कविता
कविता लिहिणे अन कविता बनवणे
यात काय फरक असावा??
शब्दरचना अन व्याकरण जमेलहि पण
विचारसरणीतील 'नेमकेपणा' कुठून यावा !!
फक्त कमी शब्द वापरून भावना पोचवणे
हेच कवितेचे यश आहे
पण त्या भावना नीट समजावून घेणे
हेच रसिक मनाचे लक्षण आहे
कुणी भावनांना महत्व देईल तर
कुणी शब्दांना
वय आणि अनुभव यावर हे अवलंबून
आहे
पण कुठून ना कुठून भावनांना वाट सापडतेच
वास्तविकतेत यालाच महत्व आहे
शब्द न शब्द जोडून
ओळ न ओळ बनेलहि
डोकं थोSSड वापरून यमक
पण जुळेलहि…………
पण शब्दांशी शब्द जुळवून
कविता कदाचित लिहिल्या जाईल
पण त्यात अर्थ नसला तर
"कविता बनवणे" या पासून कवी दूर राहील
लिहिणे जसे सर्वसमावेशक
तसेच वाचनही अनेकानेक कंगोरे स्पर्शणारे असावे
टीका करून लक्ष वेधणे इतकाच क्षुल्लक हेतू नसावा
तर प्रतिक्रियेने कवीस आत्मचिंतनास बाध्य करावे
-समीर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा