रविवार, ७ डिसेंबर, २०१४

एलिझाबेथ एकदशी (मराठी)



एलिझाबेथ एकदशी (मराठी)

सध्या गाजणाऱ्या होणार सून मी या घरची या मालिकेच्या लेखिका मोठ्या पडद्यावर उतरल्या असून मधुगंधा कुलकर्णी यांचा चित्रपट कथा लेखिका म्हणून पहिलाच चित्रपट म्हणजे एलिझाबेथ एकादशी.
एलिझाबेथ हि एक सायकल अन घरच्या परिस्थितीमुळे तिला विकण्याची असलेली गरज, मग घरातल्या लहान मुलांचा त्या सायकलीला वाचवण्याचा प्रयत्न अन त्या प्रयत्नाभोवताल फिरणारी कथा म्हणजे एलिझाबेथ एकादशी.
आजकालच्या काळात "मनोरंजनाचा एक तरतरीत डोस" या नावाखाली वास्तविकतेशी फटकून असलेल्या तद्दन निर्बुद्ध अन फुटकळ कथा आजकाल दिसतात. लेखिका मधुगंधा कुलकर्णी या स्वत:च एक निर्मात्या असून त्यांनी हरिश्चंद्राची factory फेम दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या सोबत एक उत्तम कथा तीन तासात बांधलेली आहे. कौटुंबिक पातळीवर रंगवलेली एक अप्रतिम कथा असून श्रीरंग महाजन या बाल अभिनेत्याचा उल्लेख करावाच लागेल. या लहान मुलाने कथेच्या मागणीप्रमाणे अक्षरश: एकहाती तोलून धरलेली कथा आहे हि. आणि म्हणूनच बहुधा दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी त्याच्यावर विसंबत त्याला कथेत
पूर्ण स्कोप दिलेला आहे.
एकूणच, गाणे नाही,मोठमोठे सेट्स/कलाकार नाहीत आणि कथाही एकदम हायफाय वगेरे वगेरे नाही पण एक वास्तविकतेवर अवलंबून असलेली कथा,इतकी वास्तविक कि चित्रपटातले पात्र वास्तविक जीवनात कुठे-ना-कुठे आपल्याला भेटल्याचे जाणवून जाते प्रेक्षकांना बघितल्यावर.
मी या चित्रपटाला ४.५ * देईन ५ पैकी,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा