माझ्या कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माझ्या कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

बघ काही सुचतंय का?

बघ काही सुचतंय का?

रात्रिच्या त्या काळोखात
अंधाराच्या अनेक अदात
अदांच्या त्या नशील्या पळात
पळ पळ पुढे सरकताना
कधी- कधी.....
मीच मला विचारतो
बघ काही सुचतंय का?............

नशिबाच्या सरकत्या डौलावर
मैलो-न-मैल निर्विकार जगण्यावर
जगण्यातल्या तृप्त-अतृप्त तेवर
अनेक हव्यासांच्या मृगजळावर
विचार करताना....
कधी- कधी.....
मीच मला विचारतो
बघ काही सुचतंय का?............

निसर्गाच्या अपुर्वाईला धरताना
तृणपातापरि आयुष्य वेचताना
कण्-कण जगणे धुंडाळताना
दु:खाच्या वर्षावात सुखाची छ्त्री बनताना
कधी- कधी.....
मीच मला विचारतो
बघ काही सुचतंय का?............

वळणदार पण कृत्रीम चौकटीवर
चौकटीमध्ये बदध चाकोरीवर
चाकोरितील व्यस्त प्रमाणावर
प्रमाणाच्या प्रमाणाबाहेर वळणावर
विचार करताना....
कधी- कधी.....
मीच मला विचारतो
बघ काही सुचतंय का?............

जगण्यातील क्लिष्टता समजुन घेताना
समजताना होणारा त्रास भोगताना
भोगाच्या शक्या-शक्यतेवर प्रकाशताना
प्रकाशाचे ते मनस्विपण पुन्हा पुन्हा जगताना
कधी- कधी.....
मीच मला विचारतो
बघ काही सुचतंय का?............

-समीर 

रविवार, २० मार्च, २०१६

इच्छा नि आवश्यकता



"आवश्यकता" हा जीवनाचा न टाळण्याजोगा भाग
त्या देर-सवेर पुर्ण होतातच
काळानुसार  कधी ना कधी
त्या पुर्ण होण्यासाठी पळवाट मिळवतातच

खरा प्रश्न हा असतो कि
इच्छांना महत्व द्यावे कि आवश्यकताना??
दोघींचेही एकमेकांशी सख्य
पण नशिबाचा कस लागतो प्रत्यक्षात उतरताना

आवश्यकता कुणाच्याही शेवटी  पूर्ण होतातच
त्यात काहीही नवल नसते  
पण आवश्यकतांनी  इच्छांच रूप घेतल
आणि मग कुणि लक्ष्य मिळवलं तर मात्र नवल असते

आवश्यकता या  एखाद्या फकीराच्याही असतात
कशाही तो त्या पूर्ण करतोच करतो !!!
आणि इच्छा या एखाद्या राजाच्याही असतातच
त्या साठी तो गाऱ्हाणे  रडतोच रडतो !!!

हाच असेल बहुधा  देवानी नेमलेला
नशिबाचा मुख्य कार्यभाग
सगळ्यांना नेहमीच सगळंच मिळाल
तर देवाने शेवटी कुठे घ्यावा सहभाग

-समीर 

मंगळवार, ३० जून, २०१५

कविता

कविता 
कविता लिहिणे अन कविता बनवणे 
यात काय फरक असावा?? 
शब्दरचना अन व्याकरण जमेलहि पण 
विचारसरणीतील 'नेमकेपणाकुठून यावा !!

फक्त कमी शब्द वापरून भावना पोचवणे 
हेच कवितेचे यश आहे
पण त्या भावना नीट समजावून घेणे 
हेच रसिक मनाचे लक्षण आहे

कुणी भावनांना महत्व देईल तर कुणी शब्दांना
वय आणि अनुभव यावर हे अवलंबून आहे
पण कुठून ना कुठून भावनांना वाट सापडते
वास्तविकतेत यालाच महत्व आहे

शब्द न शब्द जोडून
ओळ ओळ बनेलहि
डोकं थोSSड वापरून यमक
पण जुळेलहि…………

पण शब्दांशी शब्द जुळवून
कविता कदाचित लिहिल्या जाईल
पण त्यात अर्थ नसला तर
"कविता बनवणे" या पासून कवी दूर राहील

लिहिणे जसे सर्वसमावेशक  
तसेच वाचनही अनेकानेक  कंगोरे स्पर्शणारे असावे
टीका करून लक्ष वेधणे इतकाच  क्षुल्लक हेतू नसावा
तर प्रतिक्रियेने कवीस आत्मचिंतनास बाध्य करावे

-समीर  

मंगळवार, ९ जून, २०१५

देवाचा 'सुपर कंप्युटर'

सहज अस वाटल,कि देवा जवळ समजा सुपर कॉम्प्यूटर असला तर तो किती बिझी असेल,म्हणजे पहा ना प्रत्येकाच्या पाप अन पुण्यांचे हिशेब ठेवण प्रत्यक्ष देव जरी असला तरी लोकसंख्या इतकी आहे  कि त्याला जिकिरीच जात असेल.एक तरी सुपर कोम्पूटर असेलच .फॉर ex. या व्यक्तींनी मागच्या जन्मात हे पुण्य केल आहे त्याला या जन्मात हे सुख द्या या दुसर्या व्यक्तींनी मागच्या जन्मात हे पाप केल होत याला हे दु: द्या किती जिकिरीच काम असेल .जर कविता लिहू असे म्हटले तर किती खतरनाक सब्जेक्ट होईल

देवाचा 'सुपर कंप्युटर'
देवाचा हिशेब कसा असेल
मला पडला होता प्रश्न
उत्तर शोधता शोधता उत्तर गवसलं
अन चक्क भेटला वरचा  सुपर कम्प्युटर

विचार करा किती त्रासला असेल तो
देवाचा 'सुपर कंप्युटर'
कारण म्हणे हिशेब ठेवण नसते जोक
खास करून अजिबात नाही 'वर'

या व्यक्तीने केल फक्त  इतकच  पुण्य
याला आता  घडवा हा दैवयोग
अन त्या  व्यक्तीचे हे पाप
याला आता फक्त योगायोग

यांनी हि सेवा
केली होती त्या वेळेस
म्हणून याचं काम
अडायला नको या वेळेस

बर देवही नसेल  पक्का
आपल्याच निर्णयावर
दर वेळेस त्याचीच कमांड फिरते
चित्रगुप्ताच्या  कोणत्याही डिसिजनवर

कुणाजवळ उपलब्ध  असते 
केलेल्या पापांना डिलीटचे ऑप्शन
कुणाला  तोही  पर्याय  नाही
उरते यमाचे फक्त लांच्छन

कधी मी असा  विचार करतो कि
मी चित्रगुप्त नाही हे किती बरय
अप्पर व्ह्यू ने ब्रॉड गोष्टी
बघाव्या लागत नाहीत हे किती चांगलय

'हा' म्हणे मागच्या जन्मात
होऊच शकायचा नाही एकाग्र
मग त्याला या जन्मात
बनवा एकदम कुशाग्र

'हिचा' म्हणे मागच्या जन्मात
देवावर नव्हता विश्वास
या जन्मात देवाला
वाटली पाहिजे भक्ती खास

हा होता मागच्या जन्मात
अगदीच जीवन वेस्ट
याला बनवा या जन्मात
अगदी समकक्ष बिल गेट्स

'हा' म्हणे मागच्या जन्मात
होता राजकीय पण अपयशी कार्यकर्ता
याला म्हणे मग या जन्मात
बनवा त्याच पक्षाचा सर्वेसर्वा

मग वेळ आली कि
मीच त्याला थांबवल
म्हटल तुझी आपबिती बस झाली
आता माझ डोक गरगरल

मला भारतीय नोकरशहांची सवय
म्हटल बोल मित्रा काही जमते का?
माझ पाप असेलच हिशेबात
पुण्यात बदलण शक्य वाटते का 

मग शेवटी तो म्हटला
म्हणे इथे होत नाहीत कोणतेच काम भ्रष्ट
म्हणे देवाचा पूर्ण वचक आहे
विचारहि   करू नका नतद्रष्ट


समीर

गुरुवार, ४ एप्रिल, २०१३

टीव्ही वरची धूळ

टीव्ही वरची धूळ
नेहमीच्या भांडणाला कारण मिळाल
पण देव-दयेने त्याच टीव्हीतल्या सासू-सुना योग्यवेळी भांडल्या 
अन त्या रोजच्या भांडणात 
आमच भांडण विरलं 

तीच वाढत वजन 
आमच्या भांडणाला पुन्हा एक कारण बनल 
पण त्याच वेळी पिझ्झा हट वाल्यांची 
फ्री होम डिलिव्हरी मी स्मरली 
अन आमच भांडण विरलं 

फिरायला जाऊया म्हणे 
गमतीत गाडी पेट्रोल पंपावर टाकली 
नेहमीचं भांडणाला कारण बनलं 
अन त्याच वेळी नेमका गाडीनी ड्रायचा दिवा लावला 
त्या क्षीण प्रकाशात 
आमच भांडण विरलं 

आमच्या भांडणाच सदाहरित कारण 
तिच्या दिसण्यावर मी दिलेली कॉमेंट 
पुन्हा एकदा कारण बनल 
पण नेमका त्याच वेळी आय सर्जन मित्राचा फोन यावा 
तिच्या डोळ्यांची त्याने चौकशी करावी 
भौजींच्या त्या चौकशीत आमच भांडण विरलं

तिचा नि माझा 
स्वयंपाक घरातला प्रवेश 
दिसण्या इतकच आमच्या भांडणच सदाहरित कारण बनल 
पण नाही म्हटल तरी पंजाब्यांच कौतुक 
त्यांनी सगळीकडे धाबे काढले 
त्या प्लान मध्ये 
आमचं भांडण विरलं 

-समीर