रविवार, १ डिसेंबर, २०१३

असा मी अशी ती (मराठी)



असा मी अशी ती (मराठी)

जर तुम्ही सचित पाटील या 'झेंडा' मुळे लोकप्रिय झालेल्या नावामुळे इम्प्रेस होऊन हा सिनेमा बघणार असाल तर 
एक गोष्ट लक्षात ठेवा कि यात फक्त आणि फक्त सचित पाटीलच आहे,बाकी काहीही नाही. प्रेम या कल्पनेवर 
मराठी सिनेमा बेतणे हे लागूच असते व हा हि प्रयत्न त्याला अपवाद नाही. स्वामी समर्थ यांच्यामुळे दिग्दर्शक अतुल काळे व निर्माती उषा साळवी हे इतके संमोहित (म्हणूयात का?) कि नशीब या कल्पनेचा समावेश कथेत करून देवदुतांचा समावेश कथेत होऊन त्या देवदूतांची वेशभूषा प्रत्यक्ष स्वामी समर्थांची देऊन सामान्य
प्रेक्षकांच्या भावनेला हात घालण्याच्या प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.
दिग्दर्शक अतुल काळेंचे खरोखर कौतुक कारण त्यांनी 'होम मिनिस्टर' फेम आदेश बांदेकरांचा समावेश त्याच
भूमिकेत करून त्याचा उपयोग कथेचा एक महत्वाचा हिस्सा पुढे नेण्यासाठी बेमालूमपणे केलेला आहे. आदेश बांदेकर
किंवा होम मिनिस्टर या दोन्ही गोष्टीना प्रसिद्धीची कोणतीही आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांचा समावेश जर करायचाच तर तो प्रसिद्धीसाठी नाही या वास्तविकतेबरोबर महिला प्रेक्षक वर्ग राजी व्हायला हवा तरच काही सिरीयसनेस येईल हे व्यवस्थित काळजी घेऊन त्यांच्या अन्वये कथा पुढे नेलेली आहे अतुल काळेनि.
कहाणी:
प्रेम हि मराठी सिनेमाची अत्यंत आवडती ठोकळेबाज एक कल्पना. दिग्दर्शक अतुल काळे हे स्वत:च लेखक
व मुख्य भूमिकेतील सचित पाटील हे त्यांच्या सोबतीने सहलेखक. पण सामान्य प्रेक्षकाला कहाणीत मूळ
काय हे शेवटपर्यंत कन्फ्युजन राहते व शेवटी दूर कारणाचा प्रयत्न लेखक द्वयीने केलेला आहे पण तोपर्यंत खूप उशीर होऊन जातो व काहीही अर्थ राहत नाही. तस बघितल तर कहाणीचा उद्देश अतिशय कौतुकास्पद,सकारात्मक विचारसरणीला खतपाणी देण्याचा प्रयत्न पण अंधश्रद्धेला खतपाणी आहे कि काय या अजब कन्फ्युजन पर्यंत सामान्य प्रेक्षक येउन ठेपतो शेवट पर्यंत पण शेवटी लेखक द्वयीने तुम्ही नशीब आपले बदलू शकता या
कल्पनेवर भर देण्याचा (लोकलाजेस्तव?) एक प्रयत्न नक्की घडवलेला जाणवतो
अभिनय:
सचित पाटील हा मुख्य भूमिकेत व स्वत: एक लेखक. त्यामुळे अप्रत्यक्षपणे वा अजाणतापणे त्याच्या भूमिकेला जास्त फुटेज मिळालेले आहे. किंबहुना अपेक्षेपेक्षा जास्तच. त्याचा प्रेम या कन्सेप्ट ला साकारताना (दोन वेळा
साकारतानाही) कुठेही आपल्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळणार नाही उलट सकारात्मक विचारसरणीचा
शेवटी मुख्यत्वे वापर दाखवताना त्या अन्वये प्रेक्षकांच्या भावनांना ठेच पोचणार नाही याची स्वत: लेखक असल्यामुळे त्याने व्यवस्थित काळजी घेतलेली आहे.

सध्याच्या छोट्या पडद्यावर स्टार प्लस वाहिनीवर
गाजणाऱ्या 'प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा' या मालिकेतील"अवंतिका" मानसी साळवीने एका छोट्याश्या पण महत्वाच्या भूमिकेत छाप सोडलेली आहे. वास्तविक पाहता त्या मालिकेत तिचा जो मुलगा दाखवलेला आहे (आदित्य) त्याच सारख्याच वयाचा सचित पाटील आहे (इथला नवरा) पण तिने समर्थपणे पेललेली भूमिका आहे असे प्रेक्षकांना जाणवल्या शिवाय राहत नाही आणि पल्लवी सुभाष हिने अप्रतिम अभिनय केलेला आहे. वास्तविक बघता तिची
भूमिका खूप कठीण या सदरात मोडली असती पण तिने अंधश्रद्धेला खतपाणी न घालणे/प्रेम या कन्सेप्टला साकारण्याच्या प्रयत्नात प्रक्षकांना पचणार नाही या पातळीवर न पोचणे/एका लहान मुलाच्या भावनेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे असा गैरसमज प्रेक्षकांचा होऊ न देणे असे अनेक उद्देश लेखकद्वयीचे व्यवस्थित पार पाडलेले आहे. थोडक्यात एक उत्तम भूमिका निभावलेली आहे.
संगीत:
अमितराज व आदित्य बेडेकर असे दोन संगीत दिग्दर्शक वापरलेले आहेत. संगीत अगदीच extraordinary वगेरे नसले तरी अगदीच टाकाऊहि नाही. पण निर्माती उषा साळवी तरीही चक्क एका हिंदी गाण्याचा समावेश सिनेमात का करत असतील असे कोडे प्रेक्षकांना पडल्याशिवाय राहत नाही. ते गाण 'उत्तम' categoryत मोडते पण शेवटी हिंदीच,मराठी सिनेमात त्याचा उपयोग काय हे प्रेक्षकांना जाणवल्या शिवाय राहत नाही.

रेटिंग: मी या चित्रपटाला १* देईन
-समीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा