पुणे व्हिया बिहार (मराठी)
प्रेम या कन्सेप्ट वर बेतलेला हा चित्रपट असेल या कल्पनेने हा मराठी चित्रपट बघायला जर तुम्ही जात असाल तर हे लक्षात घ्यायलाच हव कि तस आहे पण "मुलगी पटवणे" यावर ते मर्यादित नाही तर महाराष्ट्र-बिहार असे दोन प्रांत involve असल्यामुळे प्रेम हे आहेच पण प्रेमानंतरची लग्नापर्यंत असलेली करावी लागणारी adjustment यावर बेतलेली हि कहाणी आहे.
उमेश कामत ( सध्या गाजणाऱ्या एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेतील ओम चौधरी,यात अभिजित भोसले) व मृण्मयी देशपांडे (तारा यादव) या दोघांची कहाणी म्हणजे पुणे व्हिया बिहार.
तारा यादव बिहार मधील एका राजकारण्याची मुलगी,महाराष्ट्रात औरंगाबाद मध्ये शिकायला येउन इंजिनियरिंगचे शिक्षण घेणारी एक बिहारी मुलगी.अभिजित भोसले हा पुण्यातला एका मध्यमवर्गीय घरातील एकुलता एक सुपुत्र. त्यांची कॉलेजमध्ये
झालेली भेट.
अभिनय: उमेश कामत याने अभिनयाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केलेले आहे. वास्तविक बघता त्या मालिकेत तो प्रेमभंग झालेल्या एका वकिलाची भूमिका करतो व इकडे प्रेमात पडलेल्या व प्रेयसीसाठी कोणत्याही extent पर्यंत उतरून काहीही मदत करण्यास तयार असलेला एक व्यक्ती, पण या दोन्ही भूमिकेत उमेश कामत व्यवस्थित सुट होतो. कुठेही कमी पडत नाही. मृण्मयी देशपांडेला दिग्दर्शकाने एक बिहारी मुलगी म्हणून कास्ट केलेलं असलं तरी कोणत्याही angleने ती मराठी मानसिकतेला बिहारी वाटतच नाही. त्यात तिची चूक नसेलही कदाचित कारण ती मुळचीच मराठी वाटते. आणि प्रेक्षकांना हे अनेकदा जाणवते. भरत जाधव याचंहि बर्याच काळानंतर एक कॉमेडी नसलेल्या पण चक्क थोड्या खलनायकी व नंतर सहाय्यक व्यक्तिरेखा बनलेल्या भूमिकेने दर्शन घडते. अरुण नलावडे यांनीही एका छोट्याश्या भूमिकेने छाप सोडलेली आहे.
दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी दिग्दर्शनात (मराठी) या चित्रपटाद्वारे पदार्पण केल असाव कारण त्यांनी बरेच प्रयोग करून बघितलेत. लेखक सचिन मोटे यांच्यासोबत ते सहलेखक आहेत. सलमान खानच्या नवीन आलेल्या जय हो सारख एकदा वापरण्याचा प्रयत्न केलेलं, thank यु व त्याच एक्स्प्लेनेशन हा त्याचं एक उदाहरण. तीन तासाच्या कहाणीने वळणे घेतांना कितपत घ्यावी याला मर्यादा असाव्या लागतात.नव्हे असतातच.पण सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांनी त्या कहाणीला इतकी वळणे दिलीत कि बस,, चक्क एका २०० भाग चालणार्या मराठी मालिकेची कहाणी तीन तासात बसवल्यासारखी वाटते.
कधी कधी अभिनय/दिग्दर्शन/पटकथा/
असो...
मी उमेश कामत व भरत जाधव यांच्या अभिनयासाठी २* स्टार देईल,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा