पीके
विधू विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी हि जोडी म्हणजे यशाची हमखास खात्री अस समीकरण होत, मग जर यश मिळतेच आहे तर तीच टीम घेऊन नि तश्याच मनोरंजनात्मक पद्धतीने थोडाफार जनजागृतीचा प्रयत्न का करू नये या विचाराने याच जोडीचा नवीन चित्रपट म्हणजे पीके. राजकुमार हिरानीची कथा म्हणजे कल्पनाशक्तीचा असलेला सुयोग्य वापर आणि आणि त्याच कथेत उत्तमोत्तम पात्र अन त्या पात्रांची आपापसात असलेली अभिनयाची जुगलबंदी अस एक समीकरण बनलेलं होत. सर्किट-मुन्नाभाई-फरहान--रा
अभिनय:
आमिर खान त्याची अभिनय क्षमता यावर कुणाचा आक्षेप असण्याची शक्यताच नाही पण प्रत्येक अभिनेत्याला जीवनात एक कठीण भूमिका मिळते. माझ्यामते पीके हे अमीरखानच्या आता पर्यंतच्या करिअर मधील सगळ्यात वेगळी अन कठीण भूमिका.
आणि अमीर खान शब्दश: त्याच वेगळेपण आणि अभिनयक्षमता सिद्ध करतो या भूमिकेने. आता या अंतराळातील त्रांगड्यात
जनजागृतीच्या दृष्टीने सौरभ शुक्ला (तपस्वी) या व्यक्तिरेखेचा समावेश राजकुमार हिरानीने केलेला आहे पण.....
दिग्दर्शन:
हिंदी चित्रपट हे अंतराळ किंवा तत्सम बाबीवर जेंव्हा बनतात तेंव्हा हे हॉलीवूड नसल्यामुळे बजेट चा प्रश्न असतोच. हा सिनेमाही अगदी दिग्दर्शकच एक निर्माता असला तरी याला अपवाद ठरलेला नाही. पण राजकुमार हिरानीने खरोखर अमीर खानच्या व्यक्तिरेखेला हाताळण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही.पण अभिजात जोशीबरोबर मिळून त्याने लिहिलेल्या पटकथेची गती इतकी मंदावते कि प्रेक्षक irritate होण्यापर्यंत. हि चूक अनवधानाने झाली असावी हे स्पष्ट आहे पण पटकथेची मंदावलेली गती या चित्रपटाच्या कमर्शियल एक्सलंस वर असर टाकणार हे नक्की. एक अत्युत्कृष्ट व्यक्तिरेखा चित्रपट तडीस नेत नाही हे प्रेक्षक नक्कीच जाणून आहेत.
मी आमिर खान च्या अभिनयासाठी मुखत्वे पीकेला अडीच (२ १/२*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा