रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

इर्शाद

इर्शाद

प्रथितयश नट-कवी-गीतकार-आधुनिक काळातील तरुणाईला कवितांच्या जवळ आणणारे व्यक्तिमत्व संदीप खरे आणि कवी वैभव जोशी यांनी रसिकांच्या सेवेत "स्वरचित कवितांची एक मुक्त मैफल" नावाची संकल्पना आणली असून आज या संकल्पनेच्या दुसऱ्या प्रयोगाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.

Sandip Khare autograph - 



आयुष्यावर बोलू काही या गाणे\कवितांच्या अजरामर संकल्पनेतून कवितावाचन या संकल्पनेशी तरुणाईचा अन रसिकांचा परिचय झाला. याच संकल्पनेला पुढे नेत,   बऱ्याच कवींच्या  स्वरचित अप्रतिम कविता ज्या संगीतबद्ध नाहीत किंवा नाद-लय नसल्यामुळे टेक्निकली कमी पडून संगीतबद्ध होण्यास अडचण निर्माण होते  अश्या कवितांना रसिकांसमोर आणण्याची एक संधी या मैफिलीतून मिळालेली आहे. मान्य असो व नसो हि संकल्पना एक अभिनव कल्पना असून फार लवकर लोकप्रियतेच्या शिखरावर पोचेल असा भरवसा मला आज दुसऱ्याच प्रयोगातून झाला.

कविता वाचनाच्या कार्यक्रमात संगीत नसल्यामुळे हा कार्यक्रम 'रटाळ' होण्याची पुरेपूर संधी होती. पण संदीप खरेंची शैली आणि त्या शैलीला वैभव जोशींची मिळालेली पुरेपूर साथ अन मिळालेली कार्यक्रमाला उपस्थित इतर सेलिब्रिटींची जोड या सर्व एकत्रित सहभागातून तीन तासांहून काही मिनिटे  जास्त रंगलेला हा कार्यक्रम शब्दश: अप्रतिम होता.      

या कार्यक्रमाचा उद्देश स्वरचित कविता इतका स्पष्ट असला तरी त्यांना वाटलेल्या त्यांच्या मित्रमंडळीत इतर कवींच्या अप्रतिम कवितांचा समावेश या कार्यक्रमात करण्यात आलेला होता. हा कवितेच्या निवडीवर  श्री संदीप खरेंच्या व्यावसायिकतेची पूर्ण छाप होती. प्रेम-तरुणाई-पाऊस-म्हातारपण इत्यादी असंख्य विषयांना स्पष्ट करणाऱ्या कविता कार्यक्रमात होत्या. या सगळ्या कवितांच्या समावेश स्पष्ट उल्लेख संदीपजींनी कार्यक्रमातून विशद केला कि उत्तम कवितांचा परिचय रसिकांना व्हावा.


हि संकल्पना नवीनच असली, अन संगीताविना असली हे एक महत्वाचे असले, तरीही या अप्रतिम संकल्पनेसाठी संदीप खरे अन वैभव जोशी या दोघांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
-समीर 

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

बघ काही सुचतंय का?

बघ काही सुचतंय का?

रात्रिच्या त्या काळोखात
अंधाराच्या अनेक अदात
अदांच्या त्या नशील्या पळात
पळ पळ पुढे सरकताना
कधी- कधी.....
मीच मला विचारतो
बघ काही सुचतंय का?............

नशिबाच्या सरकत्या डौलावर
मैलो-न-मैल निर्विकार जगण्यावर
जगण्यातल्या तृप्त-अतृप्त तेवर
अनेक हव्यासांच्या मृगजळावर
विचार करताना....
कधी- कधी.....
मीच मला विचारतो
बघ काही सुचतंय का?............

निसर्गाच्या अपुर्वाईला धरताना
तृणपातापरि आयुष्य वेचताना
कण्-कण जगणे धुंडाळताना
दु:खाच्या वर्षावात सुखाची छ्त्री बनताना
कधी- कधी.....
मीच मला विचारतो
बघ काही सुचतंय का?............

वळणदार पण कृत्रीम चौकटीवर
चौकटीमध्ये बदध चाकोरीवर
चाकोरितील व्यस्त प्रमाणावर
प्रमाणाच्या प्रमाणाबाहेर वळणावर
विचार करताना....
कधी- कधी.....
मीच मला विचारतो
बघ काही सुचतंय का?............

जगण्यातील क्लिष्टता समजुन घेताना
समजताना होणारा त्रास भोगताना
भोगाच्या शक्या-शक्यतेवर प्रकाशताना
प्रकाशाचे ते मनस्विपण पुन्हा पुन्हा जगताना
कधी- कधी.....
मीच मला विचारतो
बघ काही सुचतंय का?............

-समीर 

रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

शिवाय

शिवाय

अभिनेता अजय देवगण हे आता दिग्दर्शक बनले असून कारकिर्दीतील या नव्या टप्प्यात प्रेक्षकांसाठी एक नवीन कलाकृती घेऊन आले असून, शिवाय हे त्याचे नाव. कोणत्याही नवीन दिग्दर्शकाची पहिली कलाकृती जेंव्हा प्रेक्षक बघायला जातात तेंव्हा दिग्दर्शकांचे मूळ कल्पनेशी\कहाणीही\कन्सेप्टशी     एकनिष्ठ राहण्याच्या प्रयत्नात कहाणीची होणारी वाताहत हा एक कॉमन  सिन असतो. कौतुकास्पदरित्या अजय यातून सुटला असून एका वेगळ्या पण कदाचित मेनस्ट्रीम चित्रपटांशी फटकून असणाऱ्या कहाणीही एकनिष्ठ राहूनही अन मुख्य अभिनेता असूनही त्याची कहाणीवरील पकड अजिबात ढिली होत नाही.


शिवाय हा एक गिर्यारोहण प्रशिक्षक, त्याचे एका विदेशी युवतीशी फुललेले प्रेम अन त्याच्या मुलीचे विदेशी गुन्हेगारांकडून/अंग-तस्करांकडून झालेले अपहरण अन त्याने केलेला तिचा बचाव अशी एकदम वेगळीच कहाणी शिवाय मध्ये बघायला मिळते

अजय देवगण यात मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक दोन्हीहि असून, दोन्ही आघाडयांवर पुरेपूर प्रेक्षकांच्या पसंतीस तो उतरतो. शिवाय म्हणून त्याचे गिर्यारोहण प्रशिक्षक म्हणून वर्तन असो\ प्रेमाच्या आघाडीवर फुललेले रूप असो\ मुलीला वाचवताना व्याकुळलेला बाप असो सर्व आघाडीवर त्याच्यातील अभिनेता प्रेक्षकांची निराशा करत नाही हे नक्की. वास्तविक बघता काही स्टंट्स इतके अचाट आहेत सिनेमातले कि एक दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीही लाजावा. पण ज्या शिताफीने तो ते निभावून नेतो ते खरोखर कौतुकास्पद आहे. बाकी सगळे जाऊ देऊ पण सिनेमातील त्याच्या एंट्रीलाच जो ज्या पर्वतावरून उडी मारतो गिर्यारोहण प्रशिक्षण संदर्भात (ज्यामुळे त्याला आर्मीची ऑफर मिळते) ते शूटिंग हे प्रेक्षकांना समजत असूनही त्याचे चित्रीकरण ज्या जबरदस्तरीतीने करण्यात आले आहे ते बघून एखाद्या हॉलिवूड वाल्यानेही इम्प्रेस व्हावे. या चित्रिकरणात संगणकाचा हात किती असावा हा भाग वेगळा पण  हिंदी प्रेक्षकांसाठी हा अनुभव शब्दश: "अचाट" या कॅटेगरीत येतो हे नक्की. त्याचा फिजिकल फिटनेस या त्याच्या एन्ट्रीमुळेच प्रेक्षकांना तो पटवून देतो जो पुढे रजनीकांत लाजेल असे स्टंट्स कहाणीत असूनही प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवतो अन हसवत नाही.   

त्यानंतर त्याचे एक बाप म्हणून व्याकुळ होणे अन मुलीच्या शोधार्थ धावपळ करणे हे प्रेक्षकांना पटणे महत्वाचे होते कारण नाही म्हटले तरी त्याचे त्याच्या पत्नीपासून वेगळे होण्याचे कारण भारतीय प्रेक्षकांना पचण्यासारखे नव्हते. हे कारण प्रेक्षकांनी इग्नोर करावे अन नंतरच्या त्याच्या धावपळीकडे\अभिनयाकडे लक्ष द्यावे असा त्याचा हेतू असावा. त्यात अजय देवगण एक दिग्दर्शक म्हणून पूर्णतः यशस्वी होतो हे नक्की.

अजय देवगण हा ऍक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचा मुलगा, त्यामुळेच कि काय कदाचित पण एक वेगळा असा ऍक्शन डायरेक्टर सिनेमात नसूनही दक्षिणेकडील अभिनेते लाजतील असे शानदार ऍक्शन सिक्वेन्सेस\स्टंट्स शिवाय मध्ये आहेत. परममित्र रोहित शेट्टीकडील प्रोजेक्ट्स मध्ये ऍक्शन वर असणारा भर यातून आपोआप धडा शिकल्यामुळे कि काय कदाचित पण यांचे चित्रीकरण अप्रतिमरीत्या झालेले आहे.

एका चित्रपटाला वाहिलेल्या खानदानातील व्यक्ती असूनही आपल्या पहिल्याच दिग्दर्शनाच्या व्हेंचरचा मुहूर्त अजयने चुकवावा हे दुर्दैवी पण असे घडलंय खरं. आर्ट फिल्म या संकपनेकडे वळणारे चित्रपट दिवाळीत आणू नये कारण प्रेक्षकांची उत्सवी मानसिकता विरोधात जाण्याची पुरेपूर शक्यता असते, असा आजवरचा प्रॅक्टिकल अनुभव आहे. मला हा चित्रपट अजय देवगण चे दिग्दर्शन अन अभिनय दोन्हीसाठी आवडला म्हणून मी "शिवाय" ला 3 1/2* (साडे तीन) स्टार देईन पाचपैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर