रविवार, ५ जानेवारी, २०१४

टाईमपास (मराठी)



टाईमपास (मराठी)

जर कुणी शेखर राजीवनी (विशाल शेखर जोडीपैकी एक) "साजणी" हे गाण ऐकल असेल,तर त्याचा कवी अन दिग्दर्शक रवि जाधव दिग्दर्शक म्हणून पुन्हा एक मराठी सिनेमा घेऊन आलाय, "बालक पालक" व "नटरंग" चा दिग्दर्शक या ओळखीबरोबरच आता या पुढे टाईमपास चा दिग्दर्शक म्हणून देखील ओळखला जाईल असे जाणवून जाते बघितल्यावर.

कहाणी: प्राजक्ता व दगडू परब हे दोघ टीनएजर्स व त्यांच्यातील बनलेली व बनूनही तुटलेली केमिस्ट्री म्हणजे टाईमपास. प्राजक्ता-एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी,वडलांच्या छत्रछायेत वाढलेली,सदैव एका "सेफ" वातावरणा शिवाय दुसरा अनुभव न घेतलेली. दगडू- एका कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातील मुलगा,दहावी पास होणे इतपत क्षुल्लक अपेक्षाही स्वत:च्या अपूर्ण असलेला.थोडक्यात स्ट्रगल या कन्सेप्टशी बर्यापैकी परिचय असलेला व स्ट्रगल करण्यातच आयुष्य घालवणारा. पण त्या दोघांची झालेली भेट व प्राजक्ताला पडलेली त्याच्या स्वतंत्र वागण्याची भुरळ व त्या दोघांची अचानक बनलेली व फुललेली केमिस्ट्री.हि त्यांच्यातली केमिस्ट्री बनणे व फुलणे हा अतिशय आल्हाददायक भाग सिनेमातला. तरुण पिढीला हे कितपत आवडेल यावर कमर्शियलि सिनेमाचे यश अवलंबून राहील.
अभिनयात केतकी माटेगावकर व प्रथमेश परब यांनी आपापल्या रोल मध्ये व्यवस्थित सूट होऊन छाप सोडलेली आहे. संगीत दिग्दर्शनात चिनार-महेश या नवीन जोडीला निर्मात्या झी टोकीज ने संधी दिली व त्यांनीही अगदीच उल्लेखनीय नसल तरी उत्तम संगीत दिलेले आहे. मराठी चित्रपट इतिहासातील किंवा असे म्हणूया रिसेंट काळातील पहिल्याच आयटम सॉंग ला देखील व्यवस्थित संगीत दिलेले आहे.

दिग्दर्शक रवि जाधव यांनीच कहाणी लेखनाची व संवादलेखनाची जबाबदारी उचललेली आहे. पण सांगण्यास आनंद कि कोठेही कमीपणा जाणवत नाही. उलट काही उत्तम संवाद प्राजक्ताचे प्रमोशन साठी वापरून निर्मात्यांनी तरुण प्रेक्षकांची उत्सुकता ताणण्यासाठी चांगलेच केलेले आहे. पटकथा लेखनातही ते सहलेखक आहेत. आणि सगळ्यात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे या सिनेमाचा शेवट आनंदात किंवा दु:खात न करता "to be continued " असा अर्धवट ठेवून निर्मात्यांनी स्वत:च सिक्वेल साठी स्कोप ठेवलेला आहे. अन्यथा "रांझना/आशिकी-२" सारखा दुखी शेवटही शक्य होता पण त्यांचे वय बघता रांझना सारखा शेवट करण्यातला कमर्शियलि फोलपणा ताडून रवि जाधवने सिनेमा बघणाऱ्या मराठी मानसिकते साठी पॉजीटिव्ह विचारसरणीला स्कोप ठेवण्यासाठी शेवट न करता सिक्वेल मध्ये सगळ "ऑल इज वेल" दाखवण्यासाठी थोडक्यात प्रेम या संकल्पनेला सावरण्यासाठी शेवट न करता चक्क अर्धवट ठेवलेली आहे कहाणी.

थोडक्यात काय तर एक उत्तम सिनेमा,कुठलेही व्यंग मला न जाणवलेला.मी सिनेमाला पूर्ण ५* देईन पाच पैकी
-समीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा