शोले
शोले चित्रपटाला आज रिलीज होऊन अर्थात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्याची संधी मिळून आज चाळीस वर्षे पूर्ण झाली. कधी कधी मी विचार करतो कि मला शोले का आवडला? १.आजूबाजूचे सगळे कौतुक करत असल्याचा तो मानसिक परिणाम असेल काय? कि २.खरच त्यातला अभिनय/संगीत/कथा/पात्रनिवड/
शोलेतला अभिनय हि शोलेची सर्वाधिक जमेची बाजू अस माझ मत आहे. सलीम-जावेद च्या कथा अन पटकथेला आर डी बर्मन च्या संगीत अन पार्श्वसंगीताने साज चढवला अन रमेश सिप्पीची पात्रनिवड अन दिग्दर्शनाने त्यावर कळस चढवला.अभिनयात शोले मध्ये सगळे-सगळे आपापल्या भूमिकांत शोभले अगदी गब्बर सिंग पासून ते अगदी छोटीशी भूमिका असलेल्या सुरमा भोपाली पर्यंत. अभिनयात कुणालाही काहीही बोट दाखवता येणार नाही असे चित्रपट भारतीय सिनेसृष्टीत खूप कमी आहेत. पण जे आहेत त्यात शोले वरच्या क्रमांकावर आहे. आज मागे वळुन बघताना शोले चे कौतुक कशासाठी करावे अन कशासाठी नाही असा विचार लोकांना पडतो यातच शोलेचे यश सामावलेले आहे.
भारतीय सिनेसृष्टीत सर्व दृष्टीने परिपूर्ण असे दोनच चित्रपट सध्या मला वाटतात. हा कदाचित मला नसलेल्या अनुभवाचा परिणाम असेल किंवा नसलेल्या ज्ञानाचा. पण १. शोले आणि २ हम आप के है कौन हे दोन मला सर्व दृष्टीने पैसा वसूल चित्रपट वाटतात, पूर्ण कुटुंबाला नेऊ शकू असे आणि आजोबांपासून ते लहान भावांपर्यंत कुणीही कंटाळणार असे कारण सगळ्या वयांसाठी काही ना काही या दोन्ही चित्रपटात आहे. सुपरस्टार शाहरुख खानच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ला नुकतेच १००९ आठवडे पूर्ण झाल्याची बातमी नुकतीच कुठेतरी वाचली.याही चित्रपटाने असाच विक्रम नोंदवावा यासाठी सुपरस्टारला शुभेच्छा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा