सहज अस वाटल,कि देवा
जवळ समजा सुपर
कॉम्प्यूटर असला तर
तो किती बिझी
असेल,म्हणजे पहा
ना प्रत्येकाच्या पाप
अन पुण्यांचे हिशेब
ठेवण प्रत्यक्ष देव
जरी असला तरी
लोकसंख्या इतकी आहे कि
त्याला जिकिरीच जात असेल.एक तरी
सुपर कोम्पूटर असेलच
.फॉर ex. या व्यक्तींनी
मागच्या जन्मात हे पुण्य
केल आहे त्याला
या जन्मात हे
सुख द्या या
दुसर्या व्यक्तींनी मागच्या जन्मात
हे पाप केल
होत याला हे
दु:ख द्या
किती जिकिरीच काम
असेल .जर कविता
लिहू असे म्हटले
तर किती खतरनाक
सब्जेक्ट होईल
देवाचा 'सुपर कंप्युटर'
देवाचा हिशेब कसा असेल
मला पडला होता
प्रश्न
उत्तर शोधता शोधता उत्तर
गवसलं
अन चक्क भेटला
वरचा सुपर
कम्प्युटर
विचार करा किती
त्रासला असेल तो
देवाचा 'सुपर कंप्युटर'
कारण म्हणे हिशेब ठेवण
नसते जोक
खास करून अजिबात
नाही 'वर'
या व्यक्तीने केल फक्त इतकच पुण्य
याला आता
घडवा हा दैवयोग
अन त्या व्यक्तीचे
हे पाप
याला आता फक्त
योगायोग
यांनी हि सेवा
केली होती त्या
वेळेस
म्हणून याचं काम
अडायला नको या
वेळेस
बर देवही नसेल पक्का
आपल्याच निर्णयावर
दर वेळेस त्याचीच कमांड
फिरते
चित्रगुप्ताच्या कोणत्याही
डिसिजनवर
कुणाजवळ उपलब्ध असते
केलेल्या पापांना डिलीटचे ऑप्शन
कुणाला तोही पर्याय नाही
उरते यमाचे फक्त लांच्छन
कधी मी असा विचार
करतो कि
मी चित्रगुप्त नाही हे
किती बरय
अप्पर व्ह्यू ने ब्रॉड
गोष्टी
बघाव्या लागत नाहीत
हे किती चांगलय
'हा' म्हणे मागच्या जन्मात
होऊच शकायचा नाही एकाग्र
मग त्याला या जन्मात
बनवा एकदम कुशाग्र
'हिचा' म्हणे मागच्या जन्मात
देवावर नव्हता विश्वास
या जन्मात देवाला
वाटली पाहिजे भक्ती खास
हा होता मागच्या
जन्मात
अगदीच जीवन वेस्ट
याला बनवा या
जन्मात
अगदी समकक्ष बिल गेट्स
'हा' म्हणे मागच्या जन्मात
होता राजकीय पण अपयशी
कार्यकर्ता
याला म्हणे मग या
जन्मात
बनवा त्याच पक्षाचा सर्वेसर्वा
मग वेळ आली
कि
मीच त्याला थांबवल
म्हटल तुझी आपबिती
बस झाली
आता माझ डोक
गरगरल
मला भारतीय नोकरशहांची सवय
म्हटल बोल मित्रा
काही जमते का?
माझ पाप असेलच
हिशेबात
पुण्यात बदलण शक्य
वाटते का
मग शेवटी तो म्हटला
म्हणे इथे होत
नाहीत कोणतेच काम
भ्रष्ट
म्हणे देवाचा पूर्ण वचक
आहे
विचारहि करू
नका नतद्रष्ट
समीर