रविवार, २६ जानेवारी, २०१४

जय हो



जय हो

जर तुम्ही सलमान खान अभिनित एखादा चित्रपट बघायला जात असाल,तर हे लक्षात घ्यायला हवच कि त्यात फक्त आणि फक्त सलमान खानच असू शकतो,बाकी काहीही नाही आणि हा ही याला अपवाद नाही,फक्त सलमान खान बस्स बाकी काहीही नाही,सलमान आवडत असल्यास चित्रपट आवडण्याच्या शक्यता खूप पण चित्रपट नीट सर्व दृष्टीने analyse करून बघायची सवय असेल तर......
समजा तीन भाऊ आहेत,आणि मोठ्या भावाने मधल्या भावाचं एखाद अडकलेलं काम आटपून दिल आणि त्यापासून प्रेरित होऊन सगळ्यात लहान भावानेही तसाच हट्ट धरला आणि त्याच्या त्याच मोठ्या भावाने तो हट्ट पुरवण्यासाठी थोडी मेहनत घेतली तर काय होईल? जय हो तयार होतो,बाकीचे संदर्भ दबंग-१ व २. (जिज्ञासूनी संदर्भ तीन खान बंधूंशी लावावा)
कहाणी: जय अग्निहोत्री- एक एक्स आर्मीवाला. स्वभावाने तापट व इमानदार. त्याची एक adjust केलेली कहाणी म्हणजे जय हो.मेगास्टार चिरंजीवी अभिनित तेलगु चित्रपट 'स्टालिन' चा रिमेक. दक्षिणी चित्रपट म्हणजे साहजिकच नायक प्रधान व नायकाला अवास्तव महत्व वाढवून हिरोहिरी बहाल केलेली एक कहाणी.तर हा जय अग्निहोत्री काही कारणाने आर्मितुन बाहेर
पडून सामान्य नागरिकाचे जीवन जगत असलेला पण attitude आर्मिचाच असलेला.तो आर्मितुन का बाहेर पडतो हे विशद वगेरे करण्याचा दिग्दर्शक सोहेल खान याने यत्न केलेला आहे पण तो जमलेला नाही.बाय द वे,या प्रयत्नात सुनील शेट्टीचे
प्रेक्षकांना दर्शन घडून उगाचच त्याचे 'बॉर्डर' काळातले दिवस आठवून जातात आणि दिग्दर्शकाचा तो प्रयत्न नसेलही कदाचित पण तसे प्रेक्षकांना वेशभूषा-संवाद-सिन्सचा अनुक्रम वगेरे याने जाणवून जाते.
तर हा जय अग्निहोत्री इतरांना मदत करण्याची सवय असलेला. थोडक्यात मदत करण्यात समाधान मिळवणारा.
त्याची ती सवय व त्याने त्याची होणारी गृह मंत्री दशरथ सिंग (danny dengzongpa) याच्याशी झालेली भेट व त्या चक्कर मध्ये त्याने वाचवलेला मुख्यमंत्री प्रधान (मोहनीश बेहल) यांचा जीव म्हणजे "जय हो".
लेखक बघितला तर पूर्वीचा अनुभवी व यशस्वी व्यक्ती A R Murugadoss (गजिनी वाला दिग्दर्शक-लेखक) पण इकडे.......
अभिनय: अभिनयात सगळाच फोकस दिग्दर्शक सोहेल खान याने सलमान खान याच्यावर ठेवलेला आहे.आणि सलमान खान त्याला पुरून उरलेला आहे. अक्ख्या चित्रपटात फक्त एकदा ते ही सगळ्यात शेवटी शर्टलेस होतो सलमान पण त्याच्या शरीर सौष्ठवावरून प्रेक्षकांचे लक्ष विचलित होऊ नये हे दिग्दर्शक सोहेल खानचे लक्ष्य व्यवस्थित पूर्ण होते.
वास्तविक बघता दिग्दर्शक सोहेल खान याने सलमान ची एंट्रीच त्याचे सामर्थ्य असलेल्या फायटिंग सिक्वेन्स करवून
रंगत भरण्याचा प्रयत्न केलेला आहे,पण सलमानचे दुसरे एक सामर्थ्य विलक्षण संवाद फेक,याकडे दुर्लक्ष घडलेले जाणवून जाते प्रेक्षकांना बघितल्यावर. अर्थात त्याचाही प्रयत्न आहेच उदाहरणार्थ thank यु व त्याचे एक्स्प्लेनेशन पण भट्टी.....
संगीत:साजिद-वाजीद जोडी व इतर दोन नाव नसलेले संगीतकार आहेत पण भट्टी... वास्तविक बघता अभिनेत्री डेझी शाह
ही नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांची मदतनीस,त्यामुळे नृत्यात वाकबगार,दिग्दर्शक सोहेल खान यानेही याला महत्व देत तिची एंट्री गाण्याद्वारे म्हणजेच नृत्याद्वारे करवलेली आहे,पण .........
जर तुम्ही सलमान खान या व्यक्तीचे fan असाल तर तुम्हास एकदम योग्य चित्रपट बघण्यास
मी फक्त सलमान खानसाठी अर्धा १/2* देईन,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा
-समीर

रविवार, ५ जानेवारी, २०१४

टाईमपास (मराठी)



टाईमपास (मराठी)

जर कुणी शेखर राजीवनी (विशाल शेखर जोडीपैकी एक) "साजणी" हे गाण ऐकल असेल,तर त्याचा कवी अन दिग्दर्शक रवि जाधव दिग्दर्शक म्हणून पुन्हा एक मराठी सिनेमा घेऊन आलाय, "बालक पालक" व "नटरंग" चा दिग्दर्शक या ओळखीबरोबरच आता या पुढे टाईमपास चा दिग्दर्शक म्हणून देखील ओळखला जाईल असे जाणवून जाते बघितल्यावर.

कहाणी: प्राजक्ता व दगडू परब हे दोघ टीनएजर्स व त्यांच्यातील बनलेली व बनूनही तुटलेली केमिस्ट्री म्हणजे टाईमपास. प्राजक्ता-एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी,वडलांच्या छत्रछायेत वाढलेली,सदैव एका "सेफ" वातावरणा शिवाय दुसरा अनुभव न घेतलेली. दगडू- एका कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातील मुलगा,दहावी पास होणे इतपत क्षुल्लक अपेक्षाही स्वत:च्या अपूर्ण असलेला.थोडक्यात स्ट्रगल या कन्सेप्टशी बर्यापैकी परिचय असलेला व स्ट्रगल करण्यातच आयुष्य घालवणारा. पण त्या दोघांची झालेली भेट व प्राजक्ताला पडलेली त्याच्या स्वतंत्र वागण्याची भुरळ व त्या दोघांची अचानक बनलेली व फुललेली केमिस्ट्री.हि त्यांच्यातली केमिस्ट्री बनणे व फुलणे हा अतिशय आल्हाददायक भाग सिनेमातला. तरुण पिढीला हे कितपत आवडेल यावर कमर्शियलि सिनेमाचे यश अवलंबून राहील.
अभिनयात केतकी माटेगावकर व प्रथमेश परब यांनी आपापल्या रोल मध्ये व्यवस्थित सूट होऊन छाप सोडलेली आहे. संगीत दिग्दर्शनात चिनार-महेश या नवीन जोडीला निर्मात्या झी टोकीज ने संधी दिली व त्यांनीही अगदीच उल्लेखनीय नसल तरी उत्तम संगीत दिलेले आहे. मराठी चित्रपट इतिहासातील किंवा असे म्हणूया रिसेंट काळातील पहिल्याच आयटम सॉंग ला देखील व्यवस्थित संगीत दिलेले आहे.

दिग्दर्शक रवि जाधव यांनीच कहाणी लेखनाची व संवादलेखनाची जबाबदारी उचललेली आहे. पण सांगण्यास आनंद कि कोठेही कमीपणा जाणवत नाही. उलट काही उत्तम संवाद प्राजक्ताचे प्रमोशन साठी वापरून निर्मात्यांनी तरुण प्रेक्षकांची उत्सुकता ताणण्यासाठी चांगलेच केलेले आहे. पटकथा लेखनातही ते सहलेखक आहेत. आणि सगळ्यात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे या सिनेमाचा शेवट आनंदात किंवा दु:खात न करता "to be continued " असा अर्धवट ठेवून निर्मात्यांनी स्वत:च सिक्वेल साठी स्कोप ठेवलेला आहे. अन्यथा "रांझना/आशिकी-२" सारखा दुखी शेवटही शक्य होता पण त्यांचे वय बघता रांझना सारखा शेवट करण्यातला कमर्शियलि फोलपणा ताडून रवि जाधवने सिनेमा बघणाऱ्या मराठी मानसिकते साठी पॉजीटिव्ह विचारसरणीला स्कोप ठेवण्यासाठी शेवट न करता सिक्वेल मध्ये सगळ "ऑल इज वेल" दाखवण्यासाठी थोडक्यात प्रेम या संकल्पनेला सावरण्यासाठी शेवट न करता चक्क अर्धवट ठेवलेली आहे कहाणी.

थोडक्यात काय तर एक उत्तम सिनेमा,कुठलेही व्यंग मला न जाणवलेला.मी सिनेमाला पूर्ण ५* देईन पाच पैकी
-समीर

बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

धूम-३

धूम-३

आधी याच नावाचे यशराज फिल्म्सचेच दोन सिनेमे येउन गेले. या खेपेस आपला भाउ उदय चोपरा याला अभिनय क्षेत्रात प्रस्थापित करण्याचा आदित्य चोप्रा या त्या निर्मिति संस्थेच्या सर्वेसर्वाचा एक प्रयत्न असे म्हणता याव या साठी धूम-३. 

धूम म्हणजे दिग्दर्शक संजय गढ़वि व लेखक विजय कृष्ण आचार्य आस समीकरण आजवर होत पण यावेळेस आदित्य चोप्राने संजय गढवीला बाय बाय करून कहाणी व पटकथा लेखकालाच दिग्दर्शनाची संधी दिली. ती त्याने अर्थातच तोडीस तोड निभावण्याचा प्रयत्न केला पण.....
धूम म्हणजे आजवर थरारक चोर्या व त्यातल्या चोराला पकडण्यासाठीची धावपळ अस आजवर समीकरण होत
याही वेळेस थोडफार तेच पण नवीन दिग्दर्शकाने त्याला भावनेची फोडणी देण्याचा प्रयत्नही केलेला आहे.
त्याच्या प्रेक्षकांना पटण्या न पटण्यावर कमर्शियलि सिनेमाचे भवितव्य अवलंबून राहील.

धूम-३ ची कहाणी हि आधीच्या धूम-१ व धूम-२ शी कोणताही संपर्क न दाखवता एक पूर्णपणे वेगळाच प्लॉट कथेचा दाखवते. निर्माता व दिग्दर्शक हेच दोघ कथालेखक व दिग्दर्शक हाच पटकथा लेखक,त्यामुळे बरेच त्यांचे practicle प्रॉब्लेम्स निकालात निघाले असतील निर्मिती अवस्थेतच. या कहाणीत भावनेचा ओलावा आणण्यासाठी म्हणू पण सुरवातीला काही काळ जकी श्रॉफ ची वर्णी लेखक दिग्दर्शकाने लावलेली आहे. आणि खरोखर jackie भाऊ त्यात पूर्ण
फिट बसून सामान्य प्रेक्षकांना आमिर खानच्या महत्वाच्या व्यक्तिरेखे बाबत involve होण्यास भाग पाडतात.
खरे तर आमिर खानची व्यक्तिरेखा हि धूम-३ चा प्राण असे म्हणता येईल. दुहेरी भूमिका अगदी राम और श्याम पासून आजवर अनेक जणांनी निभावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आमिर स्वत:च एक दिग्दर्शक असल्यामुळे त्याला त्यातील खाच-खळगे व येणारे प्रॉब्लेम्स यांची जाणीव जात्याच असल्यामुळे अभिनय करताना त्याने अनेक प्रसंगात वेगळेपण जपलेले जाणवते. अगदीच लेटेस्ट उदाहरण घ्यायचे म्हटले तर औरंगझेब या सिनेमात अर्जुन कपूर ने साकारलेल्या दुहेरी भूमिकेचे घेता येईल. त्यात भूमिकेत टीकाकारांना बराच स्कोप सुटला होता प्रॉपर सामिक्षणासाठी. पण इथे
आमिर खानने पूर्ण जीव ओतून या दोन्ही भूमिका साकारलेल्या आहेत. दोन भाऊ जेंव्हा समोर समोर एकाच फ्रेम मध्ये असतात तेंव्हा अभिनयाचे कौशल्य व दिग्दर्शन यांची कसोटी लागते. पण आमिर खान येथे अगदी पुरेपूर उतरलेला आहे दिग्दर्शकाच्या/निर्मात्याच्या//प्रेक्षकांच्या अपेक्षेवर.
दिग्दर्शनाबाबत खरोखर कसोटी लागत असेल जेंव्हा दुचाकीवर चित्तथरारक stunts चित्रपटात असतात तेंव्हा. दोन वेळेस संजय गढवी यावर पुरेपूर उतरला आणि या वेळेस विजय कृष्ण आचार्यची कसोटी होती. पण सांगण्यास आनंद कि दिग्दर्शनात कुठेही उणीव जाणवत नाही. भावनिक प्रसंगानपासून अगदी stuntबाजी पर्यंत सगळे व्यवस्थित पार पडते पण कुठेतरी प्रेक्षकांना या सगळ्याची वास्तविकता खुपल्याशिवाय राहत नाही उदाहरणार्थ कतरिना कैफ व तिची भूमिका, भलेही कथेला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचीच आहे पण वास्तविकतेत तिला काहीच कधीच स्ट्राईक कस होत नाही कथेच्या मुळाबद्दल असे प्रेक्षकांना जाणवून गेल्याशिवाय राहत नाही.

प्रीतमचे संगीत दिग्दर्शन चांगलेच. वादच नाही. त्याच्या धूम च्या टायटल सॉंगचा आधीच्या धुम्स च्या लोकप्रियतेत मोलाचा वाटा आहे. टायटल सॉंग याही वेळेस तेच. पण या वेळेस कतरिना कैफ व तिच्या अंगोपांगाच्या प्रदर्शनाच्या नादात बाकी गाण्याकडे दुर्लक्ष झालेले जाणवते कित्येक प्रसंगात.

टू व्हीलर व त्याचे stunts आवडत असतील तर खरोखर एक उत्तम सिनेमा व आमिर खान fans साठी तर मस्टwatchच.

पूर्ण चित्रपटाला मी चार ४* देईन
-समीर

रविवार, १ डिसेंबर, २०१३

असा मी अशी ती (मराठी)



असा मी अशी ती (मराठी)

जर तुम्ही सचित पाटील या 'झेंडा' मुळे लोकप्रिय झालेल्या नावामुळे इम्प्रेस होऊन हा सिनेमा बघणार असाल तर 
एक गोष्ट लक्षात ठेवा कि यात फक्त आणि फक्त सचित पाटीलच आहे,बाकी काहीही नाही. प्रेम या कल्पनेवर 
मराठी सिनेमा बेतणे हे लागूच असते व हा हि प्रयत्न त्याला अपवाद नाही. स्वामी समर्थ यांच्यामुळे दिग्दर्शक अतुल काळे व निर्माती उषा साळवी हे इतके संमोहित (म्हणूयात का?) कि नशीब या कल्पनेचा समावेश कथेत करून देवदुतांचा समावेश कथेत होऊन त्या देवदूतांची वेशभूषा प्रत्यक्ष स्वामी समर्थांची देऊन सामान्य
प्रेक्षकांच्या भावनेला हात घालण्याच्या प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.
दिग्दर्शक अतुल काळेंचे खरोखर कौतुक कारण त्यांनी 'होम मिनिस्टर' फेम आदेश बांदेकरांचा समावेश त्याच
भूमिकेत करून त्याचा उपयोग कथेचा एक महत्वाचा हिस्सा पुढे नेण्यासाठी बेमालूमपणे केलेला आहे. आदेश बांदेकर
किंवा होम मिनिस्टर या दोन्ही गोष्टीना प्रसिद्धीची कोणतीही आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांचा समावेश जर करायचाच तर तो प्रसिद्धीसाठी नाही या वास्तविकतेबरोबर महिला प्रेक्षक वर्ग राजी व्हायला हवा तरच काही सिरीयसनेस येईल हे व्यवस्थित काळजी घेऊन त्यांच्या अन्वये कथा पुढे नेलेली आहे अतुल काळेनि.
कहाणी:
प्रेम हि मराठी सिनेमाची अत्यंत आवडती ठोकळेबाज एक कल्पना. दिग्दर्शक अतुल काळे हे स्वत:च लेखक
व मुख्य भूमिकेतील सचित पाटील हे त्यांच्या सोबतीने सहलेखक. पण सामान्य प्रेक्षकाला कहाणीत मूळ
काय हे शेवटपर्यंत कन्फ्युजन राहते व शेवटी दूर कारणाचा प्रयत्न लेखक द्वयीने केलेला आहे पण तोपर्यंत खूप उशीर होऊन जातो व काहीही अर्थ राहत नाही. तस बघितल तर कहाणीचा उद्देश अतिशय कौतुकास्पद,सकारात्मक विचारसरणीला खतपाणी देण्याचा प्रयत्न पण अंधश्रद्धेला खतपाणी आहे कि काय या अजब कन्फ्युजन पर्यंत सामान्य प्रेक्षक येउन ठेपतो शेवट पर्यंत पण शेवटी लेखक द्वयीने तुम्ही नशीब आपले बदलू शकता या
कल्पनेवर भर देण्याचा (लोकलाजेस्तव?) एक प्रयत्न नक्की घडवलेला जाणवतो
अभिनय:
सचित पाटील हा मुख्य भूमिकेत व स्वत: एक लेखक. त्यामुळे अप्रत्यक्षपणे वा अजाणतापणे त्याच्या भूमिकेला जास्त फुटेज मिळालेले आहे. किंबहुना अपेक्षेपेक्षा जास्तच. त्याचा प्रेम या कन्सेप्ट ला साकारताना (दोन वेळा
साकारतानाही) कुठेही आपल्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळणार नाही उलट सकारात्मक विचारसरणीचा
शेवटी मुख्यत्वे वापर दाखवताना त्या अन्वये प्रेक्षकांच्या भावनांना ठेच पोचणार नाही याची स्वत: लेखक असल्यामुळे त्याने व्यवस्थित काळजी घेतलेली आहे.

सध्याच्या छोट्या पडद्यावर स्टार प्लस वाहिनीवर
गाजणाऱ्या 'प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा' या मालिकेतील"अवंतिका" मानसी साळवीने एका छोट्याश्या पण महत्वाच्या भूमिकेत छाप सोडलेली आहे. वास्तविक पाहता त्या मालिकेत तिचा जो मुलगा दाखवलेला आहे (आदित्य) त्याच सारख्याच वयाचा सचित पाटील आहे (इथला नवरा) पण तिने समर्थपणे पेललेली भूमिका आहे असे प्रेक्षकांना जाणवल्या शिवाय राहत नाही आणि पल्लवी सुभाष हिने अप्रतिम अभिनय केलेला आहे. वास्तविक बघता तिची
भूमिका खूप कठीण या सदरात मोडली असती पण तिने अंधश्रद्धेला खतपाणी न घालणे/प्रेम या कन्सेप्टला साकारण्याच्या प्रयत्नात प्रक्षकांना पचणार नाही या पातळीवर न पोचणे/एका लहान मुलाच्या भावनेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे असा गैरसमज प्रेक्षकांचा होऊ न देणे असे अनेक उद्देश लेखकद्वयीचे व्यवस्थित पार पाडलेले आहे. थोडक्यात एक उत्तम भूमिका निभावलेली आहे.
संगीत:
अमितराज व आदित्य बेडेकर असे दोन संगीत दिग्दर्शक वापरलेले आहेत. संगीत अगदीच extraordinary वगेरे नसले तरी अगदीच टाकाऊहि नाही. पण निर्माती उषा साळवी तरीही चक्क एका हिंदी गाण्याचा समावेश सिनेमात का करत असतील असे कोडे प्रेक्षकांना पडल्याशिवाय राहत नाही. ते गाण 'उत्तम' categoryत मोडते पण शेवटी हिंदीच,मराठी सिनेमात त्याचा उपयोग काय हे प्रेक्षकांना जाणवल्या शिवाय राहत नाही.

रेटिंग: मी या चित्रपटाला १* देईन
-समीर

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१३

गोलीयो कि रासलीला-राम लीला

गोलीयो कि रासलीला-राम लीला 

प्रथितयश दिग्दर्शक,सहपटकथा लेखक,सह संगीतकार,सह कथालेखक संजय लीला भंसाली यांचा एक न जमलेला प्रयत्न म्हणजे रामलीला. रणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांना एका सुंदरशा लव्ह स्टोरीने री-लॉंच करण्याचा एक न जमलेला प्रयत्न म्हणजे रामलीला. चित्रपटाच्या आधीच 'बेस्ड ऑन' रोमियो व ज्युलिएट अशी ठसठशीत सूचना पण प्रेम हि कन्सेप्ट सोडून त्यावर बेतण्याचा काय रोल हे कोणालाच काळत नाही. सह संगीतदिग्दर्शक असल्यामुळे (कि असूनही?) स्वत: संजय लीला भंसाली पण इस्माईल दरबारची पदोपदी आठवण करून देणारे संगीत. अगदी 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटांच्या घेतलेल्या अनेक ट्युन्स.

थोडक्यात एक फसलेला प्रयत्न.

मी १ * देईन
-समीर

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१३

एक थी डायन


एक थी डायन

एक अप्रतिम हॉरर चित्रपट.कोणत्याही हॉरर चित्रपटाची हि खासियत असते कि भीती वाटावी पण तिरस्कार वाटू नये,
त्या अपेक्षेवर पुरेपूर उतरणारी एक कलाकृती. एकता कपूर (बालाजी टेलिफिल्म्स) आणि विशाल/रेखा भारद्वाजहे निर्माते  कानन अय्यर हे दिग्दर्शक,मुख्य भूमिकेत  इम्रान हाशमी,पण सांगण्यात हा आनंद कि कोणतेही शरीर प्रदर्शन नाही,स्त्री देहाचे दर्शन नाही,इव्हन "हाश्मी खासियत"
एक किसिंग सीन पण नाही. एक छोटासा आहे पण इतक चालायचच. 

हॉरर चित्रपट म्हटल कि अति मानवीय शक्ती  त्यांचा मानवीय जीवनावर पडणारा प्रभाव हे विशद करण्यात लेखक किती यशस्वी ठरलाय यावर कहाणीच भवितव्य ठरते.पण लेखक द्वयी मुकुल शर्मा  विशाल भारद्वाज स्वत:हे यात पूर्ण यशस्वी झालेत.  इम्रान हाश्मी हा एक जादुगार. आता त्याच्या जादुगारीत हातचलाखी किती  जादू किती हे मुख्य प्रश्न लेखक दिग्दर्शकाने मुद्दाम अनुत्तरीत ठेवलेत. आणि इम्रान चा अतिमानविय व्यक्तींमध्ये नंतर समावेश करून आपोआप याच उत्तर दिलेलं आहे

हा 'बोबो'(इम्रान हाश्मी) लहानपणापासून जादूत इंटरेस्ट असलेला.तो इतका इंटरेस्ट काइतकी प्रगती त्यात का/त्याच्या जवळच्या 
लोकांचा त्यात मदतरुपीप्रतीसाद का असे अनेक प्रश्न लेखक द्वयी  दिग्दर्शकाने नंतर निकालात काढलेले आहे. हा जो बोबो असतो तो नंतर किंवा सुरवातीपासूनच एका विच उर्फ फिमेल भूत च्या संपर्कात आपोआप येतो.
 निर्मात्याने सिनेमाच्या सुरवातीलाच टायटल्स च्या हि आधी हे सांगून टाकलंय कि भूत म्हणजे फिमेल्स असा गैरसमज पसरवण्यात वाढवण्यात त्याचा काहीही हेतू नाही हि सगळी कथा काल्पनिक आहेय़ विशेष सूचनेच महत्व नंतर पटते.

बॉलिवूड हॉरर चित्रपटात पार्श्व संगीत हा 'आत्मा' असतो.उदहरणार्थ फक्त एक 'खुट्ट' पण त्याची इंटेनसिटी चुकली तर तो प्रसंग हास्यास्पद बनायला वेळ लागत नाही. पण संगीतकार विशाल भारद्वाजने  ने ती जबाबदारी समर्थपणे निभवून सिनेमाला हास्यास्पद होण्यापासून वाचवलेलं आहे     
          . 
एका भूमिकेत कोंकणा सेन-शर्मा व हुमा कुरेशी ने हि छाप सोडलेली आहे 

बॉलीवूड चित्रपट सृष्टीत असलेला हॉरर चित्रपटाचा सुकाळ लक्षात घेता एक खरोखरच उत्तम चित्रपट असे मी म्हणेन मी याला चार 4* देईन,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा

-समीर       

गुरुवार, ४ एप्रिल, २०१३

टीव्ही वरची धूळ

टीव्ही वरची धूळ
नेहमीच्या भांडणाला कारण मिळाल
पण देव-दयेने त्याच टीव्हीतल्या सासू-सुना योग्यवेळी भांडल्या 
अन त्या रोजच्या भांडणात 
आमच भांडण विरलं 

तीच वाढत वजन 
आमच्या भांडणाला पुन्हा एक कारण बनल 
पण त्याच वेळी पिझ्झा हट वाल्यांची 
फ्री होम डिलिव्हरी मी स्मरली 
अन आमच भांडण विरलं 

फिरायला जाऊया म्हणे 
गमतीत गाडी पेट्रोल पंपावर टाकली 
नेहमीचं भांडणाला कारण बनलं 
अन त्याच वेळी नेमका गाडीनी ड्रायचा दिवा लावला 
त्या क्षीण प्रकाशात 
आमच भांडण विरलं 

आमच्या भांडणाच सदाहरित कारण 
तिच्या दिसण्यावर मी दिलेली कॉमेंट 
पुन्हा एकदा कारण बनल 
पण नेमका त्याच वेळी आय सर्जन मित्राचा फोन यावा 
तिच्या डोळ्यांची त्याने चौकशी करावी 
भौजींच्या त्या चौकशीत आमच भांडण विरलं

तिचा नि माझा 
स्वयंपाक घरातला प्रवेश 
दिसण्या इतकच आमच्या भांडणच सदाहरित कारण बनल 
पण नाही म्हटल तरी पंजाब्यांच कौतुक 
त्यांनी सगळीकडे धाबे काढले 
त्या प्लान मध्ये 
आमचं भांडण विरलं 

-समीर