बेबी
बेबी हे टायटल वाचून आधी काय आठवते? जर तुम्ही चित्रपट रसिक असाल तर साजिद खानचा हे बेबी नावाचा एक तद्दन फुटकळ सिनेमा जो मी चित्रपटगृहात बघितल्यावर घरी टीव्ही वरही कोणाला बघू दिला नाही. बेबी बघायला जाताना त्याच इम्प्रेशनने जात असाल तर सगळ्यात आधी हे क्लियर करून घ्या कि तसे काहीही नाही. बेबी हे टायटल असूनही अजिबात फुटकळपणा नाही. हिरोइन
नाही व संगीतही नाही. पण हीच सगळ्यात मुख्य व उत्तम गोष्ट आहे.
कथा:
भारतीय सेना अन सेनेतले सिक्रेट एजंट्स हा एक मोठा विषय आहे पण ते एजंट्स विविध मोहिमा पार पाडताना सगळ ground level execution कसे करत असतील हा आपल्या चित्रपट निर्मात्यांचा एक आवडता विषय. याच विषयला घेऊन नीरज पांडे हा नवीन चित्रपट घेऊन आलेला आहे. भारतीय सेना आणि सेनेतले सिक्रेट एजंट्स यांच्यावर असलेली कहाणी म्हणजे पाकिस्तानचा उल्लेख हा अपरिहार्यच आणि तसा तो होतोच. पण पाकिस्तानवर टीका करतानाही भारतीय चित्रपट निर्माते आजवर मुसलमान धर्माचा उल्लेखही टाळायचे. पण बेबी मात्र मुस्लिम धर्मावर प्रत्यक्ष टीकेला वाट करून देऊन कदाचित वाद ओढवून घेतो आहे कि काय अशी शंका येते कारण डायरेक्ट डायरेक्ट मुस्लिम धर्म अन त्याचा दहशतवादाशी संबंध यावर प्रकाश पडतो.
दिग्दर्शन:
नीरज पांडे यांनी अगदी अप्रतिम रित्या हाताळलेला एक विषय आहे हा. नीरज पांडे हे नाव आधीही आपल्याला माहीत आहे, अ वेनस्डे आणि स्पेशल २६ मुळे. पण बेबी खरोखर एक वेगळ्या पठडीतला चित्रपट आहे. भारतीय सिक्रेट सर्व्हिस अन त्यांच्या मोहिमांवर पाकिस्तानथ्रू मुस्लिम धर्मावरील टिप्पण्या त्यांनी व्यवस्थित हाताळलेल्या आहेत.
लेखक व दिग्दर्शक स्वत: नीरज पांडे हेच आहेत आणि धार्मिक वितंडवाद लागला नाही तर कदाचित हा एक उत्कृष्ट चित्रपट म्हणून भविष्यात गणल्या असे वाटून जाते.
एका वेगळ्याच कथेवरील अक्षय कुमार चा अभिनय आणि नीरज पांडेच्या लेखन-दिग्दर्शनासाठी मी बेबी ला साडेतीन (३ १/२*) स्टार देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर






