गुरुवार, २५ डिसेंबर, २०१४

पीके



पीके 

विधू विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी हि जोडी म्हणजे यशाची हमखास खात्री अस समीकरण होत, मग जर यश मिळतेच आहे तर तीच टीम घेऊन नि तश्याच मनोरंजनात्मक पद्धतीने थोडाफार जनजागृतीचा प्रयत्न का करू नये या विचाराने याच जोडीचा नवीन चित्रपट म्हणजे पीके. राजकुमार हिरानीची कथा म्हणजे कल्पनाशक्तीचा असलेला सुयोग्य वापर आणि आणि त्याच कथेत उत्तमोत्तम पात्र अन त्या पात्रांची आपापसात असलेली अभिनयाची जुगलबंदी अस एक समीकरण बनलेलं होत. सर्किट-मुन्नाभाई-फरहान--राजू रस्तोगी-रांचो आणि व्हायरस असे अनेक उदाहरणं घेता येतील. शंतनू मोईत्रा चे संगीत आणि अभिजात जोशी चे कथा व पटकथा लेखन हा त्या सगळ्या यशस्वी कडीतील पाया. याही वेळेस पडद्यावर असलेले कलाकार जवळपास तेच असले तरी पडद्यामागची टीम पूर्ण तीच होती. कुटुंबासमवेत चित्रपट बघण्यासाठी जाता येईल असे केवळ दोन नावं हिंदी चित्रपटसृष्टीत आहेत. सुरज बडजात्या आणि राजकुमार हिरानी. याही वेळेस प्रयत्न पूर्ण असलेला जाणवतो पण भट्टी जमलेली नाही.
अभिनय:
आमिर खान त्याची अभिनय क्षमता यावर कुणाचा आक्षेप असण्याची शक्यताच नाही पण प्रत्येक अभिनेत्याला जीवनात एक कठीण भूमिका मिळते. माझ्यामते पीके हे अमीरखानच्या आता पर्यंतच्या करिअर मधील सगळ्यात वेगळी अन कठीण भूमिका.
आणि अमीर खान शब्दश: त्याच वेगळेपण आणि अभिनयक्षमता सिद्ध करतो या भूमिकेने. आता या अंतराळातील त्रांगड्यात
जनजागृतीच्या दृष्टीने सौरभ शुक्ला (तपस्वी) या व्यक्तिरेखेचा समावेश राजकुमार हिरानीने केलेला आहे पण.....
दिग्दर्शन:
हिंदी चित्रपट हे अंतराळ किंवा तत्सम बाबीवर जेंव्हा बनतात तेंव्हा हे हॉलीवूड नसल्यामुळे बजेट चा प्रश्न असतोच. हा सिनेमाही अगदी दिग्दर्शकच एक निर्माता असला तरी याला अपवाद ठरलेला नाही. पण राजकुमार हिरानीने खरोखर अमीर खानच्या व्यक्तिरेखेला हाताळण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही.पण अभिजात जोशीबरोबर मिळून त्याने लिहिलेल्या पटकथेची गती इतकी मंदावते कि प्रेक्षक irritate होण्यापर्यंत. हि चूक अनवधानाने झाली असावी हे स्पष्ट आहे पण पटकथेची मंदावलेली गती या चित्रपटाच्या कमर्शियल एक्सलंस वर असर टाकणार हे नक्की. एक अत्युत्कृष्ट व्यक्तिरेखा चित्रपट तडीस नेत नाही हे प्रेक्षक नक्कीच जाणून आहेत.

मी आमिर खान च्या अभिनयासाठी मुखत्वे पीकेला अडीच (२ १/२*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, ७ डिसेंबर, २०१४

एलिझाबेथ एकदशी (मराठी)



एलिझाबेथ एकदशी (मराठी)

सध्या गाजणाऱ्या होणार सून मी या घरची या मालिकेच्या लेखिका मोठ्या पडद्यावर उतरल्या असून मधुगंधा कुलकर्णी यांचा चित्रपट कथा लेखिका म्हणून पहिलाच चित्रपट म्हणजे एलिझाबेथ एकादशी.
एलिझाबेथ हि एक सायकल अन घरच्या परिस्थितीमुळे तिला विकण्याची असलेली गरज, मग घरातल्या लहान मुलांचा त्या सायकलीला वाचवण्याचा प्रयत्न अन त्या प्रयत्नाभोवताल फिरणारी कथा म्हणजे एलिझाबेथ एकादशी.
आजकालच्या काळात "मनोरंजनाचा एक तरतरीत डोस" या नावाखाली वास्तविकतेशी फटकून असलेल्या तद्दन निर्बुद्ध अन फुटकळ कथा आजकाल दिसतात. लेखिका मधुगंधा कुलकर्णी या स्वत:च एक निर्मात्या असून त्यांनी हरिश्चंद्राची factory फेम दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या सोबत एक उत्तम कथा तीन तासात बांधलेली आहे. कौटुंबिक पातळीवर रंगवलेली एक अप्रतिम कथा असून श्रीरंग महाजन या बाल अभिनेत्याचा उल्लेख करावाच लागेल. या लहान मुलाने कथेच्या मागणीप्रमाणे अक्षरश: एकहाती तोलून धरलेली कथा आहे हि. आणि म्हणूनच बहुधा दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी त्याच्यावर विसंबत त्याला कथेत
पूर्ण स्कोप दिलेला आहे.
एकूणच, गाणे नाही,मोठमोठे सेट्स/कलाकार नाहीत आणि कथाही एकदम हायफाय वगेरे वगेरे नाही पण एक वास्तविकतेवर अवलंबून असलेली कथा,इतकी वास्तविक कि चित्रपटातले पात्र वास्तविक जीवनात कुठे-ना-कुठे आपल्याला भेटल्याचे जाणवून जाते प्रेक्षकांना बघितल्यावर.
मी या चित्रपटाला ४.५ * देईन ५ पैकी,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, १६ नोव्हेंबर, २०१४

किल-दिल


किल-दिल

श्री यशजी निवर्तल्यानंतर त्यांच्या यशराज फिल्म्स या चित्रपट निर्मात्या कंपनीची धुरा नवीन सी इ ओ आदित्य चोप्राकडे आल्यापासून यशराज फिल्म्सचा चित्रपट दर्जा खालावला असून,कदाचित आजकालच्या मल्टीप्लेक्सच्या जमान्यात कमर्शियल एक्सलंसची कमी झालेली चिंता हे याचे महत्वाचे कारण असू शकते असा अंदाज प्रेक्षकांनी लावायला हरकत नाही असे वाटून जाते.
"जय हो" अन "किक" सारखे शब्दश: ठोकळे करोडे रुपये घेऊन जातात ते किल दिल सारख्याने चित्रपट निर्मितीचा खर्च वसूल करायला काहीच हरकत नसावी.
देव (रणवीर सिंग) आणि टूटू (अली जफर) या दोन अनाथ मित्रांची भय्याजी (गोविंदा) यांच्या अंडर घडलेली जीवनकथा म्हणजे किल-दिल. फक्त दोन हिरो घेऊन चित्रपट चालण्याचा जमाना संपून युग लोटले आहे याचा निर्माता आदित्य चोप्राने लावलेला योग्य अंदाज व कथेत परिणीती चोप्राचा केलेला समावेश.

दिग्दर्शन:
"साथिया" आणि "बंटी और बबली" चे दिग्दर्शक शाद अली यांचे बर्याच काळानंतर प्रेक्षकांना किल-दिल चे दिग्दर्शक म्हणून दर्शन घडते.

अजिबात चित्रपटातल्या कथा/पटकथा/अभिनेता/अभिनेत्री इ.इ. गोष्टींकडे लक्ष न देता फक्त मनोरंजनाचा एक तरतरीत डोस म्हणून चित्रपट बघणारा एक वर्ग बॉलीवूड मध्ये गेल्या काही काळात निर्माण झालेला आहे. त्या वर्गाला डोळ्यापुढे ठेवून काढलेला एक चित्रपट म्हणजे किल-दिल.
किल-दिलला मी १/४ (पाव) स्टार देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, २० सप्टेंबर, २०१४

दावत-ए-इश्क



दावत-ए-इश्क

यशजी निवर्तल्यानंतर यशराज फिल्म्स या चित्रपट निर्मात्या कंपनीचे प्रायोरिटीज बदलल्या असून आघाडीच्या चित्रपट कलाकारांना घेऊन "हुंडा" यासारख्या ज्वलंत विषयावर चित्रपट निर्मिती करण्याची रिस्क आदित्य चोप्राने घेतलेली आहे.मागील वर्षी आलेल्या यशराजच्याच आणि याच जोडगोळीला घेऊन असलेल्या "इशकझादे" या चित्रपटाचे दिग्दर्शक हबीब फैसल पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक नवीन कलाकृती घेऊन आले असून दावत-ए-इश्क म्हणजेच मराठीत प्रेमाची मेजवानी.

कहाणी:
गुलरेझ कादिर उर्फ सानिया हि हैदराबाद मध्ये राहणारी एक मुस्लिम लग्नाळलेली तरुणी. पण हुंडा या गोष्टीमुळे लग्न जमत नसलेली.अतिशय हुशार व अमेरिकेत जाण्याची वगेरे स्वप्ने बाळगणारी. भारतीय संविधानातील हुंडाविरोधी कलम ४०९-A
चा दुरुपयोग करण्याचे ठरवून हुंडा तर द्यायचा पण हुंडा दिल्यावर ज्यांनी घेतला त्यांना धडा शिकवायचा या कलमाद्वारे असे ठरवते.मग तारिक हैदर उर्फ तारू व त्याच्या परिवाराला त्यांनी हुंडा मागितला म्हणून धडा शिकवायचे ती ठरवते. तिच्या या प्रयत्नाभोवताल कथा फिरते आणि ती त्याच्या व तो तिच्या प्रेमात पडून संपते.

दिग्दर्शन:

हबीब फैसल यांनी व्यवस्थित हाताळलेली कहाणी आहे अन्यथा हुंडा व भारतीय संविधानाचा प्रत्यक्ष उल्लेख यांचा परस्परसंबंध
जोडण्यात/समजण्यात/समजावण्यात/पडद्यावर उतरवण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला असता तर प्रॉब्लेम झाला असता पण हबीब फैसल यांनी सगळ व्यवस्थित हाताळलं.

यशराज फिल्म्सची खासियत असलेले संगीत या सिनेमात बघावयास/ऐकावयास मिळत नाही. पण एक उल्लेखनीय कि जब तक है जान इतकी पातळी खालावलेली नाही.साजिद-वाजीद हे एकदम उत्कृष्ट नसले तरी "ठीक" पातळीवर आहेत. पण लेखक-पटकथा लेखक हबीब फैसल हे कथेची व पटकथेची मंदावलेली गती सावरण्यात यशस्वी ठरलेले नाहीत.

एका आघाडीच्या हिंदी चित्रपट निर्मात्याचा आघाडीच्या कलाकारांना घेऊन असलेल्या हुंडा या भारतीय समाजजीवनातील प्रश्नावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला मी २* देईन.बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा .
-समीर

शनिवार, ९ ऑगस्ट, २०१४

रमा-माधव (मराठी)



रमा-माधव (मराठी) 

२० वर्षापूर्वी स्वामी या मालिकेतून "रमा" या भूमिकेने अभिनेत्री म्हणून पदार्पण करणाऱ्या मृणाल कुलकर्णी आता दिग्दर्शक म्हणून त्याच कथेला प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आलेल्या आहेत. नुकतेच मागील वर्षी "प्रेम म्हणजे प्रेम असत" या चित्रपटाने त्यांनी दिग्दर्शक म्हणून सुद्धा पदार्पण केल. आणि आता हा त्यांचा दुसरा चित्रपट.
रमाबाई पेशवे आणि माधवराव पेशवे यांची लव्ह स्टोरी वगेरे इतिहासात प्रसिद्ध नाही (बाजीराव-मस्तानी सारखी) पण तरी त्यांनी या कथेला निवडलं आणि निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मृणालजींनी.
कहाणी:
रमाबाई व माधवरावांचा त्या कालच्या परंपरेप्रमाणे बालविवाह. मग वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी त्यांच्या शनिवारवाड्यातल्या आगमनापासून कथेची सुरवात आणि त्यांनी माधवरावांसोबत सदेह सती गेल्याच्या कथेवर शेवट. त्या दोघांच्या सहवासावर आणि सहवासातून फुलणाऱ्या प्रेमावर कथावस्तू टायटलनुसार डिपेंड असेल हि प्रेक्षकांची अपेक्षा लेखक व दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी पूर्ण करू शकत नाहीत. पानिपतचा पराभव अन त्या युद्धात झालेली सदाशिवराव भाऊ अन विश्वासराव यांची हानी याचा समावेश कहाणीत आपोआप होतो. नव्हे करावाच लागतो कारण त्या शिवाय कहाणी पुढे सरकत नाही. पण सदाशिवराव भाऊंचा एक तोतया
पुढे माधवारावांपर्यंत पोचतो आणि सदाशिवराव असण्याचा दावा करतो या क्षुल्लक गोष्टीचा कहाणीत का समावेश केला असावा हे प्रेक्षकांना कळत नाही. राक्षसभुवनची लढाई अन निजामाविरुद्ध मिळवलेला विजय या गोष्टीला जरा जास्तच महत्व दिल्या जाऊन अमराठी प्रेक्षकांचा समज माधवरावांच contribution फक्त तितकच आहे कि काय अशी होईल अशी शंका येते. राजयक्ष्मा किंवा स्टमक कॅन्सर याची सरमिसळ होण्याइतकी दोन्ही संकल्पनाची सरमिसळ आहे.
अभिनय:
लहानगी रमा म्हणून श्रुती कार्लेकर हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेले आहे. आणि दिग्दर्शकाने हे ओळखून तिला व्यवस्थित हाताळलेल आहे.प्रसाद ओक यांनी साकारलेल्या अप्रतिम राघोबा दादांचा उल्लेख करावाच लागेल. अप्रतिम भूमिका त्यांनी निभावलेली आहे राघोबदादांची. श्रुती मराठे (राधा हि बावरी फेम) हिचेही पार्वती बाईंच्या भूमिकेतून प्रेक्षकांना दर्शन घडते.
पण आलोक राजवाडे यांचा माधवराव प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही, हे नक्की.
दिग्दर्शन:
मृणाल कुलकर्णी यांनी पदार्पणातच प्रेम म्हणजे प्रेम असत या चित्रपटात एक मोठ्या वयाची लव्ह स्टोरी हाताळली होती. थोडक्यात एक वेगळा विषय. आणि हा विषयही थोडाफार वेगळाच. पण मुळात हा विषय इतिहासावर जरा जास्तच अवलंबून असल्यामुळे आणि त्या काळातली माहिती उपलब्ध नसल्यामुळे जो फरक पडायचा तो पडतोच. उदाहरणार्थ रमाबाईंच्या सती जाण्यावर जर शेवट करायचा होता तर सती कस जातात याची माहिती कदाचित उपलब्ध नसावी त्यामुळे शेवटी २-३ ओळीत प्रेक्षकांना फक्त सांगुत शेवट केलेला आहे. राघोबादादांच्या काळ्या जादुविषयक कथेला पुढे सरकवताना सुरवातीला काळ्या जादूला समर्थन मिळावे असा निर्माता/दिग्दर्शकाचा कोणताही हेतू नाही अशी डिस्क्लेमर मात्र मिळते.

मराठीतला एक वेगळा प्रयत्न आणि रमाबाई-माधवराव या इतिहासात दुर्लक्षित असलेल्या एका जोडीला लाइमलाईट मध्ये आणण्याचा प्रयत्न असणार्या या चित्रपटाला मी २* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

पोष्टर बॉयज- (मराठी)





पोष्टर बॉयज- मराठी 

मराठी सिनेमांचा ट्रेंड निश्चितपणे बदलू लागला असून, श्रेयस तळपदे सारखे नव्या दमाचे निर्माते वेगवेगळ्या धाटणीच्या विषयांना स्पर्श करून चक्क मराठीत सिनेमा बदल घडवू इच्छिताहेत आणि निर्माते श्रेयस तळपदे यांचा पोष्टर बॉयज हे त्याचं एक शानदार उदाहरण.श्रेयस तळपदे यांनी त्यांच्या बॉलीवूड contacts चांगला उपयोग निर्मितीत व प्रसिद्धीत केल्याचं जाणवते. स्पष्ट उदाहरण म्हणजे लेस्ली लुइस यांनी चक्क मराठीत मराठी पद्धतीने केलेले संगीत निर्देशन आणि फराह खान,अनु मलिक आणि रोहित शेट्टी यांचा गेस्ट अपिअरन्स. यात चेन्नई एक्स्प्रेस मधला श्री शाहरुख खान यांचा गाजलेला डायलॉग रोहित शेट्टी कथेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा अधोरेखित करतो. आणि कथेच्या एका महत्वाच्या वळणावर म्हणजे प्रेक्षकांना सत्यता पटते.

रोहित शेट्टीची एक गाजलेली पद्धत आहे, त्याच्या प्रत्येक सिनेमात शेवटी श्रेयनामावलीनंतर सिनेमा शूट करतानाच्या गमतीशीर किस्स्यांचा समावेश तो करतो. भलेही हि क्षुल्लक गोष्ट वाटते पण माउथ-टू-माउथ पब्लिसिटीच्या आजच्या जमान्यात हि गोष्ट या प्रेक्षकसंख्या व रिपीट प्रेक्षकवर्ग (ज्यांचे छोट्या शहरात चित्रपटाच्या कमर्शियल एक्सलंस साठी खूप महत्व आहे). गोलमाल सिरीज अन सिंघम याद्वारे त्याने सिद्ध केलेली हि एक पद्धत आहे. तसाच प्रयत्न निर्माते श्रेयस तळपदे यांनी करून शेवटी एक गाणे (आयटम सॉंग) अन त्यांनतर असे शुटींग करतानाचे किस्से चक्क मराठीत प्रेक्षकांना दाखवलेत. आणि "मानो या ना मानो" याचा निश्चितच सकारात्मक परिणाम तिकीटबारीवर पडेलच पडेल.
कहाणी:
दिग्दर्शक समीर पाटील हेच चित्रपटाचे व पटकथेचे लेखक.अनिकेत विश्वासराव,दिलीप प्रभावळकर अन हृषीकेश जोशी या वेगवेगळ्या वयाच्या तीन व्यक्तींना एका सरकारी पोस्टर वर दिसलेली आपली इमेज, मग त्या इमेज पायी आलेले तिघांच्याही वैयक्तिक आयुष्यात वादळ आणि त्या वादळामुळे त्यांच्या आपापल्या समाजस्थानावर पडलेला असर आणि त्या तिघांचाही त्या वादळाविरुद्ध म्हणजे थोडक्यात सरकार विरुद्ध त्यांनी उभारलेला लढा अन मिळवलेला विजय. मुळात कारण अन त्या अनुषंगाने "मुलगा-मुलगी समानता" या महत्वाच्या घटकाला प्रमोट करण्याचा निर्मात्याचा प्रयत्न आहे. आणि हृषीकेश जोशीची पूर्ण भूमिकाच त्या अनुषंगाने घुसवण्यात आलेली आहे.
दिग्दर्शन:
लेखक व दिग्दर्शक समीर पाटील आणि विषय असा कि जर दुर्लक्ष झालं तर अश्लीलते कडे झुकण्यास जराही वेळ लागला नसता.
पण सांगण्यास कौतुक कि समीर पाटील ने मराठी मानसिकतेला केंद्रस्थानी ठेवून व्यवस्थित कहाणीला हाताळलेले आहे.
संगीत:
हरिहरन व लेस्ली लुइस हि एक गाजलेली जोडी (कलोनियल कझिन्स हा band ) आहे. या जोडीपैकी लेस्ली लुइस यांनी मराठीत कदाचित पहिल्यांदाच दिलेले संगीत म्हणजे पोष्टर बॉयज.एकदम वेगळे नसले तरी व्यवस्थित संगीत दिलेले आहे त्यांनी.

मराठीतला एक अनोखा प्रयत्न अन अभिनय संगीत दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रात व्यवस्थित आणि मुले-मुली समानता या मुद्द्याला एका वेगळ्याच angle ने केलेला स्पर्श अश्या एकत्रित सगळ्या मुद्द्यांसाठी मी चित्रपटाला ३.५* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, २७ जुलै, २०१४

किक



किक-हिंदी 

चांगल्या आघाडीच्या कलाकारांना घेऊन बनलेल्या हिंदी सिनेमाचा मागच्या काही दिवसात दुष्काळ पडलेला होता, सगळे दुसर्या 
फळीच्या कलाकारांचे सिनेमे येत होते, या गोष्टीचा फायदा घेऊन तिकीटवारीवर आपला अप्रत्यक्ष फायदा होईल हे समजून-उमजून 
सलमान खान यांचा नवीन आलेला एक चित्रपट म्हणजे किक.
मुळात किक म्हणजे काय? कारण आपण जेंव्हा कुणाला पंच करतो तेंव्हा जो आघात (फिजिकल) होतो त्याला किक म्हटल्या 
जाते पण हि किक एका सिनेमाचे टायटल होणे शक्य नाही. तर किक म्हणजे एक आंतरिक स्फूर्ती. आणि याचा जवळचा संबंध
मद्यप्राशन केल्यानंतर एक "किक बसते" असे म्हटल्या जाते त्या किकशी असावा.
कहाणी:
देवीलालसिंग उर्फ डेव्हिल या व्यक्तीची जाकलीन फर्नांडीस व रणदीप हुडा यांच्या सोबतीने भारतातून पोलंडथ्रू फिरलेली कहाणी म्हणजे किक.
अभिनय:
सगळ्यात आधी सलमान खानचे खरोखर कौतुक. त्याने या वयातही खूप नवीन गोष्टींचा प्रयोग या सिनेमात करून बघितला आहे.
अभिनयातही आणि गायनातही. हिमेश रेशमिया व यो यो हनी सिंग नेहि एकदम उत्कृष्ट वगेरे नसले तरी चांगले संगीत दिलेले आहे.पण "मित ब्रदर्स" या संगीतकार तिकडीचे खुद्द सलमानने गायलेले "hang over " या गाण्याचा उल्लेख करावाच लागेल.
सलमान खानने गायलेले हे गाणे खरोखर उत्कृष्ट category त येते.
दिग्दर्शन:
साजिद नाडियादवाला हे एक निर्माता म्हणून आघाडीच नाव. त्यांनी किक द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. पण आधीच
गाठीशी असलेल्या अनुभवाचा स्वत: दिग्दर्शक बनल्यावर कसा फायदा होतो याच उदाहरण म्हणजे या सिनेमाचा पटकथेसाठी
त्यांनी kelela चेतन भगतचा उपयोग.
सलमान खान आणि त्याने सर्व आघाड्यांवर स्वत:च्या वयाचा विचार न करता "जय हो" या तद्दन फालतू अपयशानंतर
kelelya प्रयत्ना साठी मी किक ला २.५* देईन. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, २५ मे, २०१४

हिरोपंती



हिरोपंती 

Jacki श्रॉफ पुत्र टायगर श्रॉफ व नवीन नायिका कृती सेनन यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण म्हणजे हिरोपंती 

हिरोपंती अर्थात साध्या शब्दात हिरोगिरी म्हणजेच कोणत्याही कथेत एका नायकाला नायक म्हणून कराव्या लागणाऱ्या उठाठेवी.

कहाणी:
मित्रांचा एक एकमेकांना मदत करणारा ग्रुप आणि त्याचा नायक बबलू (टायगर श्रॉफ). आता या नायकाच्याच भोवती कहाणी फिरते.पोरगी पळवणे आणि ज्या मित्राने मुलगी पळवली त्या मित्राला पूर्ण ग्रुप ने मदत करणे आणि साईड-बाय-साईड त्याचभोवती नायक-नायीकेचीही कहाणी गुंफणे हे तत्व लेखक संजीव गुप्ताने पाळलेलं आहे.
अभिनय:
टायगर श्रॉफच्या रूपाने सलमान खान/ह्रितिक रोशन या तगड्या शरीरयष्टीवाल्या नायकांना मिळालेला एक शानदार प्रतिस्पर्धी म्हणजे टायगर श्रॉफ. आधी मित्रांना मदत करणे व नंतर स्वत:ची कहाणी निभावणे या दोन्ही चक्कर मध्ये त्याची अभिनय क्षमता आणि शरीरयष्टी अन फिजिकल stunts करण्याची क्षमता लोकांना कळावी हे दिग्दर्शक सब्बीर खान चे लक्ष्य व्यवस्थित पूर्ण होते.
दिग्दर्शन:
दिग्दर्शक सब्बीर खान हे निर्माता साजिद नदीयादवालाच्याच आधीच्या कम्बख्त इश्कचे दिग्दर्शक. याही वेळेस एक नवीन नायकाचे पदार्पण करवताना त्याच्या अभिनय क्षमतेवर अन शारीरिक compatibility वरून लोकांचे लक्ष्य विचलित होऊ नये हे त्यांचे लक्ष्य व्यवस्थित पूर्ण होते. अभिनय क्षमता दर्शवण्यासाठी त्यांनी अनोखे प्रयत्न केलेले आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रयत्न म्हणजे मध्यंतर होईपर्यंत नायक नायिकेचा एकमेकांशी डायरेक्ट संपर्कच होऊ न देता फक्त अंदाजे-अंदाजे केलेली कथेची adjustment . पण टायगर श्रॉफ पुरेपूर उतरतो दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर.
संगीत:
साजिद-वाजीद जोडीच प्रसंगोचित संगीत सगळ्या गाण्यात आहे पण प्रेक्षकांवर छाप पडते Manj Musik यांच्या "व्हिस्तल बजा"
["Whistle Baja"] या गाण्यातील बासरीच्या सुरांचा. खरोखर अप्रतिम सुरवात बासरीची या गाण्यात वापरलेली आहे आणि या सुरावटीचा पार्श्वसंगीतातही चपखलपणे उपयोग केल्या गेलेला आहे.
रेटिंग:
टायगर श्रॉफच्या रूपाने हिंदी चित्रपटसृष्टीला एक नृत्यात वाकबगार व फिजिकली extravagant नायक मिळाल्याच
दाखवणाऱ्या या चित्रपटाला १.५* देईन. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शुक्रवार, २ मे, २०१४

The amazing spider man -2



The amazing spider man -2 

मागे तो झपाटलेला-२ आला होता मराठीतला तेंव्हा त्याच्या 3D इफेक्ट्सचे कौतुक करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे मराठी जनतेत चढाओढ लागली होती पण 3D इफेक्ट्स म्हणजे नेमके काय याचा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट एकदा नक्की बघावा. 
न्यूयॉर्क अन तिथला मुख्यत्वे टाईम्स स्क्वेअर इतक्या वेळा हॉलीवूड वाल्यांनी मोडीत काढलेला आहे कि आपल्या रामोजी फिल्म सिटी सारखा तिकडे एखादा स्टुडियोच असावा तोडमोड करण्यासाठी न्यूयॉर्क पुरवणारा. अतिमानवीय खलनायक आणि त्याला मानव जातीच्या भल्यासाठी लढणारा अतिमानवीय नायक हि हॉलीवूड वाल्यांची लाडकी कल्पना. आणि त्याच परंपरेत नेहमीप्रमाणे आणखी एक कडी म्हणजे स्पायडर Man . अर्थात मागच्या आणि या स्पायडर Man मध्ये बराच बदल वाटतो. खात्री नाही पण पीटर
पार्कर हि मुख्य व्यक्तिरेखा साकारणारा नट बदलल्यासारखा वाटला. आणि त्याचा मित्र harry osborn तर नक्कीच बदलला.
मागचा भाग ज्यांनी बघितला असेल ते हे नक्कीच सांगू शकतील. आपण इंग्रजी चित्रपट जास्त concentration ने बघत नाही त्याचा परिणाम असावा हा बहुतेक.
कहाणी:
स्पायडर Man हा अतिमानवीय शक्तींची देणगी मिळालेला एक व्यक्ती. जनतेच्या भल्यासाठी वगेरे लढणारा. आणि त्याच जनतेवर झालेला अतिमानवीय सैतानी शक्तींकडून हल्ला आणि त्याने लढा देऊन मिळवलेला विजय.
स्पेशल इफेक्ट्स:
दिग्दर्शन वगेरे गोष्टींवर बोलण्याची एक रसिक म्हणून माझी प्राज्ञा नाही पण मला जाणवलेले अति उत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्सचा
उल्लेख मात्र मी नक्की करीन. स्पेशल इफेक्ट्स बद्दल जास्त टेक्निकल नॉलेज नसतानाही जाणवणारे स्पेशल इफेक्ट्स हा कदाचित उच्च क्वालिटीच्या 3D तंत्रामुळेहि असतील बहुतेक पण उत्कृष्ट होते हे नक्की.
रेटिंग: जगभर चालणार्या/गाजणाऱ्या या चित्रपटाला मी बापडा काय रेटिंग देणार पण मी याला पूर्ण पाचपैकी 5* देण्याची माझी हौस पूर्ण करीन.
-समीर

रविवार, २७ एप्रिल, २०१४

सम्राट & कं



सम्राट & कं

जर तुम्ही राजश्री प्रोडक्शनचा चित्रपट बघायला जाता तेंव्हा तीन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात १] कौटुंबिक नितीमुल्ये हा चित्रपटाचा आत्मा असतो आणि त्याच्या भोवताल कथा गुंफलेली असते २] आलोक नाथ आणि मोहनीश बेहल हे त्यात असतात ३]त्याचे संगीत हा त्याचा निर्विवादरित्या आकर्षक भाग असतो पण सम्राट & कं. आश्चर्यकारकरित्या तिन्ही गोष्टीना अपवाद ठरतात. शेरलॉक होम्स आणि त्याचा साथीदार डॉक्टर वॉटसन या दोन व्यक्तिरेखांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचे हिंदीत केलेले रूपांतरण म्हणजे सम्राट & कं.
वास्तविक बघता इथेही आलोक नाथ साठी आणि मोहनीश बेहल साठी स्कोप होता (गिरीश कर्नाड आणि गोपाल दत्तच्या जागी) पण
निर्मात्या कविता बरजात्या ज्या राजश्री प्रोडक्शनचे छोट्या पडद्यावरील प्रोजेक्ट्स सांभाळतात मुख्यत्वे त्यांना हे दोघे कास्टिंग साठी योग्य वाटले नाहीत बहुतेक. सुरवातीलाच मात्र त्यांनी निर्मात्या म्हणून सर ऑर्थर कॅनोन डायल यांचे आभार मानलेले आहेत.
कहाणी:
मिस्टरी स्टोरीज म्हणजेच रहस्य कथा या संकल्पनेला सावरणारे एक कथानक म्हणजे सम्राट & कं. त्यातही शेरलॉक होम्स आणि त्याचा मित्र डॉक्टर वाटसन हे दोघ पडद्यावर चितारणे हे लक्ष्य त्यामुळे सिनेमात दोन्ही व्यक्तिरेखा हिंदी पद्धतीने. आणि त्यातही हिंदी प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युजन न होता सगळे नीट पचनी पडावे हा लेखक/दिग्दर्शक कौशिक घातक यांचा प्रयत्न. या प्रयत्नात
मंदावलेली पटकथेची गती हि गोष्ट या चित्रपटाच्या कमर्शियल performance वर निश्चितपणे असर करेल हे नक्की.
अभिनय:
एस टी डी (सम्राट तिलक धारी) हि नायकाची मुख्य व्यक्तिरेखा राजीव खंडेलवालने निभावलेली आहे. पण कुठेही तो कमी पडत नाही. शेरलॉक होम्सला हिंदीत साकारणे म्हणजे त्याची analysis पॉवर/observation पॉवर आणि conclusion पॉवर यांचा योग्य मेळ लेखकाला अपेक्षित पद्धतीने साकारणे. आणि या कसोटीवर राजीव खंडेलवाल पुरेपूर उतरतो. त्याची observe करून निष्कर्षावर येण्याची पद्धत प्रेक्षकांना पटते.
दिग्दर्शन:
कौशिक घातक यांचा वापर निर्मात्याने दिग्दर्शक म्हणून केलेला आहे. कौशिक घातक हे छोट्या पडद्यावरील एक नाव. राजश्रीच्याच या आधीच्या एक "एक विवाह ऐसा भी" चे दिग्दर्शक. तेच इथे लेखक आणि पटकथेतही सहलेखक. थोडक्यात ऑल इन वन package . पण सगळीकडे अगदी पुरेपूर उतरतात ते प्रेक्षकांच्या अपेक्षेवर. अर्थात राजीवनेही अभिनयाने त्यांना साथ तोडीस-तोड दिलेली आहे. पण त्यांना त्यांचे श्रेय हे मिळायलाच हवे. कारण एका अतिशय दुर्लभ विषयावर हिंदीत एक चित्रपट काढून तो तिकीट बारीवर चालणार नाही याचा अंदाज असूनही प्रयत्नात कसूर न करणे हे खरोखर कौतुकास्पद. याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे हॉलीवूड ची बरोबरी करताना वापरलेली पटकथा आणि प्रकाशयोजना. हाच चित्रपट जर आणखी कमी लांबीचा बनवून त्याची स्पीड थोडी वाढवली असती तर फरक पडला असता असे प्रेक्षकांना जाणवून जाते बघितल्यावर.
संगीत:
मागील वर्षी गाजलेल्या आशिकी-२ मधील संगीतकार जोडी अंकित तिवारी आणि मिथुन यांना इथे निर्मात्याने संधी दिलेली आहे.
आता एका रहस्य कथेत संगीताला मुळातच काही स्कोप नसतो पण जितका असतो तितका तितका दोघांनीही पुरेपूर निभावलेला आहे.रहस्य कथेत पार्श्वसंगीत उत्तम हवे आणि त्या कसोटीवर दोघंही फिट्ट बसतात.
का बघावा-बघू नये:
एका वेगळ्या विषयावरील एक उत्तम कलाकृती म्हणून बघण्यास काहीही हरकत नसलेला एक चित्रपट. जर तुम्हाला टिपिकल बॉलीवूड सिनेमे आवडत असतील म्हणजे प्रेम/संगीत इत्यादी तर या चित्रपटाची पटकथा फारच संथ वाटण्याची शक्यता आहे.
रेटिंग: कौशिक घातक आणि राजीव खंडेलवाल या दोघांच्याही प्रयत्नासाठी मी २ * देईन,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, २० एप्रिल, २०१४

2 स्टेट्स



2 स्टेट्स 

चेतन भगत आणि त्यांच्या गाजलेल्या "टू स्टेट्स" या गाजलेल्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट. लेखकाने खरोखर कादंबरी 
अतिशय उत्कृष्ट रित्या चित्रित केलेली आहे त्याची कहाणी (सुरवातीलाच कादंबरीत हि त्याची कहाणी आहे हे त्याने घोषित केलेले आहे).चित्रपटातही लेखक तोच असल्यामुळे आधी हे क्लियर करण्याच सौजन्य निर्माते धर्मा प्रोडक्षंस(करण जोहर) आणि नाडीयाडवाला फिल्म्स (साजिद नाडीयाडवाला) या दोघांनीही दाखवलेले आहे.
कहाणी:
"टू स्टेट्स" हि कादंबरी न वाचलेली इंग्रजी येणारी तरुणाई विरळ इतकी हि कादंबरी गाजली होती. (अभ्यासुनी २००८ च्या आसपासचा काळ आठवून बघावा). त्यामुळे त्यावर आधारित चित्रपट आलाच समजा तर तो तिकीट खिडकीवर चालणारच या अंदाजावर मोहर उमटवणारा हा एक चित्रपट. क्रिश मल्होत्रा (अर्जुन कपूर) आणि अनन्या स्वामिनाथन (आलिया भट) या दोघांची कहाणी म्हणजे टू स्टेट्स. पंजाबी मुलगा व तमिळ मुलगी म्हणजे दोघांच्या संस्कृतीत उत्तर-दक्षिण चे अंतर. हे संस्कृतीतले अंतर टिपण्याचे व त्याला शब्दात उतरवताना लेखकाचे कसब वादातीत होते. आणि म्हणूनच हि कादंबरी अफाट लोकप्रिय झाली होती/आहे. अहमदाबाद चा आय आय एम मध्ये शिकणारे दोघंही आणि परिस्थितीने एकमेकांच्या संपर्कात येउन प्रेमात पडलेले दोन व्यक्ती. आता हिंदी चित्रपट आणि प्रेमात पडलेले दोन जीव म्हणजे गाण्यांचा/संगीताचा भरपूर वापर (बागेत/कोलेज मध्ये/होस्टेल मध्ये इ. इ.) हे अपेक्षित होते.पण दिग्दर्शक अभिषेक वर्मनचे कौतुक कारण त्याने कुठेही "अति" होऊ दिलेले नाही.
अभिनय:
टू स्टेट्स मध्ये कहाणी उत्तम होतीच पण पात्रनिवड हा एक इश्यू होण्याचा चान्स होता.पण सांगण्यास आनंद कि क्रिश आणि अनन्या हे दोघेही परफेक्टलि सूट होतात आणि प्रेक्षकांची (कादंबरी वाचलेल्या) अपेक्षा पूर्ण करतात.तमिळ आणि पंजाबी परिवार जर बघितलेले असले तर दोन्ही परिवार एकदम उत्तमरीत्या शोभतात. आणि हा निर्मात्या/दिग्दर्शकाचा/लेखकाचा एक विजय असे म्हणूया कारण या चित्रपटाला पब्लिसिटीची पात्रांद्वारे फारशी गरज नव्हतीच. कादंबरीमुळे आधीच पुरेसा लोकप्रिय होता २ स्टेट्स.
दिग्दर्शन:
अभिषेक वर्मनचे कौतुक कारण त्याने दोन प्रांत involve असलेली हि गुंतागुंतीची कहाणी एकदम व्यवस्थित हाताळली. पंजाब आणि तामिळनाडू हे दोन प्रांत involve असल्यामुळे टाचणी पडून धुरळा उडण्याचा खूप चान्स होता पण त्याने व्यवस्थित हाताळले.
का बघावा: चेतन भगत हा लेखक एक उत्तम लेखक आहे. "कई पो चे" या त्याच्या एका कादंबरीवर आधारित (वन नाईट एट कॉल सेंटर) एक चीतपट आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे आणि cinematic लिबर्टी या संकल्पनेचा वस्तविकतेशी फारकत घेताना कितपत उपयोग करावा याची जाण असलेला एक लेखक असल्यामुळे नक्कीच बघावा असे वाटते याच्र स्पष्ट उदाहरण म्हणजे त्याचा कादंबरीत एक बॉस दाखवला आहे जो चेन्नई मध्ये त्याची खूप मदत करतो पण हे पात्र चित्रपटात नाही.
एका उत्तम कादंबरीवर आधारलेल्या चित्रपटाला मी 4* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, ८ मार्च, २०१४

टोटल सियापा



टोटल सियापा 

शानदार अभिनेता,गायक,संगीतकार व उत्कृष्ट चित्रकार (मुळचा पाकिस्तानी व्यक्ती/नागरिक) अली जफर यांचा नवीन चित्रपट "टोटल सियापा". मुळात "सियापा" म्हणजे काय कारण चित्रपटाच्या टायटल मध्येच तो शब्द आहे व इतका जनतेला परिचित नाही 
तर मला समजल्याप्रमाणे हा मुळचा पंजाबी भाषेतील शब्द असून आपल्या मराठीत "घोळ घालणे" असा काहीतरी सिमिलर त्याचा अर्थ असावा.
कहाणी:
अमन (अली जफर) व आशा (यामी गौतम) या दोघांची कहाणी म्हणजे टोटल सियापा. आधीच केलेल्या पुर्वप्रसिद्धीप्रमाणे
पाकिस्तानी मुलगा व भारतीय मुलगी,त्यामुळे अशी एकदम प्रत्यक्षात येण्यास कठीण अशी एक "लव्ह स्टोरी" असावी असा ग्रह असावा प्रेक्षकांचा पण हा सगळा "सियापा" म्हणजे घोळ हा फक्त एका रात्रीतला असून अमन हा आशाच्या घरच्या मंडळीना
पहिल्यांदा भेटण्यास जातो आणि पहिल्या भेटीत एकमेकांना इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात दोन्ही बाजूंकडून घातले गेलेले घोळ म्हणजे टोटल सियापा.
अभिनय:
सगळ्यात आधी अलि जफर चे खरोखर कौतुक कारण पाकिस्तानी-हिंदुस्तानी प्रेमकथा,त्यातही मुलगी भारतीय म्हणजे एक स्फोटक विषय होता.जर एखादी टाचणी इकडे-तिकडे पडली असती तर पूर्ण स्फोट होऊन सगळाच सिनेमा जळाला असता.
पण अली जफरने हे सगळच नीट matuarly handle करून अस होऊ दिलेले नाही. उलट शेवटी climax च्या दरम्यान नायक-नायिकेचं एक भांडण होते,त्या दरम्यान विषय हिंदुस्तान-पाकिस्तान असा भरकटण्याचा पूर्ण चान्स होता पण लेखक नीरज पांडे व दिग्दर्शक इ.निवास यांच्या सहाय्याने अली जफरने अस सगळाच तोडगा काढलेला आहे.यामी गौतम हिचाही उल्लेख करावाच
लागेल कारण विकी डोनर सोडून आजवर कोणतीही उल्लेखनीय अशी भूमिका तिच्या वाटयाला आलेली नाही. आणि हि
भूमिका वेगळी होती,शरीर प्रदर्शन किवा नृत्य असे कोणतेही स्किल्स न दाखवता फक्त वागण्या-बोलण्याने अर्थात अभिनयाने
तिला प्रेम हि कन्सेप्ट एक्स्प्लेन करायची होती,त्यातही ti भारतीय असल्यामुळे "धडपणे". पण तिने सगळ भुमिकेबरहुकूम
कुठेही "अती" न करता व्यवस्थित निभावलं.
दिग्दर्शन:
इ निवास,हिंदीत स्ट्रगल करणारा एक दक्षिण भारतीय दिग्दर्शक, माय नेम इज एन्थोनी गोन्जाल्वीस या एका "हट के" पण तिकीट बारीवर अपयशी चित्रपटाचा दिग्दर्शक. या हि वेळेस दिग्दर्शकाने एक वेगळाच विषय पुन्हा निवडला व नीटपणे निभावला. आणि नीटपणे हे विशेष उल्लेखनीय कारण लेखक नीरज पांडेने कितीही प्रयत्न केला असता व दिग्दर्शकाला नीट handle करणे जमल नसत तरी पक्की होतीच "गडगड". विशेष करून अर्जुन पंडित याची आशाच्या भावाची एक भूमिका हाताळण जमल नसत तरी घोर होता. पण जमल. फक्त चित्रपटाची गती खूप रेंगाळल्या सारखी वाटते. पटापट पुढे सरकत नाही आणि तो सगळा घोळ फक्त एका रात्रीचाच असल्यामुळे अस होते हे पेक्षकांना जाणवते पण तोपर्यंत खूप उशीर होतो.त्यामुळे...........
संगीत:
संगीत दिग्दर्शक अली जफर हाच.मुख्य अभिनेता हाच गीतकार. व संगीत दिग्दर्शक. पण अगदीच उल्लेखनीय नसली तरी सगळीच कामगिरी तोडीस-तोड व कौतुकास्पद.अली जफर याचे पूर्ण चित्रपटाला असलेले contribution लक्षात घेता एका स्फोटक विषयावर बेतलेल्या या चित्रपटाल मी अडीच २ (१/२) * देईन.बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०१४

सौ.शशी देवधर (मराठी)



सौ.शशी देवधर (मराठी)

जेंव्हा कोणताही मराठी चित्रपट बघायला तुमचे पाय चित्रपट गृहाकडे वळतात तेंव्हा एक गोष्ट कंसीडर करायलाच हवी कि तो चित्रपट "प्रेम" या संकल्पनेवर बेतलेला असतो आणि त्याच संगीत हा त्याचा आत्मा असतो पण सौ शशी देवधर
आश्चर्यकारकरित्या त्याला अपवाद ठरतो. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणत्याही स्वरुपात हा चित्रपट प्रेम संकल्पनेच्या संपर्कात येत नाही. आणि "आर्ट फिल्म" हि संकल्पना वाटू शकते इतके ट्विस्ट आणि टर्न कहाणीत आहेत आणि तरीही प्रेमाशी संपर्क आल्याविना.या मुव्हीला माजी बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने निर्मिती करण्याची हिम्मत दाखवली हे विशेष उल्लेखनीय.
कहाणी:
मराठी सिनेमात प्रेम या संकल्पनेवर अवलंबून नसलेली एका स्त्रीची कहाणी जी आपल्या आयुष्याचे उसवलेले ठिगळ जोडायचे प्रयत्न करते आहे,एका सायकियाट्रीस्ट,एका पोलिस इन्स्पेक्टर आणि एका शिक्षकासोबत. मराठी सिनेमा "स्प्लीट personality " या अवघड विषयावर पूर्णपणे अवलंबून राहू शकतो का? उत्तर हो आणि सौ शशी देवधर हे त्याच उदाहरण. डॉ अजिंक्य वर्तक(अजिंक्य देव) यांच्या कार सोबत सौ शुभदा देवधर यांच्या अपघाताने कहाणीची सुरवात होते. आणि अनेक वळणे घेऊन सौ नीलिमा वर्तक यांच्या कहाणीने संपते. सायको थ्रिलर हा प्रकार मराठीत जवळपास नाहीच पण हा चित्रपट सुरवात करतो आहे अशी अपेक्षा एक रसिक म्हणून आपण बाळगूया. .
अभिनय:
सगळ्यात आधी सई ताम्हणकर हिचे खरोखर कौतुक. सौ शुभदा देवधर आणि सौ नीलिमा ठाकूर अश्या दोन वेगवेगळ्या साच्यातील भूमिका तिने समर्थपणे पेललेल्या आहेत.दुनियादारी मधली शिरीन किंवा इतर कोणत्याही प्रेम या संकल्पनेवरच्या भूमिकेपासून पूर्णपणे वेगळी एक सायकिक भूमिका समर्थपणे सईने निभावलेली आहे.अजिंक्य देव याचेही बर्याच काळानंतर डॉ अजिंक्य वर्तक या सायकीयाट्रीस्टच्या एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांना दर्शन घडते. आणि त्यानेही अगदी विशेष उल्लेखनीय नसली तरी समर्थपणे भूमिका पेललेली आहे. वास्तविक बघता सईची भूमिका पूर्णच फुटेज खाऊन गेली असती पण अजिंक्य देवने तसे होऊ दिलेले नाही. तुषार दळवीने देखील व्यवस्थित हाताळलेली आहे त्याची भूमिका.
दिग्दर्शन:
दिग्दर्शक अमोल शेटगे यांचे विशेष कौतुक कारण मराठी सिनेमा अक्षरश: एका वेगळ्या विषयावर बेतलेला,इतकी गुंतागुंतीची कथा असलेला आणि कोणताही अभिनयासाठी विशेष उल्लेखनीय चेहरा नसूनही त्यांनी समर्थपणे विषय पेललेला आहे.वास्तविक बघता स्वत: दिग्दर्शक पटकथा लेखनात सहलेखक त्यामुळे त्याने बरेचसे प्रसंग आधीच manage केले असतील या शंकेस वाव आहे.पण तरीही त्यांनी मराठीत एक वेगळा विषय आणून तो पेलून दाखवला म्हणून त्यांचे कौतुक करावेच लागेल.एक दिग्दर्शक हा एका सिनेमाच्या नौकेचा मुख्य captain असतो.सगळ्या चांगल्या वाईट बाबींना जबाबदार.आता सिनेमा मराठी तो हि इतका वेगळ्या धाटणीचा म्हणजे तिकीटबारीवर जास्त चालण्याची अपेक्षाच नाही तरीही प्रयत्नात कसूर न ठेवणे यासाठी विशेष दाद हि द्यावीच लागेल. वास्तविक बघता असे बरेच प्रसंग होते ज्यात दिग्दर्शक स्वत: कन्फ्युज झाला असता तर कपाळमोक्ष नक्की होता सिनेमाचा.पण अमोल शेटगे अक्षरश: पुरून उरलेत.
संगीत: मराठी सिनेमात संगीत हे लागतेच कारण गीत हे मुळात कविता वाटण्याइतक्या चपखलपणे प्रेक्षकांना "आत पोचतात". tubby - parik अशी जोडी यात निर्मात्याने वापरलेली आहे आणि ते हि याला पुरून उरतात.फक्त दोन गाणे पण ते कमी पडत नाहीत.चपखलपणे सूट होतात.गीतकार आशिष कुलकर्णी यांचेही गीतांसाठी विशेष कौतुक पण सगळ्यात शेवटी अजिंक्य देवच्या आवाजात एक कविता वाचन आहे त्यासाठी विशेष कौतुक कारण ती संगीत नसलेली कविता खरोखर उत्कृष्ट categoryत येते.
का बघावा:
मराठीत वेगळे सिनेमे बनतच नाहीत,वेगळ्या विषयाला मराठी फिल्ममेकर्स हातच घालत नाहीत,अशी चर्चा आपण बर्याचदा बघतो. या चर्चेला हा सिनेमा एक उत्तर देऊ शकतो. स्प्लीट personality या वेगळ्या विषयावरचा एक मराठी सिनेमा म्हणून हा सिनेमा नक्कीच बघावा असा आहे.
रेटिंग:पूर्ण प्रयत्नासाठी आणि सईच्या अभिनयासाठी मी या सिनेमाला ३.५* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, १ फेब्रुवारी, २०१४

पुणे व्हिया बिहार



पुणे व्हिया बिहार (मराठी)

प्रेम या कन्सेप्ट वर बेतलेला हा चित्रपट असेल या कल्पनेने हा मराठी चित्रपट बघायला जर तुम्ही जात असाल तर हे लक्षात घ्यायलाच हव कि तस आहे पण "मुलगी पटवणे" यावर ते मर्यादित नाही तर महाराष्ट्र-बिहार असे दोन प्रांत involve असल्यामुळे प्रेम हे आहेच पण प्रेमानंतरची लग्नापर्यंत असलेली करावी लागणारी adjustment यावर बेतलेली हि कहाणी आहे.
उमेश कामत ( सध्या गाजणाऱ्या एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेतील ओम चौधरी,यात अभिजित भोसले) व मृण्मयी देशपांडे (तारा यादव) या दोघांची कहाणी म्हणजे पुणे व्हिया बिहार.
तारा यादव बिहार मधील एका राजकारण्याची मुलगी,महाराष्ट्रात औरंगाबाद मध्ये शिकायला येउन इंजिनियरिंगचे शिक्षण घेणारी एक बिहारी मुलगी.अभिजित भोसले हा पुण्यातला एका मध्यमवर्गीय घरातील एकुलता एक सुपुत्र. त्यांची कॉलेजमध्ये
झालेली भेट.
अभिनय: उमेश कामत याने अभिनयाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केलेले आहे. वास्तविक बघता त्या मालिकेत तो प्रेमभंग झालेल्या एका वकिलाची भूमिका करतो व इकडे प्रेमात पडलेल्या व प्रेयसीसाठी कोणत्याही extent पर्यंत उतरून काहीही मदत करण्यास तयार असलेला एक व्यक्ती, पण या दोन्ही भूमिकेत उमेश कामत व्यवस्थित सुट होतो. कुठेही कमी पडत नाही. मृण्मयी देशपांडेला दिग्दर्शकाने एक बिहारी मुलगी म्हणून कास्ट केलेलं असलं तरी कोणत्याही angleने ती मराठी मानसिकतेला बिहारी वाटतच नाही. त्यात तिची चूक नसेलही कदाचित कारण ती मुळचीच मराठी वाटते. आणि प्रेक्षकांना हे अनेकदा जाणवते. भरत जाधव याचंहि बर्याच काळानंतर एक कॉमेडी नसलेल्या पण चक्क थोड्या खलनायकी व नंतर सहाय्यक व्यक्तिरेखा बनलेल्या भूमिकेने दर्शन घडते. अरुण नलावडे यांनीही एका छोट्याश्या भूमिकेने छाप सोडलेली आहे.
दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी दिग्दर्शनात (मराठी) या चित्रपटाद्वारे पदार्पण केल असाव कारण त्यांनी बरेच प्रयोग करून बघितलेत. लेखक सचिन मोटे यांच्यासोबत ते सहलेखक आहेत. सलमान खानच्या नवीन आलेल्या जय हो सारख एकदा वापरण्याचा प्रयत्न केलेलं, thank यु व त्याच एक्स्प्लेनेशन हा त्याचं एक उदाहरण. तीन तासाच्या कहाणीने वळणे घेतांना कितपत घ्यावी याला मर्यादा असाव्या लागतात.नव्हे असतातच.पण सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांनी त्या कहाणीला इतकी वळणे दिलीत कि बस,, चक्क एका २०० भाग चालणार्या मराठी मालिकेची कहाणी तीन तासात बसवल्यासारखी वाटते.
कधी कधी अभिनय/दिग्दर्शन/पटकथा/संगीत सगळ काही उत्तम असलं तरी चित्रपटात सगळच चांगल असावं लागत.
असो...
मी उमेश कामत व भरत जाधव यांच्या अभिनयासाठी २* स्टार देईल,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, २६ जानेवारी, २०१४

जय हो



जय हो

जर तुम्ही सलमान खान अभिनित एखादा चित्रपट बघायला जात असाल,तर हे लक्षात घ्यायला हवच कि त्यात फक्त आणि फक्त सलमान खानच असू शकतो,बाकी काहीही नाही आणि हा ही याला अपवाद नाही,फक्त सलमान खान बस्स बाकी काहीही नाही,सलमान आवडत असल्यास चित्रपट आवडण्याच्या शक्यता खूप पण चित्रपट नीट सर्व दृष्टीने analyse करून बघायची सवय असेल तर......
समजा तीन भाऊ आहेत,आणि मोठ्या भावाने मधल्या भावाचं एखाद अडकलेलं काम आटपून दिल आणि त्यापासून प्रेरित होऊन सगळ्यात लहान भावानेही तसाच हट्ट धरला आणि त्याच्या त्याच मोठ्या भावाने तो हट्ट पुरवण्यासाठी थोडी मेहनत घेतली तर काय होईल? जय हो तयार होतो,बाकीचे संदर्भ दबंग-१ व २. (जिज्ञासूनी संदर्भ तीन खान बंधूंशी लावावा)
कहाणी: जय अग्निहोत्री- एक एक्स आर्मीवाला. स्वभावाने तापट व इमानदार. त्याची एक adjust केलेली कहाणी म्हणजे जय हो.मेगास्टार चिरंजीवी अभिनित तेलगु चित्रपट 'स्टालिन' चा रिमेक. दक्षिणी चित्रपट म्हणजे साहजिकच नायक प्रधान व नायकाला अवास्तव महत्व वाढवून हिरोहिरी बहाल केलेली एक कहाणी.तर हा जय अग्निहोत्री काही कारणाने आर्मितुन बाहेर
पडून सामान्य नागरिकाचे जीवन जगत असलेला पण attitude आर्मिचाच असलेला.तो आर्मितुन का बाहेर पडतो हे विशद वगेरे करण्याचा दिग्दर्शक सोहेल खान याने यत्न केलेला आहे पण तो जमलेला नाही.बाय द वे,या प्रयत्नात सुनील शेट्टीचे
प्रेक्षकांना दर्शन घडून उगाचच त्याचे 'बॉर्डर' काळातले दिवस आठवून जातात आणि दिग्दर्शकाचा तो प्रयत्न नसेलही कदाचित पण तसे प्रेक्षकांना वेशभूषा-संवाद-सिन्सचा अनुक्रम वगेरे याने जाणवून जाते.
तर हा जय अग्निहोत्री इतरांना मदत करण्याची सवय असलेला. थोडक्यात मदत करण्यात समाधान मिळवणारा.
त्याची ती सवय व त्याने त्याची होणारी गृह मंत्री दशरथ सिंग (danny dengzongpa) याच्याशी झालेली भेट व त्या चक्कर मध्ये त्याने वाचवलेला मुख्यमंत्री प्रधान (मोहनीश बेहल) यांचा जीव म्हणजे "जय हो".
लेखक बघितला तर पूर्वीचा अनुभवी व यशस्वी व्यक्ती A R Murugadoss (गजिनी वाला दिग्दर्शक-लेखक) पण इकडे.......
अभिनय: अभिनयात सगळाच फोकस दिग्दर्शक सोहेल खान याने सलमान खान याच्यावर ठेवलेला आहे.आणि सलमान खान त्याला पुरून उरलेला आहे. अक्ख्या चित्रपटात फक्त एकदा ते ही सगळ्यात शेवटी शर्टलेस होतो सलमान पण त्याच्या शरीर सौष्ठवावरून प्रेक्षकांचे लक्ष विचलित होऊ नये हे दिग्दर्शक सोहेल खानचे लक्ष्य व्यवस्थित पूर्ण होते.
वास्तविक बघता दिग्दर्शक सोहेल खान याने सलमान ची एंट्रीच त्याचे सामर्थ्य असलेल्या फायटिंग सिक्वेन्स करवून
रंगत भरण्याचा प्रयत्न केलेला आहे,पण सलमानचे दुसरे एक सामर्थ्य विलक्षण संवाद फेक,याकडे दुर्लक्ष घडलेले जाणवून जाते प्रेक्षकांना बघितल्यावर. अर्थात त्याचाही प्रयत्न आहेच उदाहरणार्थ thank यु व त्याचे एक्स्प्लेनेशन पण भट्टी.....
संगीत:साजिद-वाजीद जोडी व इतर दोन नाव नसलेले संगीतकार आहेत पण भट्टी... वास्तविक बघता अभिनेत्री डेझी शाह
ही नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांची मदतनीस,त्यामुळे नृत्यात वाकबगार,दिग्दर्शक सोहेल खान यानेही याला महत्व देत तिची एंट्री गाण्याद्वारे म्हणजेच नृत्याद्वारे करवलेली आहे,पण .........
जर तुम्ही सलमान खान या व्यक्तीचे fan असाल तर तुम्हास एकदम योग्य चित्रपट बघण्यास
मी फक्त सलमान खानसाठी अर्धा १/2* देईन,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा
-समीर

रविवार, ५ जानेवारी, २०१४

टाईमपास (मराठी)



टाईमपास (मराठी)

जर कुणी शेखर राजीवनी (विशाल शेखर जोडीपैकी एक) "साजणी" हे गाण ऐकल असेल,तर त्याचा कवी अन दिग्दर्शक रवि जाधव दिग्दर्शक म्हणून पुन्हा एक मराठी सिनेमा घेऊन आलाय, "बालक पालक" व "नटरंग" चा दिग्दर्शक या ओळखीबरोबरच आता या पुढे टाईमपास चा दिग्दर्शक म्हणून देखील ओळखला जाईल असे जाणवून जाते बघितल्यावर.

कहाणी: प्राजक्ता व दगडू परब हे दोघ टीनएजर्स व त्यांच्यातील बनलेली व बनूनही तुटलेली केमिस्ट्री म्हणजे टाईमपास. प्राजक्ता-एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी,वडलांच्या छत्रछायेत वाढलेली,सदैव एका "सेफ" वातावरणा शिवाय दुसरा अनुभव न घेतलेली. दगडू- एका कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातील मुलगा,दहावी पास होणे इतपत क्षुल्लक अपेक्षाही स्वत:च्या अपूर्ण असलेला.थोडक्यात स्ट्रगल या कन्सेप्टशी बर्यापैकी परिचय असलेला व स्ट्रगल करण्यातच आयुष्य घालवणारा. पण त्या दोघांची झालेली भेट व प्राजक्ताला पडलेली त्याच्या स्वतंत्र वागण्याची भुरळ व त्या दोघांची अचानक बनलेली व फुललेली केमिस्ट्री.हि त्यांच्यातली केमिस्ट्री बनणे व फुलणे हा अतिशय आल्हाददायक भाग सिनेमातला. तरुण पिढीला हे कितपत आवडेल यावर कमर्शियलि सिनेमाचे यश अवलंबून राहील.
अभिनयात केतकी माटेगावकर व प्रथमेश परब यांनी आपापल्या रोल मध्ये व्यवस्थित सूट होऊन छाप सोडलेली आहे. संगीत दिग्दर्शनात चिनार-महेश या नवीन जोडीला निर्मात्या झी टोकीज ने संधी दिली व त्यांनीही अगदीच उल्लेखनीय नसल तरी उत्तम संगीत दिलेले आहे. मराठी चित्रपट इतिहासातील किंवा असे म्हणूया रिसेंट काळातील पहिल्याच आयटम सॉंग ला देखील व्यवस्थित संगीत दिलेले आहे.

दिग्दर्शक रवि जाधव यांनीच कहाणी लेखनाची व संवादलेखनाची जबाबदारी उचललेली आहे. पण सांगण्यास आनंद कि कोठेही कमीपणा जाणवत नाही. उलट काही उत्तम संवाद प्राजक्ताचे प्रमोशन साठी वापरून निर्मात्यांनी तरुण प्रेक्षकांची उत्सुकता ताणण्यासाठी चांगलेच केलेले आहे. पटकथा लेखनातही ते सहलेखक आहेत. आणि सगळ्यात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे या सिनेमाचा शेवट आनंदात किंवा दु:खात न करता "to be continued " असा अर्धवट ठेवून निर्मात्यांनी स्वत:च सिक्वेल साठी स्कोप ठेवलेला आहे. अन्यथा "रांझना/आशिकी-२" सारखा दुखी शेवटही शक्य होता पण त्यांचे वय बघता रांझना सारखा शेवट करण्यातला कमर्शियलि फोलपणा ताडून रवि जाधवने सिनेमा बघणाऱ्या मराठी मानसिकते साठी पॉजीटिव्ह विचारसरणीला स्कोप ठेवण्यासाठी शेवट न करता सिक्वेल मध्ये सगळ "ऑल इज वेल" दाखवण्यासाठी थोडक्यात प्रेम या संकल्पनेला सावरण्यासाठी शेवट न करता चक्क अर्धवट ठेवलेली आहे कहाणी.

थोडक्यात काय तर एक उत्तम सिनेमा,कुठलेही व्यंग मला न जाणवलेला.मी सिनेमाला पूर्ण ५* देईन पाच पैकी
-समीर