतील? पण विचार न करता मी दुसर्या पर्यायावर पोचतो करण शोले ज्या वयात बघितला ते वय इतरांचे ऐकून निर्णय घेणार्यापैकी नव्हत. लहान असल्यामुळे आवडला तर आवडला अन नाही आवडला तर नाही मग कुणालाही काहीही वाटो. अर्थात हि गोष्ट असल्यामुळे मला वाटते कि शोले त्यातल्या अनेकानेक वैशिष्ट्यांमुळे मला आवडला.

शोलेतला अभिनय हि शोलेची सर्वाधिक जमेची बाजू अस माझ मत आहे. सलीम-जावेद च्या कथा अन पटकथेला आर डी बर्मन च्या संगीत अन पार्श्वसंगीताने साज चढवला अन रमेश सिप्पीची पात्रनिवड अन दिग्दर्शनाने त्यावर कळस चढवला.अभिनयात शोले मध्ये सगळे-सगळे आपापल्या भूमिकांत शोभले अगदी गब्बर सिंग पासून ते अगदी छोटीशी भूमिका असलेल्या सुरमा भोपाली पर्यंत. अभिनयात कुणालाही काहीही बोट दाखवता येणार नाही असे चित्रपट भारतीय सिनेसृष्टीत खूप कमी आहेत. पण जे आहेत त्यात शोले वरच्या क्रमांकावर आहे. आज मागे वळुन बघताना शोले चे कौतुक कशासाठी करावे अन कशासाठी नाही असा विचार लोकांना पडतो यातच शोलेचे यश सामावलेले आहे.

भारतीय सिनेसृष्टीत सर्व दृष्टीने परिपूर्ण असे दोनच चित्रपट सध्या मला वाटतात. हा कदाचित मला नसलेल्या अनुभवाचा परिणाम असेल किंवा नसलेल्या ज्ञानाचा. पण १. शोले आणि २ हम आप के है कौन हे दोन मला सर्व दृष्टीने पैसा वसूल चित्रपट वाटतात, पूर्ण कुटुंबाला नेऊ शकू असे आणि आजोबांपासून ते लहान भावांपर्यंत कुणीही कंटाळणार असे कारण सगळ्या वयांसाठी काही ना काही या दोन्ही चित्रपटात आहे. सुपरस्टार शाहरुख खानच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ला नुकतेच १००९ आठवडे पूर्ण झाल्याची बातमी नुकतीच कुठेतरी वाचली.याही चित्रपटाने असाच विक्रम नोंदवावा यासाठी सुपरस्टारला शुभेच्छा.
-समीर

शनिवार, ८ ऑगस्ट, २०१५

Mission: Impossible – Rogue Nation



Mission: Impossible – Rogue Nation 

आताच काही दिवसांपूर्वीच आपण आपला (हिंदी/भारतीय) मधल्या बाहुबली ला बघून प्रभास अन दग्गुबत्तीच्या फिजिकल फिटनेस अन स्टण्टस बद्दल त्यांचे झालेले कौतुक बघितले अन प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रित्या हॉलीवूडशी झालेली बरोबरीहि बघितली. पण हॉलीवूडचे फिजिकल स्टण्टस म्हणजे काय अन ते सर्वोत्तम कसे याचे उदाहरण प्रेक्षकांना दिसण्यासाठी लगोलग दाखल झालाय Mission: Impossible – Rogue Nation .

हा सिनेमा Tom क्रुज च्या या सिरीज मधला पाचवा भाग. कोणताही सिनेमा कुणीही का बघावा हा ज्याच्या त्याच्या टेस्टचा प्रश्न असतो. पण सदर पूर्ण सिरीज का बघावी? तर tom क्रुझ ने वयाच्या पन्नाशीत केलेले [कोणताही body डबल न वापरता केलेले] अविश्वसनीय फिजिकल स्टण्टस. पहिल्या भागापासूनच तो यात जबरदस्त जीव ओतून शोभून गेलाय या सिरीजमध्ये पण या वेळेस तो वयाच्या ५३ व्या वर्षी आपल्या हिंदी नायकांना शरम वाटावी असे कारनामे करून जातो.


कहाणी:
सिनेमा अमेरिकन. त्यामुळे सर्व दृष्टीने अमेरिकेची बाजू वरचढ ठरणारी स्टोरी लाइन पहिल्या भागापासूनच. त्यात सी आय ए, एफ बी आय इत्यादी इत्यादी त्यांच्या संस्थाना वरचढ ठरू बघणारी त्यांचीच एक इंटर्नल संस्था impossible मिशन फोर्स[आय एम एफ]. त्यात त्यांचे-त्यांचे आंतरिक राजकारण. त्या राजकारणात सुरु झालेली एकमेकांवर अब्जावधी बिलियनसाठी कुरघोडी करण्याची आंतरिक स्पर्धा. त्यात लागलेला "सिंडीकेट" चा शोध. अन या सिंडीकेटच्या मुळापर्यंत पोचण्याचा प्रयत्न. हे सगळ करताना त्याच execution ऑन स्क्रीन कसे होते यावर प्रेक्षकांचे संतुलन सांभाळायची कसरत सगळ्याच भागात अप्रतिमरीत्या झालेली सापडते. कोणी/कस/काय/किती या हॉलीवूडच्या डीटेल्स मध्ये आपण न जाता फक्त एन्जॉय करण्याचे ठरवले तरीही कुठेही कमी न पडणारी एक अप्रतिम हॉलीवूड सिरीज.
अभिनय:
इथन हंट हा tom क्रुझचा रोल.पहिल्या भागापासूनच तो एक सिक्रेट एजंट. मग लगोलग या भूमिकेत विविध मोहिमा निभावताना त्याने केलेले अप्रतिम स्टण्टस. आपण आधीचे भाग जाऊ देऊ पण याच भागात अगदी सिनेमाच्या सुरवातीला त्याने हात मागे एक खांबाला बांधलेले असतानाही पूर्ण ३६० डिग्रीच्या कोनातून उडी घेऊन स्वत:ची त्याने करवून घेतलेली सुटका हे एक अगदी छोटसं उदाहरण. मग त्याने पुढे बाइक रेस, विमानाला लटकणे इत्यादी स्टण्टस स्वत:च कोणताही बॉडी डबल न घेत केलेले आहेत. मान्य असो वा नसो पण हॉलीवूड मध्ये भाव भावनांपेक्षा या इतर कलाकुसरीलाच प्रेक्षकांच्या दृष्टीने महत्व असते आणि या मानकावर अगदी अप्रतिम रित्या उतरून तो एक सुपरस्टार असल्याचे स्वत:ला सिद्ध करतो.

आपल्या इथे आपण इतर कलाकुसरीला महत्व न देता भावभावनांना महत्व देतो. कदाचित हा भारतीय-अमेरिकन मानसिकतेमधील बेसिक फरक असावा.कारण काहीही असो पण माझ्यासारख्या एका सामान्य प्रेक्षकाने हॉलीवूडच्या मारधाडपटा कडून बाळगलेल्या सगळ्या अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करतो म्हणून मी पूर्ण पाच पैकी ५* देईन पाच पैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, २ ऑगस्ट, २०१५

दृश्यम (Drishyam)




दृश्यम (Drishyam) [हिंदी]

हिंदी सिनेमा जेंव्हा आपण बघायला जातो तेंव्हा त्याचं नाव हे जास्तीत जास्त वेळा प्रेम या विषयावर बेतलेले असते. द्रिश्यम असे मुलत: संस्कृतवर बेतलेले टायटल दिले म्हणजे हे हिंदी प्रेक्षकांनी समजून जाव कि हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असावा. आणि तो आहेच. मोहनलाल या मलयालम सुपरस्टारच्या चित्रपटाचा हा रिमेक. 
कहाणी: 
दृश्यम हे असे टायटल का? कारण चित्रपटाचे टायटल हे कहाणीशीसंबंधित असते. तर त्यालाही कारण आहे. आपल्या स्मरणशक्तीवर जास्तीत जास्त छाप सोडणारी कल्पना कोणती? तर आपल्याला दिसणारे आपण बघितलेले अन अनुभवलेले दृश्य. कोणतीही गोष्ट जी दिसते ती आपण विसरत नाही. ती लक्षात राहते. या वास्तविकतेचा वापर करून एका सर्वसामान्य माणसाने न्यायाची लढलेली लढाई असे कदाचित आपण या कहाणीला म्हणू शकू.

अभिनय:

विजय साळगावकर (अजय देवगण) हा एक सर्वसामान्य व्यक्ती केबलचा धंदा करणारा. कमी शिकलेला.
एक बायको अन दोन मुली असणारा. या व्यक्तीला रंगवताना एक थ्रिलरपट असल्यामुळे प्रेम किंवा जबाबदारी या दोन्ही कल्पनांत वाहवत जाण्याचा चान्स अजय देवगण जवळ होता. पण त्याने अक्षरश: सराईत पणे या दोन्ही कन्सेप्ट्स ला व्यवस्थित हाताळून विजय साळगावकर पडद्यावर उभा केलेला आहे. स्वत:चा धंदा अन कौटुंबिक जबाबदार्या सांभाळताना एक सर्वसामान्य माणसाची चालणारी कसरत अन त्यातही पब्लिक रिलेशनशिप्स हाताळताना असणारा व्यवस्थितपणा हा खरोखर अप्रतिमरित्या अजय देवगनने उभा केलेला आहे. गोलमाल सिरीज अन सिंघम सिरीज या दोन सिरीज नंतर एक अभिनेता म्हणून अजय मध्ये अभिनय दृष्टीने आमुलाग्र बदल झालेला आहे. आणि मान्य असो व नसो याचे श्रेय रोहित शेट्टिचेच.
नंदिनी साळगावकर या श्रिया सरन ने उभ्या केलेल्या त्याच्या पत्नीचा उल्लेखही करावाच लागेल. आजपर्यंत श्रियाने हिंदीत जास्त छाप सोडलेली नाही. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत ती सुपरस्टार असेलही कदाचित पण हिंदीत तिचा आवर्जून बघण्यासारखा एकही सिनेमा नाही. फक्त एक दिसायला सुंदर अभिनेत्री म्हणून तिचा वापर काही चित्रपटात झालेला आहे इतकंच. पण या तिच्या इम्प्रेशनला १८० च्या कोनाने छेद देणारी भूमिका म्हणून भविष्यात नंदिनी साळगावकरचा उल्लेख होईल. दोन मुलींची आई आणि आपल्या मुलीवर संकट आल्यावर त्याचा समर्थपणे मुकाबला करून त्यातूनही लढलेली. दिसायला सुंदर ती आहेच पण जबाबदारी रंगवताना तिच्या सौंदर्याला एक वेगळीच झळाळी आलेली आहे. आणि याच गोष्टीमुळे तिचा वावर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पहिल्या टाईमपास मधला दगडू देखील एका छोट्याश्या सहाय्यक भूमिकेत दर्शन देतो.
दिग्दर्शन:
निशिकांत कामत हे या थ्रिलरपटाचे दिग्दर्शक. आपल्या "लई भारी" आणि "डोंबिवली फास्ट" वाले. त्यांनी अतिशय अप्रतिमपणे एक कठीणशी कहाणी उभी केलेली आहे. एका सामान्य माणसाची आपल्या कुटुंबावर आलेल्या संकटाला परतवताना जी घालमेल होते ती पडद्यावर चितारताना निशिकांत कामत बर्याच ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त वेळा वास्तविकतेला म्हणजेच दुसर्या शब्दात (practicality )ला महत्व दिलेला आहे. त्यामुळेच कदाचित प्रेक्षकांचा इंटरेस्ट टिकून राहतो. आणि चाकोरीबाहेर जाऊन या बाबीमुळेच कदाचित ते सफल होतात.
संगीत:
विशाल भारद्वाज यांचे संगीत आणि समीर फातरपेकर यांचे backround संगीत सिनेमाला आहे पण ते जरी शोभत असल तरी सुधारणेस बराच वाव होता.
"Don't underestimate the power of a common man" हा सुपरस्टार शाहरुख खानचा चेन्नई एक्सप्रेस या सिनेमातील गाजलेला डायलॉग. या फक्त एका डायलॉगला मिळती जुळती कहाणी भविष्यात एका थ्रिलरपटाच्या चेहर्यामोहर्याने कदाचित पडद्यावर उतरेल असे वाटलेही नसेल तेंव्हा शाहरुख खानला. पण आज दोनच वर्षात सुपरस्टारच्या फक्त एका गाजलेल्या डायलॉग वर बेस्ड पूर्ण तीन तासांचा चित्रपट बनला एक थ्रिलर कहाणीच्या रूपाने.
मला हा थ्रिलर पट आवडला पण यातले संगीत पटले नाही आणि सुधारणेस खूप वाव वाटला पण संगीत सोडून कोणतीही खोट जाणवली नाही म्हणून मी चित्रपटाला चार ४* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, १९ जुलै, २०१५

तुझे नि माझे नाते काय


तुझे नि माझे नाते काय?

महान कवी अन गीतकार संदीप खरे व शानदार संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी यांना आपण ओळखतो मुख्यत्वे आयुष्यावर बोलू काही या शानदार गाणे कवितांच्या कार्यक्रमामुळे. या कार्यक्रमाचे जगभर जवळपास हजार प्रयोग केल्यावर हि जोडी तसाच एक दुसरा नजराणा रसिकांसाठी घेऊन आले आहेत. "तुझे नि माझे नाते काय?". "प्रेम" हा त्याच्या गाणे कवितांचा कधीही न संपणारा अन तुफान लोकप्रिय विषय. मग कविता वाचन अन गाणे यांचा एक असा कार्यक्रम असल्यास ज्यात मुख्य विषय म्हणजे प्रेम तर?

या कल्पनेचे मूर्त रूप म्हणजे "तुझे नि माझे नाते काय?"


बर मान्य कि प्रेम हा विषय असू दे पण मग फक्त तरुणाईचा ओढा राहील, बाकीच्या वयांबद्दल काय? तर याचे उत्तर म्हणून हे दोघंही प्रत्येक वयोगटात असणार्या प्रेम या संकल्पनेच्या विविध बाजूना या कार्यक्रमात स्पर्श करतात.टीनेजर अर्थात तरुण-मध्यमवयीन-आणि मोठे या सर्व वयोगटाना आपल्या गाणे-कवितात सामील करून सुवर्णमध्य साधलेला आहे.
आता आयुष्यावर बोलू काही या त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमाशी अगदी नैसर्गिकपणे या कार्यक्रमाची तुलना होईलच. दोन्ही कार्यक्रमांचा सादरीकरणाचा format सारखाच आहे पण यावेळेस त्यांनी घेतलेला महत्वाचा बदल म्हणजे रंगमंचावरील उपस्थिती. आधीच्या कार्यक्रमात फक्त संदीप-सलील हे दोघंच स्टेजवर असायचे पण या कार्यक्रमात त्यांनी आपल्या सर्व वाद्यवृन्दाना आणि दोन गायिकांना स्टेजवर संमिलीत केलेले आहे, या दोन गायिकांमध्ये सौभाग्यवती सोनिया (संदीप) खरे यांचे देखील प्रेक्षकांना दर्शन घडते. मी बघितलेल्या आजच्या प्रयोग क्रमांक दोन मध्ये तरी त्या होत्या.
-समीर 

शनिवार, १८ जुलै, २०१५

बजरंगी भाईजान



बजरंगी भाईजान

मागच्याच पंधरवड्यात आपण एक आयडियल आणि अद्भुत दक्षिण भारतीय कलाकृती अनुभवली. मग आता या कलाकृतीला आपण हिंदीत आपल्या स्टाईलने टक्कर द्यायला नको? याच इच्छेला दमदार उत्तर देण्यासाठी आलाय बजरंगी भाईजान.एक परिपूर्ण अन उत्कृष्ट कलाकृती.
कहाणी:
मुन्नी (हर्षाली मल्होत्रा) हि एक पाकिस्तानी मुलगी. कर्मधर्मसंयोगाने चुकून पाकिस्तानातून भारतात हरवून येते आणि ती आपल्या पवन कुमार चतुर्वेदी उर्फ बजरंगी भाईजान (सलमान खान) ला सापडते.
तो आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलीला तिच्या आईपर्यंत पाकिस्तानात कसा पोचवतो या मुख्य धाग्याभोवती गुंतलेली कहाणी म्हणजे बजरंगी भाईजान. आता कुणालाही शंका येईल कि त्यात काय विशेष म्हणून. आणि ते खरेही आहे पाकिस्तानात एका हरवलेल्या मुलीला पोचवणे यात काहीही तीर मारण्यासारख नाही. पण जर ती मुलगी मुकी असली तर? हो ती मुलगी मुकी असते!!! तिला काय म्हणायचं आहे हे समजून घेऊन एका मुक्या मुलीला तिच्या घरी पाकिस्तानात पोचवणे हा नक्कीच एका कहाणीचा विषय आहे. मग कहाणी हिंदी म्हणजे प्रेम,मैत्री,द्वेष इत्यादी इत्यादी भावना वेगवेगळ्या अनुषंगाने कथेत डोकावतात. गाणेही असतातच. पण भारतीय (हिंदी) मानसिकतेसाठी महत्वाच प्रकरण म्हणजे कहाणी. या एंड वर सलमानने पूर्ण यशस्वीपणे बाजी मारलेली आहे.
अभिनय:
सलमान खानचे कौतुक शब्दश: करावे तितके कमी इतके शानदारपणे त्याने पवन चतुर्वेदी उभा केलेला आहे. एका रिटायर्ड वेद विशारद पहलवानाचा मुलगा. पहलवानी आणि अभ्यासातही कमी. त्याच्या आयुष्यात अचानक घडलेला बदल. आयुष्यात झालेले नायिकेचे आगमन. आणि या सगळ्या कोलाहलातून त्याने केलेली मानवतेच्या पातळीवर एका मुक्या मुलीची मदत. करीना कपूर देखील एक नायिका म्हणून चित्रपटात आहे. पण तुम्ही बाहेर निघता तेंव्हा तुमच्या लक्षात राहतो तो सलमान आणि नवाजुद्दिन सिद्दिकी. वास्तविक बघता नवाजुद्दिन सिद्दिकी हा एका सहाय्यक भूमिकेत आहे आणि त्या भूमिकेचे कथेतले आगमनही मध्यंतरानंतर होते. पण बाहेर पडताना तुम्हाला लक्षात राहतो तो त्याने रंगवलेला सहाय्यक आणि सालमन हे दोघच बस. हर्षाली मल्होत्रा या छोकरीचे कौतुक केल्याशिवाय बजरंगी भाईजानच्या अभिनयाचा उल्लेखही भविष्यात होणार नाही इतकी छाप तिने सोडलेली आहे. तिने रंगवलेली शाहिदा (मुन्नी) हि एक मुकी मुलगी आईपासून दूर आणि आईच्या शोधात. वाचताना महत्व फक्त एका वाक्यात संपत असल तरी बघताना पूर्ण चित्रपट उभा राहिला राव तीन तासांचा. खरोखर छोकरी अक्षरश: शाहिदा म्हणून जगलेली आहे पूर्ण कहाणीभर
दिग्दर्शन:
कबीर खान या आपल्या एक था टायगर वाल्या शिपच्या कप्तानाला यावेळेस सलमानने स्वत: एक निर्माता बनल्यावर रिपीट केलेला आहे. एक था टायगर मध्ये देखील भारतीय आणि पंजाबी जासूस यांची प्रेमकहाणी अशी वेगळीच थीम होती. आणि या वेळेस तर कहाणी खूपच वेगळी होती. पण कबीर खान स्वत: कहाणी सहलेखक आणि पटकथा व संवाद लेखकही असल्यामुळे तो सर्व आघाड्यावर शीपचा कप्तान होता. वास्तविक बघता भारत-पाकिस्तान मधील दरीला आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात सांधणे असा एक स्तुत्य प्रयत्न होता. भारत आणि पाकिस्तानमधील सर्वसामान्य लोकांना हि दरी नकोय. त्यांना हवाय तो शांततेचा मार्ग. हा संदेश देताना समोर सलमान असल्यावर आणि किक व जय हो च्या अपयशानंतर सर्व नजर बजरंगी भाईजान वर असल्यावर इतक्या स्फोटक कहाणीला दमदारपणे पेलून दाखवणे म्हणून कबीर खानचे कौतुक करावेच लागेल.
त्याच्या दिग्दर्शन शैलीच्या वेगळेपणाचे एकच उदाहरण घेऊ, कोणत्याही कहाणीला प्रेक्षकांच्या आतपर्यंत झिरपण्यास कोणत्याही सिनेमाचे पहिले दहा मिनीट मुख्य भूमिका बजावतात. या दहा मिनटात समोर पडद्यावर कुणीही असू दे पण प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असला पाहिजे. बजरंगीमध्ये पहिल्या दहा मिनटात सलमान नसतो पडद्यावर पण एका छोट्या मुलीला अप्रतिम रित्या हाताळून कबीर खान प्रेक्षकांना आपल्या खुर्चीवर पुढील तीन तास खिळवून ठेवतो. एक था टायगर मध्ये पहिल्या दहा मिटताच तो प्रेक्षकांना flash back थ्रू कहाणीच्या मुळावर नेतो. मान्य असू दे वा नसू दे पण हि नस जी कबीर खान ला गवसलेली आहे ती भविष्यात त्याला एक यशस्वी दिग्दर्शक पातळीवर नेईल हे नक्की.
संगीत:
बजरंगी भाईजान मध्ये संगीत प्रीतम चे आहे. वैयक्तिक रित्या प्रीतम जा मला नेहमीच वन सॉंग वंडर वाटत आला आहे . प्रीतम हा संगीत दिग्दर्शक असलेल्या बर्याचश्या सिनेमात केवळ एक गाण हे इतके अप्रतिम असते कि बर्याचदा केवळ ते गाणे कमर्शियल पातळीवर चालून जाते आणि बाकी ठणठणगोपाळ. धूम (टायटल सॉंग), रेस- १ (जरा जरा टच मी), ये जवानी है दिवानी (बदतमीज दिल) हे त्याची काही उदाहरणे. याही सिनेमात सगळेच गाणे आपापल्या जागी शोभतात पण आपल्या किर्तीनुसार एक गाणे अप्रतिम देऊन गेला आहे प्रीतम. अदनान सामी ची कौसर मुनीर लिखित गझल "भर दो झोली मेरी". या गाण्याचं सिच्युएशन इतक जबरदस्त होत आणि त्या गझलचे बोलही त्या प्रसंगाला साजेसे आहेत. सेल्फी ले ले सारखा "वेळ मारून ने" टाईप काम नाही. अदनान सामीने ती गझल अगदी अप्रतिम रित्या निभावलेली आहे. त्याच्या बुर्सटलेल्या वजनापेक्षाही ती गझल आणि त्याचे बोल प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

हिंदी सिनेमा कसा असतो? तर तो कहाणीवर अवलंबून असतो, त्या कहाणीला चारही अंगाने फुलवतो त्यातला कलाकारांचा अभिनय.पण हिंदी सिनेमा दक्षिण भारतीय सिनेमासारखा व्यक्तीपुजक नसल्यामुळे कहाणी जर प्रेक्षकांना भावली तर आणि फक्त तरच कोणत्याही सिनेमाला हिंदीत हिट असा दर्जा मिळतो. केवळ एखाद्या अभिनेत्याची उपस्थिती हे हिंदीत कमर्शियल यशस्वीतेतच लक्षण नसते. याच आपल्या मागच्या जय हो आणि किक या आपल्या मागील अपयशावरून सलमान खान ने जबरदस्त धडा घेऊन बजरंगी भाईजान आणलेला आहे. सर्व दृष्टीने परिपूर्ण असा हा हिंदी चित्रपट मला आवडला आणि नावं ठेवण्या इतकी कोणतीही गोष्ट यात जाणवली नाही म्हणून मी चित्रपटाला पूर्ण ५* देईन पाच पैकी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

मंगळवार, १४ जुलै, २०१५

बाहुबली



बाहुबली 
अतिशय प्रचंड प्रमाणात प्रदर्शनपूर्व गाजावाजा झालेली कलाकृती, अडीचशे कोटीचे बजेट पासून अक्षरश: नवीन वसवलेल्या एका बोलीभाषे पर्यंत अनेकानेक दंतकथा आणि समोर येतो "बाहुबली"
दक्षिण भारतीय चित्रपटांची हि खरोखर खासियत असते कि कहाणीत कमतरता असतीलही कदाचित पण ते इतका जीव ओतून कहाणीला रंगवतात कि माणूस त्या जाणवणाऱ्या मेहनतीच्याच प्रेमात पडतो. भलेही काल्पनिक कथा अस डिस्क्लेमर सुरवातीला देऊनही व्यक्ती कहाणीत इतका गुंतून जातो कि नकळतपणे कहाणीच्या कमतरतांकडे दुर्लक्ष करतो.

अडीचशे कोटींचे बजेट, मग शानदार फॉरेन लोकेशन्स, जबरदस्त वेशभूषा, हाय-फाय चारचाक्या इत्यादी इत्यादी आपल्या अपेक्षेत असते हिंदी चित्रपटसृष्टीला अनुसरून पण यांपैकी काहीही नाही. उपरोल्लेखित गोष्टींपैकी एकही गोष्ट नाही आणि तरीही तुम्ही चित्रपट रसिक असा वा नका असू बाहेर पडताना चित्रपटाबद्दल काहीही खराब बोलत नाही. दिग्दर्शक-पटकथा लेखक आणि सह कहाणी लेखक एस एस राजमौलीचे हेच सगळ्यात मोठे यश. माउथ-टू-माउथ पब्लिसिटिच्या पहिल्याच पायरीवर पुर्णपैकी पूर्ण गुण मिळवण्यात चित्रपटाला यश मिळते. हा दक्षिण भारतीय चित्रपट असल्यामुळे याचे हिंदी व्हर्जन आल्यास बाहुबलीची मुख्य भूमिका कुणी करावी असा विचार तुमच्या (हिंदी) मनातचमकलाच समजा तर मध्यंतराच्या आधीपर्यंत "कुणीही" चालेल असे वाटणारे आपण मध्यंतरा नंतर फक्त ह्रिथिक रोशन आणि टायगर श्रॉफ पाशी येउन थांबतो त्या दोघांच्या असलेल्या फिजिकल फिटनेस मुळेच.

हिंदी किंवा भारतीय असं म्हणू चित्रपटसृष्टीवर नेहमीच टीका होते कि टेक्निकली खूप खूप कमी आहे म्हणून. या टीकेला समर्थ नाही म्हणता येणार पण बर्याच अंशी उत्तर देणारी एक कलाकृती म्हणून भविष्यात बाहुबलीचे नाव घेतल्या जाईल. जास्त डिटेल आपल्याला कळत नाही पण लक्षात येणारी ठळक गोष्ट म्हणजे छायाचित्रण. विमानातून शूट करून जमिनीवरचे अगदी अप्रतिमरीत्या रेखाटलेले युद्ध. अक्षरश: इतके शानदाररित्या कि "३००" नावाचा एक हॉलीवूडपट आला होता त्याची बरोबरी करणारे छायाचित्रण अन स्पेशल इफेक्ट्स. मान्य करा वा नका करू पण हि गोष्ट भारतीय (सगळ्याच) चित्रपटसृष्टीत दुर्मिळ.
कहाणी:
दक्षिण भारतीय चित्रपट म्हणजे निर्विवादपणे नायक प्रधान. हि कहाणी थोडी प्राचीन काळची आहे. म्हणजे राज्य- राज्याचा अपेक्षित उत्तराधिकारी-त्यावरून रंगलेले नाट्य आणि त्याचा झालेला शेवट. हा शेवट नीटपणे न करता तेथेही स्पष्टपणे दिग्दर्शकाने सिक्वेलची मुहूर्तमेढ केलेली आहे. म्हणजे कहाणीला पुढे नेण्यासाठी का होईना पण बाहुबली पार्ट टू नक्की येणारच.
अभिनय:
कहाणीत दोन भाऊ प्रभास आणि राणा दग्गुबत्ती. पण त्यांचा उल्लेख न करता बाहुबली पुढे सरकरणारच नाही.आता कहाणीच थोडीशी वेगळी मग नायकही त्या भूमिकेला तोलून धरणारा हवा. पण सांगण्यास आनंद कि प्रभास आणि राणा दग्गुबत्ती हे दोघेही शब्दश: पुरून उरतात आपापल्या भूमिकांना. प्राची कालचे युद्ध, घोडेस्वारी, रथांचे handling आणि रथांवरून युद्ध कौशल्य दाखवणे इत्यादी इत्यादी बाबी खरोखर अप्रतिम रित्या राजामौलीने हाताळलेल्या आहेत. नाही म्हणायला थोड्यावेळासाठी तमन्ना देखील एक नायिका म्हणून चित्रपटात आहे. पण मध्यंतरानंतर थोड्या वेळाने ती गायब होते आणि पुन्हा दर्शन देत नाही . तिच्या भूमिकेच्या अस्तित्वाचे मुख्य कारण प्रभास (बाहुबलीच्या) व्यक्तिरेखेचे आपल्याच जीवनाच्या भूतकाळातले आगमन बस. एक गाणही आहे पण तोंडी लावण्यापुरते. एम एम करीमला काही काम. अभिनयासाठी सत्यराज म्हणजेच कटप्पाचा उल्लेख करावाच लागेल. एका महत्वाचा सहाय्यक भूमिकेत तो आहे. कोठेही अतिशयोक्ती न होऊ देत अप्रतिमरीत्या आपले फक्त अस्तित्व जाणवून गेलाय तो.

कोणताही चित्रपट का बघावा किंवा का बघू नये याची कारणे व्यक्तिपरत्वे बदलतात. या कारणात वय-आणि अनुभव हे महत्वाची भूमिका बजावतात. एकादी गोष्ट जी मला आवडते तिचा एखाद्या वाचकाला तिटकारा असू शकतो. पण तरीही रिव्ह्यू मी लिहिला अन तो तुम्ही वाचताय या न्यायाने मी बाहुबलीला दिग्दर्शन-स्पेशल इफेक्ट्स आणि सगळ्याच अभिनेत्यांच्या मेहनतीसाठी पूर्ण ५* देईन पाच पैकी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

मंगळवार, ३० जून, २०१५

कविता

कविता 
कविता लिहिणे अन कविता बनवणे 
यात काय फरक असावा?? 
शब्दरचना अन व्याकरण जमेलहि पण 
विचारसरणीतील 'नेमकेपणाकुठून यावा !!

फक्त कमी शब्द वापरून भावना पोचवणे 
हेच कवितेचे यश आहे
पण त्या भावना नीट समजावून घेणे 
हेच रसिक मनाचे लक्षण आहे

कुणी भावनांना महत्व देईल तर कुणी शब्दांना
वय आणि अनुभव यावर हे अवलंबून आहे
पण कुठून ना कुठून भावनांना वाट सापडते
वास्तविकतेत यालाच महत्व आहे

शब्द न शब्द जोडून
ओळ ओळ बनेलहि
डोकं थोSSड वापरून यमक
पण जुळेलहि…………

पण शब्दांशी शब्द जुळवून
कविता कदाचित लिहिल्या जाईल
पण त्यात अर्थ नसला तर
"कविता बनवणे" या पासून कवी दूर राहील

लिहिणे जसे सर्वसमावेशक  
तसेच वाचनही अनेकानेक  कंगोरे स्पर्शणारे असावे
टीका करून लक्ष वेधणे इतकाच  क्षुल्लक हेतू नसावा
तर प्रतिक्रियेने कवीस आत्मचिंतनास बाध्य करावे

-समीर