आय ["I"]
दक्षिण भारतीय चित्रपट हे बघायला आपण जातो तेंव्हा हे लक्षात घ्यायलाच हवं कि कितीही ठिसूळ कथा असली तरी त्या कथेला साकारण्यात इतकी मेहनत घेतलेली असते कि ती मेहनत पदोपदी जाणवते अन रसिक त्या मेहनतीवरच फिदा होतात.आता दिग्दर्शक शंकर जो आधीही आपल्याला नायक आणि अपरिचित मुळे पुरेसा माहित आहे तो एक नवीन आणि वेगळीच कथा घेऊन आलेला आहे.["I "].दक्षिण भारतीय चित्रपट म्हणजे नायक प्रधान हे निश्चित आणि आय हे त्याला अपवाद नाही पण मुख्य अभिनेता विक्रमचे करावे तितके कौतुक कमीच आहे.कथा-पटकथा स्वत: शंकर ने subha च्या साथीने लिहिलेली आहे आणि बघणार्याला वास्तविकतेशी फारकत जाणवली तरी दक्षिण भारतीय चित्रपटात मुबलक आढळणारी cinematic लिबर्टी विचारात घेत तितके अपेक्षितच आहे. मुळात आय ["I "] हे विचित्र टायटल का असा प्रश्न रसिकांना खासकरून हिंदी रसिकांना पडणे अगदी साहजिक आहे पण ["I "] म्हणजे influenza किंवा तत्सम एक व्हायरस आणि त्या व्हायरस मुळे घडणारी कथा. पण हे प्रेक्षकांना शेवटच्या काही मिनिटात कळते. आय ची उकल लवकर होऊ नये हे तत्व शंकर ने कटाक्षाने पाळल्याचे जाणवते. पण चित्रपटगृहाच्या बाहेर जेंव्हा प्रेक्षक पडतो तेंव्हा मध्यंतरापर्यंत जाणवणारी "काहीही न समजल्याची" भावना शेवटी उरत नाही.हेच दिग्दर्शक आणि लेखक शंकरचे यश.
कथा:
लिंगेसन उर्फ लि (विक्रम) हा एक जिम ट्रेनर. मिस्टर तमिलनाडू वगेरे. त्याला आवडणारी एक मोडेल दिया (एमी jackson ) . अपघाताने त्याच्या आयुष्यात झालेली दियाची एन्ट्री. तिला मदत करण्यासाठी त्याची झालेली modelling मधली एन्ट्री.या फिल्ड मध्ये काळात नकळत बनलेले शत्रू. या शत्रूंच्या चक्कर मध्ये झालेली आयची त्याच्या शरीरातली एन्ट्री आणि मग त्याने दिलेला लढा. हि सगळी कथा अनेक flashback च्या वळणांनी फिरते, आणि मध्यंतरापर्यंत काय सुरु आहे याचा थांगपत्ताही प्रेक्षकांना नीटसा लागत नाही.पण मध्यंतरानंतर सगळ हळू-हळू क्लियर होत जाते.या आय अन त्यापासून होणार्या नुकसानाचा लीने घेतलेला सूड त्याच्या वर्तमानकाळाशी को-रिलेट करून कथा संपते.
अभिनय:
विक्रम या तमिळ अभिनेत्याचे कौतुक करावे तितके कमी आहे इतकी अप्रतिमरीत्या लीची भूमिका त्याने उभी केलेली आहे.
सुरवातीला त्याच्या स्ट्रगलच्या काळात म्हणजे तो जिम ट्रेनर असताना त्याचे मिस्टर तामिळनाडू बनण्यासाठी चाललेले प्रयत्न,
त्यात त्याने बनवलेली बॉडी. आता बॉडी आमच्या सलमानकडे पण आहे पण त्याचे presentation जे करणे वयाच्या अट्ठेचाळीसाव्या वर्षी विक्रमने साध्य केले हे खरोखर कौतुकास्पद. हि झाली सुरवातीची गोष्ट, पण नंतर आयचे आगमन झाल्यावर त्या बॉडी-बिल्डरची पूर्ण शेप-चेहरा-आवाज बदलतो. हा मेक-अप जरी असला तरी कमल हसन सारख्या सराईतपणे त्याने त्या मेकअप ला बाळगून त्यातूनही
व्यवस्थित मांडणी केलेली आहे. मुळात असा व्हायरस असू शकतो का? असेल तर त्याच transportation इतकं सोपं असू शकते का? हा जर अस्तित्वात असलाच तर त्याच अस्तित्व आजपर्यंत लक्षात न येत तो गुलदस्त्यात कसा होता? इतका सहजासहजी तो मंडळीना मिळाला कसा? आणि सगळ्यात महत्वाचं, एका डॉक्टर ने त्याचं लीच्या शरीरातलं अस्तित्व शोधल्याच कथेत दाखवल,मग इतका हुशार तो डॉक्टर होता तर त्याने त्याची काट म्हणजे औषध/लस इत्यादी का शोधली नाही? हे प्रश्न तमिळ cinematic लिबर्टी विचारात घेऊन सोडून द्यावे लागतात,हिंदी प्रक्षकांना.
संगीत:
ए आर रहमानने मोजण्यापेक्षा जास्त वेळा निराशा केल्यावर या वेळेस अगदी उत्कृष्ट नाही पण श्रवणीय संगीत दिलेले आहे.
आणि तमिळ चित्रपटात असलेली एकूणच पातळी बघता त्याने दक्षिणी दृष्टीकोनातून उत्तम कामगिरी बजावलेली आहे.
विविध चित्रपटात आवडण्याचे विविध कारणे असतात, या चित्रपटात विक्रमने घेतलेली मेहनत, त्याची एकूणच अभिनयक्षमता लक्षात घेत त्याच्यासाठी मी चित्रपटाला साडे तीन (3 १/२*) देईन. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा