2 स्टेट्स
चेतन भगत आणि त्यांच्या गाजलेल्या "टू स्टेट्स" या गाजलेल्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट. लेखकाने खरोखर कादंबरी
अतिशय उत्कृष्ट रित्या चित्रित केलेली आहे त्याची कहाणी (सुरवातीलाच कादंबरीत हि त्याची कहाणी आहे हे त्याने घोषित केलेले आहे).चित्रपटातही लेखक तोच असल्यामुळे आधी हे क्लियर करण्याच सौजन्य निर्माते धर्मा प्रोडक्षंस(करण जोहर) आणि नाडीयाडवाला फिल्म्स (साजिद नाडीयाडवाला) या दोघांनीही दाखवलेले आहे.
कहाणी:
"टू स्टेट्स" हि कादंबरी न वाचलेली इंग्रजी येणारी तरुणाई विरळ इतकी हि कादंबरी गाजली होती. (अभ्यासुनी २००८ च्या आसपासचा काळ आठवून बघावा). त्यामुळे त्यावर आधारित चित्रपट आलाच समजा तर तो तिकीट खिडकीवर चालणारच या अंदाजावर मोहर उमटवणारा हा एक चित्रपट. क्रिश मल्होत्रा (अर्जुन कपूर) आणि अनन्या स्वामिनाथन (आलिया भट) या दोघांची कहाणी म्हणजे टू स्टेट्स. पंजाबी मुलगा व तमिळ मुलगी म्हणजे दोघांच्या संस्कृतीत उत्तर-दक्षिण चे अंतर. हे संस्कृतीतले अंतर टिपण्याचे व त्याला शब्दात उतरवताना लेखकाचे कसब वादातीत होते. आणि म्हणूनच हि कादंबरी अफाट लोकप्रिय झाली होती/आहे. अहमदाबाद चा आय आय एम मध्ये शिकणारे दोघंही आणि परिस्थितीने एकमेकांच्या संपर्कात येउन प्रेमात पडलेले दोन व्यक्ती. आता हिंदी चित्रपट आणि प्रेमात पडलेले दोन जीव म्हणजे गाण्यांचा/संगीताचा भरपूर वापर (बागेत/कोलेज मध्ये/होस्टेल मध्ये इ. इ.) हे अपेक्षित होते.पण दिग्दर्शक अभिषेक वर्मनचे कौतुक कारण त्याने कुठेही "अति" होऊ दिलेले नाही.
अभिनय:
टू स्टेट्स मध्ये कहाणी उत्तम होतीच पण पात्रनिवड हा एक इश्यू होण्याचा चान्स होता.पण सांगण्यास आनंद कि क्रिश आणि अनन्या हे दोघेही परफेक्टलि सूट होतात आणि प्रेक्षकांची (कादंबरी वाचलेल्या) अपेक्षा पूर्ण करतात.तमिळ आणि पंजाबी परिवार जर बघितलेले असले तर दोन्ही परिवार एकदम उत्तमरीत्या शोभतात. आणि हा निर्मात्या/दिग्दर्शकाचा/
दिग्दर्शन:
अभिषेक वर्मनचे कौतुक कारण त्याने दोन प्रांत involve असलेली हि गुंतागुंतीची कहाणी एकदम व्यवस्थित हाताळली. पंजाब आणि तामिळनाडू हे दोन प्रांत involve असल्यामुळे टाचणी पडून धुरळा उडण्याचा खूप चान्स होता पण त्याने व्यवस्थित हाताळले.
का बघावा: चेतन भगत हा लेखक एक उत्तम लेखक आहे. "कई पो चे" या त्याच्या एका कादंबरीवर आधारित (वन नाईट एट कॉल सेंटर) एक चीतपट आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे आणि cinematic लिबर्टी या संकल्पनेचा वस्तविकतेशी फारकत घेताना कितपत उपयोग करावा याची जाण असलेला एक लेखक असल्यामुळे नक्कीच बघावा असे वाटते याच्र स्पष्ट उदाहरण म्हणजे त्याचा कादंबरीत एक बॉस दाखवला आहे जो चेन्नई मध्ये त्याची खूप मदत करतो पण हे पात्र चित्रपटात नाही.
एका उत्तम कादंबरीवर आधारलेल्या चित्रपटाला मी 4* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा