मुंबई-पुणे-मुंबई=2
मुंबई-पुणे-मुंबई या
आपल्याच गाजलेल्या आधीच्या सिनेमाचा पार्ट-२ म्हणजेच सिक्वेल घेऊन दिग्दर्शक सतीश राजवाडे
आलेले असून आधीच्याच कहाणीला पुढे नेत त्यांनी एक उत्तम प्रयत्न सादर केलेला आहे. दिवाळीला
एकमेकांसोबतच तीन चित्रपट प्रदर्शित झालेत आणि त्यापैकी दोन मराठी पण सांगण्यात आनंद कि दोन्ही मराठी चित्रपट अक्षरश: पुरून उरलेले आहेत
राजश्रीच्या चित्रपटाला. "कट्यार काळजात
घुसली" आणि "मुंबई-पुणे-मुंबई २"
हे सिद्ध करतात कि चांगले मराठी चित्रपट असले
तर आजच्याहि जमान्यात मल्टिप्लेक्सलाहि तिकीट मिळत नाही इतकी गर्दी खेचू शकतात.
सुट्टी असो वा नसो पण मराठी चित्रपटांनी आजच्या जमान्यात तिकीट बारीवर शब्दश: अलोट
गर्दी खेचणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. स्वप्नील
जोशी आणि मुक्ता बर्वे हे दोघंही आधीच्याच भागाप्रमाणे याही भागात असून त्यांनी त्यांची
कहाणी पुढे नेलेली आहे आणि आधीच्या भागात त्यांची
नावे नव्हती फक्त एक मुंबईचा आणि एक मुंबईची अशी सारवासारव होती पण या भागात नामकरण करून गौतम
प्रधान आणि गौरी देशपांडे यांची कहाणी नीटपणे मांडलेली आहे.
गौतम प्रधान हा पुण्याचा
मुलगा आणि गौरी प्रधान हि मुंबईची मुलगी यांचा विवाहसोहळा संपन्न कसा होतो या धाग्याभोवती
वेवेगळ्या अंगांनी फिरणारी कहाणी म्हणजे मुंबई-पुणे-मुंबई २. पण यात समाधान कि कहाणीत
कोणतेही फिल्मी ट्विस्ट नाही. वास्तविक बघता अंगद म्हैसकर (अर्णव) च्या व्यक्तिरेखेने
प्रेक्षकांना अशी शंका बरेचदा येते आणि त्यातही अभिनेत्री तिच्या निर्णयाबद्दल पक्की
राहात नाही त्यामुळे या संशयाला बळकटी मिळते पण सरतेशेवटी चित्रपट "शेवट गोड"
करून संपतो. पण सतीश राजवाडे हे लेखक-दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांना थोडेफार कन्फ्युज
करण्यात यशस्वी ठरलेले आहेत.
चित्रपटाची पहिल्या
भागातील लोकप्रियता लक्षात घेता दुसया भागाची लोकप्रियता आधीच आगाऊ ठरवून/अपेक्षित
धरून सतीश राजवाडेंनी बरेचसे प्रयोग करून बघितलेत मार्केटींगचे या भागात. बाकी जाऊ
देऊ पण खानविलकर कि कोणीतरी या बिल्डर्सची जाहिरात करून देण्याची पद्धत त्यांनी वापरली.
अविनाश-विश्वजित या
संगीतकार जोडीलाच पहिल्या भागाप्रमाणे याहि भागात राजवाडेंनी रिपिट केलेले आहे. पण
पहिल्या भागात "कधी तू" आणि "का कळेना" या दोनच गाण्यांनी जो प्रभाव
या जोडीने निर्माण केला होता त्यांच्या १०%हि या वेळेस नाही. मान्य असो वा नसो पण या
दोन गाण्यांचे पहिल्या भागाच्या यशातील योगदान दुर्लक्षित करण्यासारखे नव्हते. या वेळेस
त्यांना ती जादू री-क्रिएट करणे अजिबात जमलेले नाही.
प्रेम आणि त्यानंतर
लग्नाची/लग्नासाठी/लग्नापर्यंत इत्यादी इत्यादी जुळवाजुळव हा नाही म्हटले तरी सर्व
वयोगटांत इंटरेस्टिंग विषय आहे. यावर मराठी चित्रपटात प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे
संवाद (dialogues ) पण अश्विनी शेंडे या लेखिकेने पटकथा आणि संवाद हि दुहेरी जबाबदारी
सांभाळूनही दोन्हीकडे उत्तम न्याय केलेला आहे. त्यातही त्यांच्या संवाद लेखनासाठी त्यांचे
विशेष कौतुक.
स्वप्नील जोशी आणि
मुक्ता बर्वे या जोडीला सांभाळत सतीश राजवाडेंनी त्या दोघांकडूनही उत्तम अभिनय करवून
घेतलाय पण मागील भागातली अविनाश-विश्वजित हि जोडी संगीत आघाडीवर सपशेल अपयशी ठरलेली
आहे. काही प्रसंगात "कधी तू" हे background म्हणून वापरले असते तरी चालले
असते असे उगाचच प्रेक्षकांना बरेचदा वाटून जाते. मला सगळंच आवडल विशेष करून संवाद पण
संगीताने माझा भ्रमनिरास केला म्हणून मी चित्रपटाला साडे तीन (३१/२)* स्टार देईन बाकी
निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

छान केलंय परीक्षण !
उत्तर द्याहटवाthank you
उत्तर द्याहटवा