किस किस को प्यार करू (?)
लोकप्रिय विनोदी मालिकाकार कपिल शर्मा हे अभिनेते बनले असून “किस किस को प्यार करू” या अब्बास-मस्तान यांच्या विनोदपटातून त्यांचे रुपेरी पडद्यावर आगमन झालेले आहे. अब्बास-मस्तान ही जोडगोळी म्हणजे सामान्य प्रेक्षकांना आठवेल बाजीगर,खिलाडी,अजनबी अन रेस. पण किस किस को प्यार करू मध्ये नाट्यमय कथा नाही, action नाही, संगीत नाही. Action पटातून विनोदपटाकडे त्यांचे वळणे या मागे कपिल शर्माची उपस्थिती हे एकमेव कारण असावे.या आधीही त्यांनी विनोदपटाचा प्रयत्न "बादशहा" मधून केला होता पण सुपरस्टार शाहरुखच्या उपस्थितीमुळे सदर प्रयत्न तिकीट बारीवर तरला पण कपिल शर्माची लोकप्रियता कदाचित तितकी करिष्माई असण्याची शक्यता नाही हे आजच्या तिकिटांच्या किमतीवरूनच लक्षात आले, मागच्या महिन्यात बाहुबली अन बजरंगी भाईजानच्या दरम्यान दोन हजारावर पोचलेले मल्टीप्लेक्स चे तिकीटदर आज सुट्टी असूनही दीडशेच्या रेंज मध्ये होते. आणि सुट्टी असूनही तिकीट मिळण्यासाठी काहीही विशेष प्रयत्न करावा लागत नव्हता. पटकन availability होती. म्हणजेच वितरकांना अंदाज असतो कि काय कोण जाणे पण मला वाटते असावा कारण "जय हो" सारखा तद्दन ठोकळा पहिल्या दिवशी दोनशे-तीनशे च्या आसपास होता. आणि आज मी बघितलेले सर्वोच्च तिकीट, मल्टिप्लेक्सचे, होते १७५.
कहाणी:
अब्बास-मस्तान ची जोडी म्हणजे कहाणीची नाट्यमयता असे एक समीकरण आजवर होते. पण कपिल शर्माच्या छोट्या पडद्यावरील लोकप्रियतेमगे खूपच वाहवत जाऊन त्यांनी त्यांच्याकडून अपेक्षित नसलेले बदल त्यांच्या हाताळणी पद्धतीत केलेले आहेत. बादशहा हा देखील कॉमेडीबेस्ड असला तरी त्यात त्यांनी शाहरूखची प्रतिमा लार्जर than लाइफ़ बनावी यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केलेले नव्हते. आणि बादशहात डबल रोल वगेरे नाट्यमयता त्यांनी समाविष्ट केली होती. मकरंद अनासपुरेचा एक मराठी चित्रपट होता "तीन बायका फजिती ऐका". या टायटलशी मिळती जुळती कहाणी म्हणजे किस किस को प्यार करू. कोणतीही नाट्यमयता नसलेली सरळधोपट अन अथपासून इतिपर्यंत पुढे काय घडणार आहे याची प्रेक्षकांना अंदाज लागणारी संथ कहाणी/पटकथा म्हणजे किस किस को प्यार करू
अभिनय:
कपिल शर्माला लॉंच करण्यासाठी चित्रपट असल्यामुळे नैसर्गिकरीत्या सगळा भर हा त्याच्या अभिनयावर प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित व्हावे इतका साधा-सोपा आहे.नाही म्हणायला फुकरे मधला चुच्या अका वरुण शर्मा आणि अरबाज खान हे ही सहाय्यक भूमिकेत असले तरी अनुभवी असल्यामुळे बर्याच प्रसंगात ते वरचढ आपोआप ठरतात. नाही म्हणायला सगळ्यात शेवटी clymax ला कपिल शर्माचा जो सीन आहे तो एकंच मला आख्ख्या तीन तासात जरा impressive वाटला. बाकी काहीही राम पूर्ण चित्रपटभर नव्हता. अर्थात कपिल शर्माचे fans असहमत होण्याची शक्यता आहे पण हे माझे वैयक्तिक मत आहे.
दिग्दर्शन:
अब्बास-मस्तानची विशेषता आलेली नाट्यमयता किंवा कहाणीत ट्विस्ट यात नव्हते. साधी सरळ प्रेक्षकांना समजणारी कहाणी होती. आणि त्यात कपिल शर्माच्या छोट्या पडद्यावरील इमेज ला अनुसरून flirt करणारा आणि मदतीसाठी तत्पर असे बदल त्यांना त्याच्या भूमिकेला हाताळताना करायचे होते. जे त्यांनी केलेत आणि त्यात ते कितपत यशस्वी झालेत हे येणाऱ्या काळात कळेलच.
संगीत:
एक एव्हरेज पातळीच्या खालच्या पातळीचे संगीत आणि ते ही चार-पाच संगीतकार असूनही. अर्थात सगळे नवीन होते कुणीही ओळखीचे नव्हते पण जो फरक पडायचा तो पडलाच.
कपिल शर्माचा शो हा विनोदाच्या तड्क्यामुळे लोकप्रिय झाला होता. त्यात त्याने चित्रपट सृष्टीतील दिग्गजांना बोलावून त्यांची मुलाखत विनोदी अंगाने घेण्याचा प्रयत्न केला. जो तुफान लोकप्रिय ठरला आणि कपिल शर्मा रातोरात स्टार बनून गेला.तो लोकप्रिय होता कि नव्हता किंवा कितपत लोकप्रिय होता हा चर्चेचा विषय होईल अगदी मतमतांतरासहित. पण त्याने त्याची दखल घेण्यास बाध्य केले हे कुणीही मान्य करेलच. सुपरस्टार शाहरुखखानचा स्वत:बद्दलचा एक कोट आहे "you can love me, you can hate me but you can not ignore me”. हा कोट त्याने माय नेम इज खान वर होणार्या टीकेच्या काळात स्वत:ला टीकेपासून वाचवताना वापरला होता. त्याच धर्तीवर कापिल्साठी मी म्हणेन “You can love Kapil, you can hate Kapil but yo can not ignore Kapil” पण या चित्रपटाला मी १/२ अर्धा स्टार * देईन (कपिल शर्मा आवडत असूनही एक चित्रपट म्हणून) बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा