शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

बेफिक्रे

करिष्माइ दिग्दर्शक आणि यशराज फिल्म्स/स्टुडिओज/म्युजिक/डिस्ट्रिब्युटर्स चे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा हे दिग्दर्शक म्हणून त्यांची नवीन कलाकृती घेऊन आले असून, 'बेफिक्रे' हे टायटल. बेफिक्रे म्हणजे ज्यांना कोणतीही चिंता उरलेली नाही असे बिनधास्त लोक किंवा या केस मधे जोडी असे आपण म्हणू. स्वर्गीय यशजी निवर्तल्यानंतर यशराज फिल्म्सने बऱ्याच नव-नवीन प्रकल्पाना फायनान्स करून कामाची पद्धत बदलवली असल्याचे जगाने बघितले. या बदललेल्या कामाच्या पद्धतीत 'दम लगा के हैशा' सारखं यश देखील [तुरळक] मिळालं, त्यामुळे कदाचित या यशाने हुरळून जाऊन असे प्रेक्षक आता म्हणतील पण आदित्य चोप्रा "प्रेम" या यशजींच्या लाडक्या कन्सेप्टलाच हरताळ फासायला निघालेला बघून वाईट वाटलं.



सिनेमा बघायला येणार सगळं प्रेक्षकवर्ग हा फक्त मल्टिप्लेक्स मधला असतो, किंवा असे म्हणू financially साऊंड असणारा असतो अन सिंगल स्क्रीन थिएटर हि पद्धत आता बंद पडलेली आहे असा आदित्य चोप्राचा समज झाला असावा बहुतेक. प्रेम या कल्पनेमागे  शारीरिक आकर्षण हे बेसिक कारण  असते. मान्य, पण फक्त तेच एक मूळ कारण असून बाकी सगळं झूट आहे या यशराज फिल्म्स च्या आजवरच्या वाटचालीलाच छेद देणारा हा प्रोजेक्ट असे म्हटल्यास अजिबात अतिशयोक्ती होणार नाही
धरम (रणवीर सिंग) आणि शायरा गिल (वाणी कपूर) या दोघांचे फ्रांस मध्ये फुलणारे प्रेम जे फुलते-तुटते-जुळते म्हणजे बेफिक्रे. धरम हा एक स्टॅन्ड-अप कॉमेडियन. फ्रांस मध्ये येऊन त्याच्या मित्राचा बिझनेस सेट करायला मदत करतो अन त्यायोगे स्वतःहि फ्रान्समध्ये सेट होतो. आता भारतीय अन फ्रान्समधल्या संस्कृतीत फरक आहे हे मान्य जरी केले तरी त्या संस्कृतीशी इतक्या झटपट अडॅप्ट करून एक दिल्लीकर त्यात रुळतो अन त्याच संस्कृतीचा बिनधास्त एक हिस्साही बनतो. कुणी काहीही म्हणो पण एक प्रेक्षक जो सिंगल स्क्रीन थिएटर वाला असून प्रेम या कल्पनेवर विश्वास असणाराहि आहे त्याला सिनेमात म्हणा पण पचायला हि कल्पना अशक्य. माझ्या मते आदित्य चोप्रा कहाणीला प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यात सपशेल अयशस्वी ठरला हे नक्की.

रणवीर सिंग ने साकारलेला धरम आणि वाणी कपूरची शायरा व्यवस्थित जमून आलेली आहे. मुळात कहाणी हि प्रेक्षकांना पटण्यासारखी नाही, मान्य, पण त्यातही जीव ओतून त्या दोघांनीही त्यांचे काम केलेले आहे हे अनेकदा जाणवते. धरमचा एक मूळचा दिल्लीकर अन शायराची एक फ्रेंच मुलगी पटते प्रेक्षकांना.

लेखक, दिग्दर्शक अन पटकथाकार आदित्य चोप्राच असल्यामुळे जे चांगले झाले त्याचे श्रेय त्याचेच ज्याप्रमाणे अयशस्वी शिक्काही त्याचाच. मान्य कि मूळ कहाणीच faulty आहे पण ती साकारताना त्याने जी मेहनत घेतलेली आहे ती पूर्ण जाणवते प्रेक्षकांना. नवीन प्रयोगांच्या या सिनेमात गाण्यांमध्ये काही फ्रेम्स मध्ये फ्लॅशबॅक दाखवताना दुहेरी भूमिकांच्या वापर केलेला आहे. हा प्रयोग अभिनव आहे आणि व्यवस्थित जुळून आलेला आहेआणखी एक उल्लेखनिय म्हणजे साधी-सोपी अन ओघवती पटकथा. मान्य कि कहाणी पटण्यासारखी नाही पण माझ्या मते इतपत समजणेही प्रेक्षकांना महत्वाचे. उत्कृष्ट पटकथेची श्रेय आदित्य चोप्राला द्यावेच लागेल.   

'डीडीएलजे', 'मोहोब्बते' अन 'रब ने बनादी जोडी' या आजवरच्या आदित्य चोप्राच्या तो स्वतः दिग्दर्शक असलेल्या तीनही चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खान हा प्रमुख भूमिकेत होता. शाहरुखने मिळवलेल्या सुपरस्टार या पदवीत या तिन्ही चित्रपटाचे काँट्रीब्युशन जास्त होते हे कुणीही मान्य करेल. या वेळेस आदित्य चोप्राने एक दिग्दर्शक म्हणून सध्याचा "चलनी नाणा" मुख्य भूमिकेसाठी वापरून बघितला अन आजवर कधीहि बघितलेला 'अयशस्वी' हा शिक्काही बघून घेतला. अशी गरज कधी पडेल असं वाटलं नव्हतं पण  मी फक्त पटकथेसाठी अन SSरा बऱ्या असलेल्या संगीतासाठी बेफिक्रेला  पाव (/*) देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.     


-समीर         

रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

इर्शाद

इर्शाद

प्रथितयश नट-कवी-गीतकार-आधुनिक काळातील तरुणाईला कवितांच्या जवळ आणणारे व्यक्तिमत्व संदीप खरे आणि कवी वैभव जोशी यांनी रसिकांच्या सेवेत "स्वरचित कवितांची एक मुक्त मैफल" नावाची संकल्पना आणली असून आज या संकल्पनेच्या दुसऱ्या प्रयोगाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.

Sandip Khare autograph - 



आयुष्यावर बोलू काही या गाणे\कवितांच्या अजरामर संकल्पनेतून कवितावाचन या संकल्पनेशी तरुणाईचा अन रसिकांचा परिचय झाला. याच संकल्पनेला पुढे नेत,   बऱ्याच कवींच्या  स्वरचित अप्रतिम कविता ज्या संगीतबद्ध नाहीत किंवा नाद-लय नसल्यामुळे टेक्निकली कमी पडून संगीतबद्ध होण्यास अडचण निर्माण होते  अश्या कवितांना रसिकांसमोर आणण्याची एक संधी या मैफिलीतून मिळालेली आहे. मान्य असो व नसो हि संकल्पना एक अभिनव कल्पना असून फार लवकर लोकप्रियतेच्या शिखरावर पोचेल असा भरवसा मला आज दुसऱ्याच प्रयोगातून झाला.

कविता वाचनाच्या कार्यक्रमात संगीत नसल्यामुळे हा कार्यक्रम 'रटाळ' होण्याची पुरेपूर संधी होती. पण संदीप खरेंची शैली आणि त्या शैलीला वैभव जोशींची मिळालेली पुरेपूर साथ अन मिळालेली कार्यक्रमाला उपस्थित इतर सेलिब्रिटींची जोड या सर्व एकत्रित सहभागातून तीन तासांहून काही मिनिटे  जास्त रंगलेला हा कार्यक्रम शब्दश: अप्रतिम होता.      

या कार्यक्रमाचा उद्देश स्वरचित कविता इतका स्पष्ट असला तरी त्यांना वाटलेल्या त्यांच्या मित्रमंडळीत इतर कवींच्या अप्रतिम कवितांचा समावेश या कार्यक्रमात करण्यात आलेला होता. हा कवितेच्या निवडीवर  श्री संदीप खरेंच्या व्यावसायिकतेची पूर्ण छाप होती. प्रेम-तरुणाई-पाऊस-म्हातारपण इत्यादी असंख्य विषयांना स्पष्ट करणाऱ्या कविता कार्यक्रमात होत्या. या सगळ्या कवितांच्या समावेश स्पष्ट उल्लेख संदीपजींनी कार्यक्रमातून विशद केला कि उत्तम कवितांचा परिचय रसिकांना व्हावा.


हि संकल्पना नवीनच असली, अन संगीताविना असली हे एक महत्वाचे असले, तरीही या अप्रतिम संकल्पनेसाठी संदीप खरे अन वैभव जोशी या दोघांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
-समीर 

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

बघ काही सुचतंय का?

बघ काही सुचतंय का?

रात्रिच्या त्या काळोखात
अंधाराच्या अनेक अदात
अदांच्या त्या नशील्या पळात
पळ पळ पुढे सरकताना
कधी- कधी.....
मीच मला विचारतो
बघ काही सुचतंय का?............

नशिबाच्या सरकत्या डौलावर
मैलो-न-मैल निर्विकार जगण्यावर
जगण्यातल्या तृप्त-अतृप्त तेवर
अनेक हव्यासांच्या मृगजळावर
विचार करताना....
कधी- कधी.....
मीच मला विचारतो
बघ काही सुचतंय का?............

निसर्गाच्या अपुर्वाईला धरताना
तृणपातापरि आयुष्य वेचताना
कण्-कण जगणे धुंडाळताना
दु:खाच्या वर्षावात सुखाची छ्त्री बनताना
कधी- कधी.....
मीच मला विचारतो
बघ काही सुचतंय का?............

वळणदार पण कृत्रीम चौकटीवर
चौकटीमध्ये बदध चाकोरीवर
चाकोरितील व्यस्त प्रमाणावर
प्रमाणाच्या प्रमाणाबाहेर वळणावर
विचार करताना....
कधी- कधी.....
मीच मला विचारतो
बघ काही सुचतंय का?............

जगण्यातील क्लिष्टता समजुन घेताना
समजताना होणारा त्रास भोगताना
भोगाच्या शक्या-शक्यतेवर प्रकाशताना
प्रकाशाचे ते मनस्विपण पुन्हा पुन्हा जगताना
कधी- कधी.....
मीच मला विचारतो
बघ काही सुचतंय का?............

-समीर