The amazing spider man -2
मागे तो झपाटलेला-२ आला होता मराठीतला तेंव्हा त्याच्या 3D इफेक्ट्सचे कौतुक करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे मराठी जनतेत चढाओढ लागली होती पण 3D इफेक्ट्स म्हणजे नेमके काय याचा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट एकदा नक्की बघावा.
न्यूयॉर्क अन तिथला मुख्यत्वे टाईम्स स्क्वेअर इतक्या वेळा हॉलीवूड वाल्यांनी मोडीत काढलेला आहे कि आपल्या रामोजी फिल्म सिटी सारखा तिकडे एखादा स्टुडियोच असावा तोडमोड करण्यासाठी न्यूयॉर्क पुरवणारा. अतिमानवीय खलनायक आणि त्याला मानव जातीच्या भल्यासाठी लढणारा अतिमानवीय नायक हि हॉलीवूड वाल्यांची लाडकी कल्पना. आणि त्याच परंपरेत नेहमीप्रमाणे आणखी एक कडी म्हणजे स्पायडर Man . अर्थात मागच्या आणि या स्पायडर Man मध्ये बराच बदल वाटतो. खात्री नाही पण पीटर
पार्कर हि मुख्य व्यक्तिरेखा साकारणारा नट बदलल्यासारखा वाटला. आणि त्याचा मित्र harry osborn तर नक्कीच बदलला.
मागचा भाग ज्यांनी बघितला असेल ते हे नक्कीच सांगू शकतील. आपण इंग्रजी चित्रपट जास्त concentration ने बघत नाही त्याचा परिणाम असावा हा बहुतेक.
कहाणी:
स्पायडर Man हा अतिमानवीय शक्तींची देणगी मिळालेला एक व्यक्ती. जनतेच्या भल्यासाठी वगेरे लढणारा. आणि त्याच जनतेवर झालेला अतिमानवीय सैतानी शक्तींकडून हल्ला आणि त्याने लढा देऊन मिळवलेला विजय.
स्पेशल इफेक्ट्स:
दिग्दर्शन वगेरे गोष्टींवर बोलण्याची एक रसिक म्हणून माझी प्राज्ञा नाही पण मला जाणवलेले अति उत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्सचा
उल्लेख मात्र मी नक्की करीन. स्पेशल इफेक्ट्स बद्दल जास्त टेक्निकल नॉलेज नसतानाही जाणवणारे स्पेशल इफेक्ट्स हा कदाचित उच्च क्वालिटीच्या 3D तंत्रामुळेहि असतील बहुतेक पण उत्कृष्ट होते हे नक्की.
रेटिंग: जगभर चालणार्या/गाजणाऱ्या या चित्रपटाला मी बापडा काय रेटिंग देणार पण मी याला पूर्ण पाचपैकी 5* देण्याची माझी हौस पूर्ण करीन.
-समीर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा