इर्शाद
प्रथितयश नट-कवी-गीतकार-आधुनिक काळातील तरुणाईला कवितांच्या जवळ आणणारे व्यक्तिमत्व संदीप खरे आणि कवी वैभव जोशी यांनी रसिकांच्या सेवेत "स्वरचित कवितांची एक मुक्त मैफल" नावाची संकल्पना आणली असून आज या संकल्पनेच्या दुसऱ्या प्रयोगाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.
प्रथितयश नट-कवी-गीतकार-आधुनिक काळातील तरुणाईला कवितांच्या जवळ आणणारे व्यक्तिमत्व संदीप खरे आणि कवी वैभव जोशी यांनी रसिकांच्या सेवेत "स्वरचित कवितांची एक मुक्त मैफल" नावाची संकल्पना आणली असून आज या संकल्पनेच्या दुसऱ्या प्रयोगाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.
Sandip Khare autograph -
आयुष्यावर बोलू काही या गाणे\कवितांच्या अजरामर संकल्पनेतून कवितावाचन या संकल्पनेशी तरुणाईचा अन रसिकांचा परिचय झाला. याच संकल्पनेला पुढे नेत, बऱ्याच कवींच्या स्वरचित अप्रतिम कविता ज्या संगीतबद्ध नाहीत किंवा नाद-लय नसल्यामुळे टेक्निकली कमी पडून संगीतबद्ध होण्यास अडचण निर्माण होते अश्या कवितांना रसिकांसमोर आणण्याची एक संधी या मैफिलीतून मिळालेली आहे. मान्य असो व नसो हि संकल्पना एक अभिनव कल्पना असून फार लवकर लोकप्रियतेच्या शिखरावर पोचेल असा भरवसा मला आज दुसऱ्याच प्रयोगातून झाला.
कविता वाचनाच्या कार्यक्रमात संगीत नसल्यामुळे हा कार्यक्रम 'रटाळ' होण्याची पुरेपूर संधी होती. पण संदीप खरेंची शैली आणि त्या शैलीला वैभव जोशींची मिळालेली पुरेपूर साथ अन मिळालेली कार्यक्रमाला उपस्थित इतर सेलिब्रिटींची जोड या सर्व एकत्रित सहभागातून तीन तासांहून काही मिनिटे जास्त रंगलेला हा कार्यक्रम शब्दश: अप्रतिम होता.
या कार्यक्रमाचा उद्देश स्वरचित कविता इतका स्पष्ट असला तरी त्यांना वाटलेल्या त्यांच्या मित्रमंडळीत इतर कवींच्या अप्रतिम कवितांचा समावेश या कार्यक्रमात करण्यात आलेला होता. हा कवितेच्या निवडीवर श्री संदीप खरेंच्या व्यावसायिकतेची पूर्ण छाप होती. प्रेम-तरुणाई-पाऊस-म्हातारपण इत्यादी असंख्य विषयांना स्पष्ट करणाऱ्या कविता कार्यक्रमात होत्या. या सगळ्या कवितांच्या समावेश स्पष्ट उल्लेख संदीपजींनी कार्यक्रमातून विशद केला कि उत्तम कवितांचा परिचय रसिकांना व्हावा.
हि संकल्पना नवीनच असली, अन संगीताविना असली हे एक महत्वाचे असले, तरीही या अप्रतिम संकल्पनेसाठी संदीप खरे अन वैभव जोशी या दोघांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
-समीर




