रविवार, ४ जानेवारी, २०१५

लोकमान्य-एक युग पुरुष




लोकमान्य-एक युग पुरुष

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे नाव ऐकलं कि काही गोष्टी आठवतात १. तिसरी किंवा चौथीत त्यांच्यावर असणारा एक धडा
२."स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हा त्यांचा डायलॉग ३."सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा त्यांचा केसरीतला अग्रलेख आणि४. मी शेंगा खाल्ल्या नाहीत म्हणून मी टरफले उचलणार नाही हि शाळेत कुठेशी ऐकलेली गोष्ट.
याउप्पर नवीन पिढीला त्यांच्याबद्दल काहीही माहित नाही आणि म्हणूनच दिग्दर्शक ओम राउतने सुरवातीलाच हे स्पष्ट केले आहे कि नवीन पिढीला त्यांच्या विचारांची ओळख व्हावी हा मुख्य उद्देश सिनेमाचा आहे.
लोकमान्य टिळक त्यांचे स्वराज्यासाठी चालणारे विविधांगी प्रयत्न समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्यासोबत आधी असलेली मैत्री आणि पुढे झालेले तात्विक मतभेद त्यांचे खाजगी जीवन-समाजजीवन अश्या विविध कोनांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनाला स्पर्श करण्याचा चित्रपटाचा उद्देश नक्कीच सफल होतो हे मात्र नक्की.
पुणे शहरात असलेले लोकमान्यांचे वास्तव्य-पुण्यात झालेले प्लेग या रोगाचे थैमान-rand या इंग्रज अधिकार्याची या काळात झालेली नियुक्ती-प्लेग या कारणाखाली त्याने केलेले अनन्वित अत्याचार आणि शेवटी चाफेकर बंधूंनी त्याची केलेली हत्या
हि कहाणी आपल्यापैकी अनेकांना माहित असेल पण या चाफेकर बंधूंना लोकमान्य टिळकांची फूस होती/समर्थन होते हे बर्याच
मंडळींना माहित नसेल.पण होते आणि कदाचित लोकमान्य टिळक हे चाफेकर बंधूंचे "ब्रेन" हा कट रचण्यात होते हे हि बर्याच लोकांसाठी नवीन असेल.पण होते.
अभिनय:
सुबोध भावे या अभिनेत्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची भूमिका केलेली आहे आणि सांगण्यास आनंद कि तो अक्षरश: जगलेला आहे हि भूमिका. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्याने प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोचवलेत. त्यांचे गो.ग.आगरकरांशी असलेले तात्विक मतभेद,समाज सुधारणेला असलेले समर्थन पण त्या अनुषंगाने धर्मात ढवळा-ढवळ करण्यास असलेला विरोध, त्या काळच्या जातीव्यवस्थेतील निम्न घटकांनी मंदिरात जाण्यास असलेली बंदी झुगारून देवाच्या चरणी त्यानाही जागा मिळावी यासाठी लोकमान्यांनी केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची रचना एक ना दोन असे अनेक प्रसंग होते ज्यात सुबोध भावे हा लोकमान्य वाटला नसता कदाचित पण सगळीकडे तो लोकमान्य टिळक वाटतो. त्यांची सकारात्मक विचारसरणी साकारण्यात पूर्णतया यशस्वी झालेला आहे तो."कितीही संकट आली आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय देऊन मी उभा राहीन"
वरवर बघता अगदी साधा भासणारा हा लोकमान्यांचा एक डायलॉग पण सुबोध भावे कोणतीही अतिशयोक्ती न करता हा त्यांचाच हे साकारण्यात यशस्वी होतो.
शाहू-फुले-आंबेडकर यांपेक्षाही वेगेळे मोठे लोक महाराष्ट्रात होऊन गेले हि माहिती नवीन पिढीपर्यंत अगदी समर्पकरीत्या पोचवणाऱ्या या चित्रपटास सुबोध भावे(अभिनय) -(दिग्दर्शक) ओम राउत-(लेखक) कौस्तुभ सावरकर यांच्या एकत्रित प्रयत्नांसाठी साडेचार (४.५ *) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

Night at the Museum: Secret of the Tomb



Night at the Museum: Secret of the Tomb

Hollywood film makers are familiar of making imaginative extra human concepts real with the help of technology and other extra-ordinary back office regiments. Night at the Museum is an example of working of Hollywood moviemakers for making a conceptually unreal thing to a real thing. That too the titled film is the third sequel of this concept and producer encouraged for the third one means first and second one must be appreciated all over the world which finally there must turned out to be a handsome box-office collection. This is the third part in which the secret of Tomb kept in that museum which is responsible for transformation of all statues at night gets revealed and Larry (Ben Stiller) helps to get the final resolution to solve the mystery of that Tomb.

Acting:
Ben Stiller is the common point-hero-main character in all the three films in these sequels.
He is basically a night watchman in a museum where all the statues etc turns into a real thing every night. Although this concept seems a thing to laugh for a typical Indian movie watcher but Ben Stiller really worked hard to make this story seem a real one for the viewers. All the watchers involves into the story upto a great extent while watching that they start to assume this unreal thing as a real thing. Other back office aspect like screenplay-story-cinematography- make up-“etc” forces to trust the story. Although Ben Stiller must be appreciated for this but one should not ingnore the efforts of director Shawn Levy for all three parts. He also took many efforts for the success and they got paid off.

A museum where all the statues etc. Transforms to a real thing every night and Larry (Ben Stiller) rules them every night, takes their care, as their traditions are different from each other by centuries, he found a common resolution for all their problems. He gave them all a suitable work so that they can spend their living time and Larry can breathe at night.

I personally liked and loved the concept and system of makers to deal with the concept in all the three parts hence I will give this 5* as I appreciated this very much, rest depends on individual viewers.

-Sameer 

गुरुवार, २५ डिसेंबर, २०१४

पीके



पीके 

विधू विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी हि जोडी म्हणजे यशाची हमखास खात्री अस समीकरण होत, मग जर यश मिळतेच आहे तर तीच टीम घेऊन नि तश्याच मनोरंजनात्मक पद्धतीने थोडाफार जनजागृतीचा प्रयत्न का करू नये या विचाराने याच जोडीचा नवीन चित्रपट म्हणजे पीके. राजकुमार हिरानीची कथा म्हणजे कल्पनाशक्तीचा असलेला सुयोग्य वापर आणि आणि त्याच कथेत उत्तमोत्तम पात्र अन त्या पात्रांची आपापसात असलेली अभिनयाची जुगलबंदी अस एक समीकरण बनलेलं होत. सर्किट-मुन्नाभाई-फरहान--राजू रस्तोगी-रांचो आणि व्हायरस असे अनेक उदाहरणं घेता येतील. शंतनू मोईत्रा चे संगीत आणि अभिजात जोशी चे कथा व पटकथा लेखन हा त्या सगळ्या यशस्वी कडीतील पाया. याही वेळेस पडद्यावर असलेले कलाकार जवळपास तेच असले तरी पडद्यामागची टीम पूर्ण तीच होती. कुटुंबासमवेत चित्रपट बघण्यासाठी जाता येईल असे केवळ दोन नावं हिंदी चित्रपटसृष्टीत आहेत. सुरज बडजात्या आणि राजकुमार हिरानी. याही वेळेस प्रयत्न पूर्ण असलेला जाणवतो पण भट्टी जमलेली नाही.
अभिनय:
आमिर खान त्याची अभिनय क्षमता यावर कुणाचा आक्षेप असण्याची शक्यताच नाही पण प्रत्येक अभिनेत्याला जीवनात एक कठीण भूमिका मिळते. माझ्यामते पीके हे अमीरखानच्या आता पर्यंतच्या करिअर मधील सगळ्यात वेगळी अन कठीण भूमिका.
आणि अमीर खान शब्दश: त्याच वेगळेपण आणि अभिनयक्षमता सिद्ध करतो या भूमिकेने. आता या अंतराळातील त्रांगड्यात
जनजागृतीच्या दृष्टीने सौरभ शुक्ला (तपस्वी) या व्यक्तिरेखेचा समावेश राजकुमार हिरानीने केलेला आहे पण.....
दिग्दर्शन:
हिंदी चित्रपट हे अंतराळ किंवा तत्सम बाबीवर जेंव्हा बनतात तेंव्हा हे हॉलीवूड नसल्यामुळे बजेट चा प्रश्न असतोच. हा सिनेमाही अगदी दिग्दर्शकच एक निर्माता असला तरी याला अपवाद ठरलेला नाही. पण राजकुमार हिरानीने खरोखर अमीर खानच्या व्यक्तिरेखेला हाताळण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही.पण अभिजात जोशीबरोबर मिळून त्याने लिहिलेल्या पटकथेची गती इतकी मंदावते कि प्रेक्षक irritate होण्यापर्यंत. हि चूक अनवधानाने झाली असावी हे स्पष्ट आहे पण पटकथेची मंदावलेली गती या चित्रपटाच्या कमर्शियल एक्सलंस वर असर टाकणार हे नक्की. एक अत्युत्कृष्ट व्यक्तिरेखा चित्रपट तडीस नेत नाही हे प्रेक्षक नक्कीच जाणून आहेत.

मी आमिर खान च्या अभिनयासाठी मुखत्वे पीकेला अडीच (२ १/२*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, ७ डिसेंबर, २०१४

एलिझाबेथ एकदशी (मराठी)



एलिझाबेथ एकदशी (मराठी)

सध्या गाजणाऱ्या होणार सून मी या घरची या मालिकेच्या लेखिका मोठ्या पडद्यावर उतरल्या असून मधुगंधा कुलकर्णी यांचा चित्रपट कथा लेखिका म्हणून पहिलाच चित्रपट म्हणजे एलिझाबेथ एकादशी.
एलिझाबेथ हि एक सायकल अन घरच्या परिस्थितीमुळे तिला विकण्याची असलेली गरज, मग घरातल्या लहान मुलांचा त्या सायकलीला वाचवण्याचा प्रयत्न अन त्या प्रयत्नाभोवताल फिरणारी कथा म्हणजे एलिझाबेथ एकादशी.
आजकालच्या काळात "मनोरंजनाचा एक तरतरीत डोस" या नावाखाली वास्तविकतेशी फटकून असलेल्या तद्दन निर्बुद्ध अन फुटकळ कथा आजकाल दिसतात. लेखिका मधुगंधा कुलकर्णी या स्वत:च एक निर्मात्या असून त्यांनी हरिश्चंद्राची factory फेम दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या सोबत एक उत्तम कथा तीन तासात बांधलेली आहे. कौटुंबिक पातळीवर रंगवलेली एक अप्रतिम कथा असून श्रीरंग महाजन या बाल अभिनेत्याचा उल्लेख करावाच लागेल. या लहान मुलाने कथेच्या मागणीप्रमाणे अक्षरश: एकहाती तोलून धरलेली कथा आहे हि. आणि म्हणूनच बहुधा दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी त्याच्यावर विसंबत त्याला कथेत
पूर्ण स्कोप दिलेला आहे.
एकूणच, गाणे नाही,मोठमोठे सेट्स/कलाकार नाहीत आणि कथाही एकदम हायफाय वगेरे वगेरे नाही पण एक वास्तविकतेवर अवलंबून असलेली कथा,इतकी वास्तविक कि चित्रपटातले पात्र वास्तविक जीवनात कुठे-ना-कुठे आपल्याला भेटल्याचे जाणवून जाते प्रेक्षकांना बघितल्यावर.
मी या चित्रपटाला ४.५ * देईन ५ पैकी,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, १६ नोव्हेंबर, २०१४

किल-दिल


किल-दिल

श्री यशजी निवर्तल्यानंतर त्यांच्या यशराज फिल्म्स या चित्रपट निर्मात्या कंपनीची धुरा नवीन सी इ ओ आदित्य चोप्राकडे आल्यापासून यशराज फिल्म्सचा चित्रपट दर्जा खालावला असून,कदाचित आजकालच्या मल्टीप्लेक्सच्या जमान्यात कमर्शियल एक्सलंसची कमी झालेली चिंता हे याचे महत्वाचे कारण असू शकते असा अंदाज प्रेक्षकांनी लावायला हरकत नाही असे वाटून जाते.
"जय हो" अन "किक" सारखे शब्दश: ठोकळे करोडे रुपये घेऊन जातात ते किल दिल सारख्याने चित्रपट निर्मितीचा खर्च वसूल करायला काहीच हरकत नसावी.
देव (रणवीर सिंग) आणि टूटू (अली जफर) या दोन अनाथ मित्रांची भय्याजी (गोविंदा) यांच्या अंडर घडलेली जीवनकथा म्हणजे किल-दिल. फक्त दोन हिरो घेऊन चित्रपट चालण्याचा जमाना संपून युग लोटले आहे याचा निर्माता आदित्य चोप्राने लावलेला योग्य अंदाज व कथेत परिणीती चोप्राचा केलेला समावेश.

दिग्दर्शन:
"साथिया" आणि "बंटी और बबली" चे दिग्दर्शक शाद अली यांचे बर्याच काळानंतर प्रेक्षकांना किल-दिल चे दिग्दर्शक म्हणून दर्शन घडते.

अजिबात चित्रपटातल्या कथा/पटकथा/अभिनेता/अभिनेत्री इ.इ. गोष्टींकडे लक्ष न देता फक्त मनोरंजनाचा एक तरतरीत डोस म्हणून चित्रपट बघणारा एक वर्ग बॉलीवूड मध्ये गेल्या काही काळात निर्माण झालेला आहे. त्या वर्गाला डोळ्यापुढे ठेवून काढलेला एक चित्रपट म्हणजे किल-दिल.
किल-दिलला मी १/४ (पाव) स्टार देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, २० सप्टेंबर, २०१४

दावत-ए-इश्क



दावत-ए-इश्क

यशजी निवर्तल्यानंतर यशराज फिल्म्स या चित्रपट निर्मात्या कंपनीचे प्रायोरिटीज बदलल्या असून आघाडीच्या चित्रपट कलाकारांना घेऊन "हुंडा" यासारख्या ज्वलंत विषयावर चित्रपट निर्मिती करण्याची रिस्क आदित्य चोप्राने घेतलेली आहे.मागील वर्षी आलेल्या यशराजच्याच आणि याच जोडगोळीला घेऊन असलेल्या "इशकझादे" या चित्रपटाचे दिग्दर्शक हबीब फैसल पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक नवीन कलाकृती घेऊन आले असून दावत-ए-इश्क म्हणजेच मराठीत प्रेमाची मेजवानी.

कहाणी:
गुलरेझ कादिर उर्फ सानिया हि हैदराबाद मध्ये राहणारी एक मुस्लिम लग्नाळलेली तरुणी. पण हुंडा या गोष्टीमुळे लग्न जमत नसलेली.अतिशय हुशार व अमेरिकेत जाण्याची वगेरे स्वप्ने बाळगणारी. भारतीय संविधानातील हुंडाविरोधी कलम ४०९-A
चा दुरुपयोग करण्याचे ठरवून हुंडा तर द्यायचा पण हुंडा दिल्यावर ज्यांनी घेतला त्यांना धडा शिकवायचा या कलमाद्वारे असे ठरवते.मग तारिक हैदर उर्फ तारू व त्याच्या परिवाराला त्यांनी हुंडा मागितला म्हणून धडा शिकवायचे ती ठरवते. तिच्या या प्रयत्नाभोवताल कथा फिरते आणि ती त्याच्या व तो तिच्या प्रेमात पडून संपते.

दिग्दर्शन:

हबीब फैसल यांनी व्यवस्थित हाताळलेली कहाणी आहे अन्यथा हुंडा व भारतीय संविधानाचा प्रत्यक्ष उल्लेख यांचा परस्परसंबंध
जोडण्यात/समजण्यात/समजावण्यात/पडद्यावर उतरवण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला असता तर प्रॉब्लेम झाला असता पण हबीब फैसल यांनी सगळ व्यवस्थित हाताळलं.

यशराज फिल्म्सची खासियत असलेले संगीत या सिनेमात बघावयास/ऐकावयास मिळत नाही. पण एक उल्लेखनीय कि जब तक है जान इतकी पातळी खालावलेली नाही.साजिद-वाजीद हे एकदम उत्कृष्ट नसले तरी "ठीक" पातळीवर आहेत. पण लेखक-पटकथा लेखक हबीब फैसल हे कथेची व पटकथेची मंदावलेली गती सावरण्यात यशस्वी ठरलेले नाहीत.

एका आघाडीच्या हिंदी चित्रपट निर्मात्याचा आघाडीच्या कलाकारांना घेऊन असलेल्या हुंडा या भारतीय समाजजीवनातील प्रश्नावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला मी २* देईन.बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा .
-समीर

शनिवार, ९ ऑगस्ट, २०१४

रमा-माधव (मराठी)



रमा-माधव (मराठी) 

२० वर्षापूर्वी स्वामी या मालिकेतून "रमा" या भूमिकेने अभिनेत्री म्हणून पदार्पण करणाऱ्या मृणाल कुलकर्णी आता दिग्दर्शक म्हणून त्याच कथेला प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आलेल्या आहेत. नुकतेच मागील वर्षी "प्रेम म्हणजे प्रेम असत" या चित्रपटाने त्यांनी दिग्दर्शक म्हणून सुद्धा पदार्पण केल. आणि आता हा त्यांचा दुसरा चित्रपट.
रमाबाई पेशवे आणि माधवराव पेशवे यांची लव्ह स्टोरी वगेरे इतिहासात प्रसिद्ध नाही (बाजीराव-मस्तानी सारखी) पण तरी त्यांनी या कथेला निवडलं आणि निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मृणालजींनी.
कहाणी:
रमाबाई व माधवरावांचा त्या कालच्या परंपरेप्रमाणे बालविवाह. मग वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी त्यांच्या शनिवारवाड्यातल्या आगमनापासून कथेची सुरवात आणि त्यांनी माधवरावांसोबत सदेह सती गेल्याच्या कथेवर शेवट. त्या दोघांच्या सहवासावर आणि सहवासातून फुलणाऱ्या प्रेमावर कथावस्तू टायटलनुसार डिपेंड असेल हि प्रेक्षकांची अपेक्षा लेखक व दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी पूर्ण करू शकत नाहीत. पानिपतचा पराभव अन त्या युद्धात झालेली सदाशिवराव भाऊ अन विश्वासराव यांची हानी याचा समावेश कहाणीत आपोआप होतो. नव्हे करावाच लागतो कारण त्या शिवाय कहाणी पुढे सरकत नाही. पण सदाशिवराव भाऊंचा एक तोतया
पुढे माधवारावांपर्यंत पोचतो आणि सदाशिवराव असण्याचा दावा करतो या क्षुल्लक गोष्टीचा कहाणीत का समावेश केला असावा हे प्रेक्षकांना कळत नाही. राक्षसभुवनची लढाई अन निजामाविरुद्ध मिळवलेला विजय या गोष्टीला जरा जास्तच महत्व दिल्या जाऊन अमराठी प्रेक्षकांचा समज माधवरावांच contribution फक्त तितकच आहे कि काय अशी होईल अशी शंका येते. राजयक्ष्मा किंवा स्टमक कॅन्सर याची सरमिसळ होण्याइतकी दोन्ही संकल्पनाची सरमिसळ आहे.
अभिनय:
लहानगी रमा म्हणून श्रुती कार्लेकर हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेले आहे. आणि दिग्दर्शकाने हे ओळखून तिला व्यवस्थित हाताळलेल आहे.प्रसाद ओक यांनी साकारलेल्या अप्रतिम राघोबा दादांचा उल्लेख करावाच लागेल. अप्रतिम भूमिका त्यांनी निभावलेली आहे राघोबदादांची. श्रुती मराठे (राधा हि बावरी फेम) हिचेही पार्वती बाईंच्या भूमिकेतून प्रेक्षकांना दर्शन घडते.
पण आलोक राजवाडे यांचा माधवराव प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही, हे नक्की.
दिग्दर्शन:
मृणाल कुलकर्णी यांनी पदार्पणातच प्रेम म्हणजे प्रेम असत या चित्रपटात एक मोठ्या वयाची लव्ह स्टोरी हाताळली होती. थोडक्यात एक वेगळा विषय. आणि हा विषयही थोडाफार वेगळाच. पण मुळात हा विषय इतिहासावर जरा जास्तच अवलंबून असल्यामुळे आणि त्या काळातली माहिती उपलब्ध नसल्यामुळे जो फरक पडायचा तो पडतोच. उदाहरणार्थ रमाबाईंच्या सती जाण्यावर जर शेवट करायचा होता तर सती कस जातात याची माहिती कदाचित उपलब्ध नसावी त्यामुळे शेवटी २-३ ओळीत प्रेक्षकांना फक्त सांगुत शेवट केलेला आहे. राघोबादादांच्या काळ्या जादुविषयक कथेला पुढे सरकवताना सुरवातीला काळ्या जादूला समर्थन मिळावे असा निर्माता/दिग्दर्शकाचा कोणताही हेतू नाही अशी डिस्क्लेमर मात्र मिळते.

मराठीतला एक वेगळा प्रयत्न आणि रमाबाई-माधवराव या इतिहासात दुर्लक्षित असलेल्या एका जोडीला लाइमलाईट मध्ये आणण्याचा प्रयत्न असणार्या या चित्रपटाला मी २* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर