रमा-माधव (मराठी)
२० वर्षापूर्वी स्वामी या मालिकेतून "रमा" या भूमिकेने अभिनेत्री म्हणून पदार्पण करणाऱ्या मृणाल कुलकर्णी आता दिग्दर्शक म्हणून त्याच कथेला प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आलेल्या आहेत. नुकतेच मागील वर्षी "प्रेम म्हणजे प्रेम असत" या चित्रपटाने त्यांनी दिग्दर्शक म्हणून सुद्धा पदार्पण केल. आणि आता हा त्यांचा दुसरा चित्रपट.रमाबाई पेशवे आणि माधवराव पेशवे यांची लव्ह स्टोरी वगेरे इतिहासात प्रसिद्ध नाही (बाजीराव-मस्तानी सारखी) पण तरी त्यांनी या कथेला निवडलं आणि निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मृणालजींनी.
कहाणी:
रमाबाई व माधवरावांचा त्या कालच्या परंपरेप्रमाणे बालविवाह. मग वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी त्यांच्या शनिवारवाड्यातल्या आगमनापासून कथेची सुरवात आणि त्यांनी माधवरावांसोबत सदेह सती गेल्याच्या कथेवर शेवट. त्या दोघांच्या सहवासावर आणि सहवासातून फुलणाऱ्या प्रेमावर कथावस्तू टायटलनुसार डिपेंड असेल हि प्रेक्षकांची अपेक्षा लेखक व दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी पूर्ण करू शकत नाहीत. पानिपतचा पराभव अन त्या युद्धात झालेली सदाशिवराव भाऊ अन विश्वासराव यांची हानी याचा समावेश कहाणीत आपोआप होतो. नव्हे करावाच लागतो कारण त्या शिवाय कहाणी पुढे सरकत नाही. पण सदाशिवराव भाऊंचा एक तोतया
पुढे माधवारावांपर्यंत पोचतो आणि सदाशिवराव असण्याचा दावा करतो या क्षुल्लक गोष्टीचा कहाणीत का समावेश केला असावा हे प्रेक्षकांना कळत नाही. राक्षसभुवनची लढाई अन निजामाविरुद्ध मिळवलेला विजय या गोष्टीला जरा जास्तच महत्व दिल्या जाऊन अमराठी प्रेक्षकांचा समज माधवरावांच contribution फक्त तितकच आहे कि काय अशी होईल अशी शंका येते. राजयक्ष्मा किंवा स्टमक कॅन्सर याची सरमिसळ होण्याइतकी दोन्ही संकल्पनाची सरमिसळ आहे.
अभिनय:
लहानगी रमा म्हणून श्रुती कार्लेकर हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेले आहे. आणि दिग्दर्शकाने हे ओळखून तिला व्यवस्थित हाताळलेल आहे.प्रसाद ओक यांनी साकारलेल्या अप्रतिम राघोबा दादांचा उल्लेख करावाच लागेल. अप्रतिम भूमिका त्यांनी निभावलेली आहे राघोबदादांची. श्रुती मराठे (राधा हि बावरी फेम) हिचेही पार्वती बाईंच्या भूमिकेतून प्रेक्षकांना दर्शन घडते.
पण आलोक राजवाडे यांचा माधवराव प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही, हे नक्की.
दिग्दर्शन:
मृणाल कुलकर्णी यांनी पदार्पणातच प्रेम म्हणजे प्रेम असत या चित्रपटात एक मोठ्या वयाची लव्ह स्टोरी हाताळली होती. थोडक्यात एक वेगळा विषय. आणि हा विषयही थोडाफार वेगळाच. पण मुळात हा विषय इतिहासावर जरा जास्तच अवलंबून असल्यामुळे आणि त्या काळातली माहिती उपलब्ध नसल्यामुळे जो फरक पडायचा तो पडतोच. उदाहरणार्थ रमाबाईंच्या सती जाण्यावर जर शेवट करायचा होता तर सती कस जातात याची माहिती कदाचित उपलब्ध नसावी त्यामुळे शेवटी २-३ ओळीत प्रेक्षकांना फक्त सांगुत शेवट केलेला आहे. राघोबादादांच्या काळ्या जादुविषयक कथेला पुढे सरकवताना सुरवातीला काळ्या जादूला समर्थन मिळावे असा निर्माता/दिग्दर्शकाचा कोणताही हेतू नाही अशी डिस्क्लेमर मात्र मिळते.
मराठीतला एक वेगळा प्रयत्न आणि रमाबाई-माधवराव या इतिहासात दुर्लक्षित असलेल्या एका जोडीला लाइमलाईट मध्ये आणण्याचा प्रयत्न असणार्या या चित्रपटाला मी २* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
पोष्टर बॉयज- मराठी मराठी सिनेमांचा ट्रेंड निश्चितपणे बदलू लागला असून, श्रेयस तळपदे सारखे नव्या दमाचे निर्माते वेगवेगळ्या धाटणीच्या विषयांना स्पर्श करून चक्क मराठीत सिनेमा बदल घडवू इच्छिताहेत आणि निर्माते श्रेयस तळपदे यांचा पोष्टर बॉयज हे त्याचं एक शानदार उदाहरण.श्रेयस तळपदे यांनी त्यांच्या बॉलीवूड contacts चांगला उपयोग निर्मितीत व प्रसिद्धीत केल्याचं जाणवते. स्पष्ट उदाहरण म्हणजे लेस्ली लुइस यांनी चक्क मराठीत मराठी पद्धतीने केलेले संगीत निर्देशन आणि फराह खान,अनु मलिक आणि रोहित शेट्टी यांचा गेस्ट अपिअरन्स. यात चेन्नई एक्स्प्रेस मधला श्री शाहरुख खान यांचा गाजलेला डायलॉग रोहित शेट्टी कथेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा अधोरेखित करतो. आणि कथेच्या एका महत्वाच्या वळणावर म्हणजे प्रेक्षकांना सत्यता पटते.
रोहित शेट्टीची एक गाजलेली पद्धत आहे, त्याच्या प्रत्येक सिनेमात शेवटी श्रेयनामावलीनंतर सिनेमा शूट करतानाच्या गमतीशीर किस्स्यांचा समावेश तो करतो. भलेही हि क्षुल्लक गोष्ट वाटते पण माउथ-टू-माउथ पब्लिसिटीच्या आजच्या जमान्यात हि गोष्ट या प्रेक्षकसंख्या व रिपीट प्रेक्षकवर्ग (ज्यांचे छोट्या शहरात चित्रपटाच्या कमर्शियल एक्सलंस साठी खूप महत्व आहे). गोलमाल सिरीज अन सिंघम याद्वारे त्याने सिद्ध केलेली हि एक पद्धत आहे. तसाच प्रयत्न निर्माते श्रेयस तळपदे यांनी करून शेवटी एक गाणे (आयटम सॉंग) अन त्यांनतर असे शुटींग करतानाचे किस्से चक्क मराठीत प्रेक्षकांना दाखवलेत. आणि "मानो या ना मानो" याचा निश्चितच सकारात्मक परिणाम तिकीटबारीवर पडेलच पडेल.
कहाणी:
दिग्दर्शक समीर पाटील हेच चित्रपटाचे व पटकथेचे लेखक.अनिकेत विश्वासराव,दिलीप प्रभावळकर अन हृषीकेश जोशी या वेगवेगळ्या वयाच्या तीन व्यक्तींना एका सरकारी पोस्टर वर दिसलेली आपली इमेज, मग त्या इमेज पायी आलेले तिघांच्याही वैयक्तिक आयुष्यात वादळ आणि त्या वादळामुळे त्यांच्या आपापल्या समाजस्थानावर पडलेला असर आणि त्या तिघांचाही त्या वादळाविरुद्ध म्हणजे थोडक्यात सरकार विरुद्ध त्यांनी उभारलेला लढा अन मिळवलेला विजय. मुळात कारण अन त्या अनुषंगाने "मुलगा-मुलगी समानता" या महत्वाच्या घटकाला प्रमोट करण्याचा निर्मात्याचा प्रयत्न आहे. आणि हृषीकेश जोशीची पूर्ण भूमिकाच त्या अनुषंगाने घुसवण्यात आलेली आहे.
दिग्दर्शन:
लेखक व दिग्दर्शक समीर पाटील आणि विषय असा कि जर दुर्लक्ष झालं तर अश्लीलते कडे झुकण्यास जराही वेळ लागला नसता.
पण सांगण्यास कौतुक कि समीर पाटील ने मराठी मानसिकतेला केंद्रस्थानी ठेवून व्यवस्थित कहाणीला हाताळलेले आहे.
संगीत:
हरिहरन व लेस्ली लुइस हि एक गाजलेली जोडी (कलोनियल कझिन्स हा band ) आहे. या जोडीपैकी लेस्ली लुइस यांनी मराठीत कदाचित पहिल्यांदाच दिलेले संगीत म्हणजे पोष्टर बॉयज.एकदम वेगळे नसले तरी व्यवस्थित संगीत दिलेले आहे त्यांनी.
मराठीतला एक अनोखा प्रयत्न अन अभिनय संगीत दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रात व्यवस्थित आणि मुले-मुली समानता या मुद्द्याला एका वेगळ्याच angle ने केलेला स्पर्श अश्या एकत्रित सगळ्या मुद्द्यांसाठी मी चित्रपटाला ३.५* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
किक-हिंदी
चांगल्या आघाडीच्या कलाकारांना घेऊन बनलेल्या हिंदी सिनेमाचा मागच्या काही दिवसात दुष्काळ पडलेला होता, सगळे दुसर्या फळीच्या कलाकारांचे सिनेमे येत होते, या गोष्टीचा फायदा घेऊन तिकीटवारीवर आपला अप्रत्यक्ष फायदा होईल हे समजून-उमजून सलमान खान यांचा नवीन आलेला एक चित्रपट म्हणजे किक.मुळात किक म्हणजे काय? कारण आपण जेंव्हा कुणाला पंच करतो तेंव्हा जो आघात (फिजिकल) होतो त्याला किक म्हटल्या
जाते पण हि किक एका सिनेमाचे टायटल होणे शक्य नाही. तर किक म्हणजे एक आंतरिक स्फूर्ती. आणि याचा जवळचा संबंध
मद्यप्राशन केल्यानंतर एक "किक बसते" असे म्हटल्या जाते त्या किकशी असावा.
कहाणी:
देवीलालसिंग उर्फ डेव्हिल या व्यक्तीची जाकलीन फर्नांडीस व रणदीप हुडा यांच्या सोबतीने भारतातून पोलंडथ्रू फिरलेली कहाणी म्हणजे किक.
अभिनय:
सगळ्यात आधी सलमान खानचे खरोखर कौतुक. त्याने या वयातही खूप नवीन गोष्टींचा प्रयोग या सिनेमात करून बघितला आहे.
अभिनयातही आणि गायनातही. हिमेश रेशमिया व यो यो हनी सिंग नेहि एकदम उत्कृष्ट वगेरे नसले तरी चांगले संगीत दिलेले आहे.पण "मित ब्रदर्स" या संगीतकार तिकडीचे खुद्द सलमानने गायलेले "hang over " या गाण्याचा उल्लेख करावाच लागेल.
सलमान खानने गायलेले हे गाणे खरोखर उत्कृष्ट category त येते.
दिग्दर्शन:
साजिद नाडियादवाला हे एक निर्माता म्हणून आघाडीच नाव. त्यांनी किक द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. पण आधीच
गाठीशी असलेल्या अनुभवाचा स्वत: दिग्दर्शक बनल्यावर कसा फायदा होतो याच उदाहरण म्हणजे या सिनेमाचा पटकथेसाठी
त्यांनी kelela चेतन भगतचा उपयोग.
सलमान खान आणि त्याने सर्व आघाड्यांवर स्वत:च्या वयाचा विचार न करता "जय हो" या तद्दन फालतू अपयशानंतर
kelelya प्रयत्ना साठी मी किक ला २.५* देईन. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
हिरोपंती Jacki श्रॉफ पुत्र टायगर श्रॉफ व नवीन नायिका कृती सेनन यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण म्हणजे हिरोपंती हिरोपंती अर्थात साध्या शब्दात हिरोगिरी म्हणजेच कोणत्याही कथेत एका नायकाला नायक म्हणून कराव्या लागणाऱ्या उठाठेवी.
कहाणी:
मित्रांचा एक एकमेकांना मदत करणारा ग्रुप आणि त्याचा नायक बबलू (टायगर श्रॉफ). आता या नायकाच्याच भोवती कहाणी फिरते.पोरगी पळवणे आणि ज्या मित्राने मुलगी पळवली त्या मित्राला पूर्ण ग्रुप ने मदत करणे आणि साईड-बाय-साईड त्याचभोवती नायक-नायीकेचीही कहाणी गुंफणे हे तत्व लेखक संजीव गुप्ताने पाळलेलं आहे.
अभिनय:
टायगर श्रॉफच्या रूपाने सलमान खान/ह्रितिक रोशन या तगड्या शरीरयष्टीवाल्या नायकांना मिळालेला एक शानदार प्रतिस्पर्धी म्हणजे टायगर श्रॉफ. आधी मित्रांना मदत करणे व नंतर स्वत:ची कहाणी निभावणे या दोन्ही चक्कर मध्ये त्याची अभिनय क्षमता आणि शरीरयष्टी अन फिजिकल stunts करण्याची क्षमता लोकांना कळावी हे दिग्दर्शक सब्बीर खान चे लक्ष्य व्यवस्थित पूर्ण होते.
दिग्दर्शन:
दिग्दर्शक सब्बीर खान हे निर्माता साजिद नदीयादवालाच्याच आधीच्या कम्बख्त इश्कचे दिग्दर्शक. याही वेळेस एक नवीन नायकाचे पदार्पण करवताना त्याच्या अभिनय क्षमतेवर अन शारीरिक compatibility वरून लोकांचे लक्ष्य विचलित होऊ नये हे त्यांचे लक्ष्य व्यवस्थित पूर्ण होते. अभिनय क्षमता दर्शवण्यासाठी त्यांनी अनोखे प्रयत्न केलेले आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रयत्न म्हणजे मध्यंतर होईपर्यंत नायक नायिकेचा एकमेकांशी डायरेक्ट संपर्कच होऊ न देता फक्त अंदाजे-अंदाजे केलेली कथेची adjustment . पण टायगर श्रॉफ पुरेपूर उतरतो दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर.
संगीत:
साजिद-वाजीद जोडीच प्रसंगोचित संगीत सगळ्या गाण्यात आहे पण प्रेक्षकांवर छाप पडते Manj Musik यांच्या "व्हिस्तल बजा"
["Whistle Baja"] या गाण्यातील बासरीच्या सुरांचा. खरोखर अप्रतिम सुरवात बासरीची या गाण्यात वापरलेली आहे आणि या सुरावटीचा पार्श्वसंगीतातही चपखलपणे उपयोग केल्या गेलेला आहे.
रेटिंग:
टायगर श्रॉफच्या रूपाने हिंदी चित्रपटसृष्टीला एक नृत्यात वाकबगार व फिजिकली extravagant नायक मिळाल्याच
दाखवणाऱ्या या चित्रपटाला १.५* देईन. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
The amazing spider man -2 मागे तो झपाटलेला-२ आला होता मराठीतला तेंव्हा त्याच्या 3D इफेक्ट्सचे कौतुक करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे मराठी जनतेत चढाओढ लागली होती पण 3D इफेक्ट्स म्हणजे नेमके काय याचा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट एकदा नक्की बघावा. न्यूयॉर्क अन तिथला मुख्यत्वे टाईम्स स्क्वेअर इतक्या वेळा हॉलीवूड वाल्यांनी मोडीत काढलेला आहे कि आपल्या रामोजी फिल्म सिटी सारखा तिकडे एखादा स्टुडियोच असावा तोडमोड करण्यासाठी न्यूयॉर्क पुरवणारा. अतिमानवीय खलनायक आणि त्याला मानव जातीच्या भल्यासाठी लढणारा अतिमानवीय नायक हि हॉलीवूड वाल्यांची लाडकी कल्पना. आणि त्याच परंपरेत नेहमीप्रमाणे आणखी एक कडी म्हणजे स्पायडर Man . अर्थात मागच्या आणि या स्पायडर Man मध्ये बराच बदल वाटतो. खात्री नाही पण पीटर
पार्कर हि मुख्य व्यक्तिरेखा साकारणारा नट बदलल्यासारखा वाटला. आणि त्याचा मित्र harry osborn तर नक्कीच बदलला.
मागचा भाग ज्यांनी बघितला असेल ते हे नक्कीच सांगू शकतील. आपण इंग्रजी चित्रपट जास्त concentration ने बघत नाही त्याचा परिणाम असावा हा बहुतेक.
कहाणी:
स्पायडर Man हा अतिमानवीय शक्तींची देणगी मिळालेला एक व्यक्ती. जनतेच्या भल्यासाठी वगेरे लढणारा. आणि त्याच जनतेवर झालेला अतिमानवीय सैतानी शक्तींकडून हल्ला आणि त्याने लढा देऊन मिळवलेला विजय.
स्पेशल इफेक्ट्स:
दिग्दर्शन वगेरे गोष्टींवर बोलण्याची एक रसिक म्हणून माझी प्राज्ञा नाही पण मला जाणवलेले अति उत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्सचा
उल्लेख मात्र मी नक्की करीन. स्पेशल इफेक्ट्स बद्दल जास्त टेक्निकल नॉलेज नसतानाही जाणवणारे स्पेशल इफेक्ट्स हा कदाचित उच्च क्वालिटीच्या 3D तंत्रामुळेहि असतील बहुतेक पण उत्कृष्ट होते हे नक्की.
रेटिंग: जगभर चालणार्या/गाजणाऱ्या या चित्रपटाला मी बापडा काय रेटिंग देणार पण मी याला पूर्ण पाचपैकी 5* देण्याची माझी हौस पूर्ण करीन.
-समीर
सम्राट & कं
जर तुम्ही राजश्री प्रोडक्शनचा चित्रपट बघायला जाता तेंव्हा तीन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात १] कौटुंबिक नितीमुल्ये हा चित्रपटाचा आत्मा असतो आणि त्याच्या भोवताल कथा गुंफलेली असते २] आलोक नाथ आणि मोहनीश बेहल हे त्यात असतात ३]त्याचे संगीत हा त्याचा निर्विवादरित्या आकर्षक भाग असतो पण सम्राट & कं. आश्चर्यकारकरित्या तिन्ही गोष्टीना अपवाद ठरतात. शेरलॉक होम्स आणि त्याचा साथीदार डॉक्टर वॉटसन या दोन व्यक्तिरेखांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचे हिंदीत केलेले रूपांतरण म्हणजे सम्राट & कं.
वास्तविक बघता इथेही आलोक नाथ साठी आणि मोहनीश बेहल साठी स्कोप होता (गिरीश कर्नाड आणि गोपाल दत्तच्या जागी) पण
निर्मात्या कविता बरजात्या ज्या राजश्री प्रोडक्शनचे छोट्या पडद्यावरील प्रोजेक्ट्स सांभाळतात मुख्यत्वे त्यांना हे दोघे कास्टिंग साठी योग्य वाटले नाहीत बहुतेक. सुरवातीलाच मात्र त्यांनी निर्मात्या म्हणून सर ऑर्थर कॅनोन डायल यांचे आभार मानलेले आहेत.
कहाणी:
मिस्टरी स्टोरीज म्हणजेच रहस्य कथा या संकल्पनेला सावरणारे एक कथानक म्हणजे सम्राट & कं. त्यातही शेरलॉक होम्स आणि त्याचा मित्र डॉक्टर वाटसन हे दोघ पडद्यावर चितारणे हे लक्ष्य त्यामुळे सिनेमात दोन्ही व्यक्तिरेखा हिंदी पद्धतीने. आणि त्यातही हिंदी प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युजन न होता सगळे नीट पचनी पडावे हा लेखक/दिग्दर्शक कौशिक घातक यांचा प्रयत्न. या प्रयत्नात
मंदावलेली पटकथेची गती हि गोष्ट या चित्रपटाच्या कमर्शियल performance वर निश्चितपणे असर करेल हे नक्की.
अभिनय:
एस टी डी (सम्राट तिलक धारी) हि नायकाची मुख्य व्यक्तिरेखा राजीव खंडेलवालने निभावलेली आहे. पण कुठेही तो कमी पडत नाही. शेरलॉक होम्सला हिंदीत साकारणे म्हणजे त्याची analysis पॉवर/observation पॉवर आणि conclusion पॉवर यांचा योग्य मेळ लेखकाला अपेक्षित पद्धतीने साकारणे. आणि या कसोटीवर राजीव खंडेलवाल पुरेपूर उतरतो. त्याची observe करून निष्कर्षावर येण्याची पद्धत प्रेक्षकांना पटते.
दिग्दर्शन:
कौशिक घातक यांचा वापर निर्मात्याने दिग्दर्शक म्हणून केलेला आहे. कौशिक घातक हे छोट्या पडद्यावरील एक नाव. राजश्रीच्याच या आधीच्या एक "एक विवाह ऐसा भी" चे दिग्दर्शक. तेच इथे लेखक आणि पटकथेतही सहलेखक. थोडक्यात ऑल इन वन package . पण सगळीकडे अगदी पुरेपूर उतरतात ते प्रेक्षकांच्या अपेक्षेवर. अर्थात राजीवनेही अभिनयाने त्यांना साथ तोडीस-तोड दिलेली आहे. पण त्यांना त्यांचे श्रेय हे मिळायलाच हवे. कारण एका अतिशय दुर्लभ विषयावर हिंदीत एक चित्रपट काढून तो तिकीट बारीवर चालणार नाही याचा अंदाज असूनही प्रयत्नात कसूर न करणे हे खरोखर कौतुकास्पद. याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे हॉलीवूड ची बरोबरी करताना वापरलेली पटकथा आणि प्रकाशयोजना. हाच चित्रपट जर आणखी कमी लांबीचा बनवून त्याची स्पीड थोडी वाढवली असती तर फरक पडला असता असे प्रेक्षकांना जाणवून जाते बघितल्यावर.
संगीत:
मागील वर्षी गाजलेल्या आशिकी-२ मधील संगीतकार जोडी अंकित तिवारी आणि मिथुन यांना इथे निर्मात्याने संधी दिलेली आहे.
आता एका रहस्य कथेत संगीताला मुळातच काही स्कोप नसतो पण जितका असतो तितका तितका दोघांनीही पुरेपूर निभावलेला आहे.रहस्य कथेत पार्श्वसंगीत उत्तम हवे आणि त्या कसोटीवर दोघंही फिट्ट बसतात.
का बघावा-बघू नये:
एका वेगळ्या विषयावरील एक उत्तम कलाकृती म्हणून बघण्यास काहीही हरकत नसलेला एक चित्रपट. जर तुम्हाला टिपिकल बॉलीवूड सिनेमे आवडत असतील म्हणजे प्रेम/संगीत इत्यादी तर या चित्रपटाची पटकथा फारच संथ वाटण्याची शक्यता आहे.
रेटिंग: कौशिक घातक आणि राजीव खंडेलवाल या दोघांच्याही प्रयत्नासाठी मी २ * देईन,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
2 स्टेट्स चेतन भगत आणि त्यांच्या गाजलेल्या "टू स्टेट्स" या गाजलेल्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट. लेखकाने खरोखर कादंबरी अतिशय उत्कृष्ट रित्या चित्रित केलेली आहे त्याची कहाणी (सुरवातीलाच कादंबरीत हि त्याची कहाणी आहे हे त्याने घोषित केलेले आहे).चित्रपटातही लेखक तोच असल्यामुळे आधी हे क्लियर करण्याच सौजन्य निर्माते धर्मा प्रोडक्षंस(करण जोहर) आणि नाडीयाडवाला फिल्म्स (साजिद नाडीयाडवाला) या दोघांनीही दाखवलेले आहे.
कहाणी:
"टू स्टेट्स" हि कादंबरी न वाचलेली इंग्रजी येणारी तरुणाई विरळ इतकी हि कादंबरी गाजली होती. (अभ्यासुनी २००८ च्या आसपासचा काळ आठवून बघावा). त्यामुळे त्यावर आधारित चित्रपट आलाच समजा तर तो तिकीट खिडकीवर चालणारच या अंदाजावर मोहर उमटवणारा हा एक चित्रपट. क्रिश मल्होत्रा (अर्जुन कपूर) आणि अनन्या स्वामिनाथन (आलिया भट) या दोघांची कहाणी म्हणजे टू स्टेट्स. पंजाबी मुलगा व तमिळ मुलगी म्हणजे दोघांच्या संस्कृतीत उत्तर-दक्षिण चे अंतर. हे संस्कृतीतले अंतर टिपण्याचे व त्याला शब्दात उतरवताना लेखकाचे कसब वादातीत होते. आणि म्हणूनच हि कादंबरी अफाट लोकप्रिय झाली होती/आहे. अहमदाबाद चा आय आय एम मध्ये शिकणारे दोघंही आणि परिस्थितीने एकमेकांच्या संपर्कात येउन प्रेमात पडलेले दोन व्यक्ती. आता हिंदी चित्रपट आणि प्रेमात पडलेले दोन जीव म्हणजे गाण्यांचा/संगीताचा भरपूर वापर (बागेत/कोलेज मध्ये/होस्टेल मध्ये इ. इ.) हे अपेक्षित होते.पण दिग्दर्शक अभिषेक वर्मनचे कौतुक कारण त्याने कुठेही "अति" होऊ दिलेले नाही.
अभिनय:
टू स्टेट्स मध्ये कहाणी उत्तम होतीच पण पात्रनिवड हा एक इश्यू होण्याचा चान्स होता.पण सांगण्यास आनंद कि क्रिश आणि अनन्या हे दोघेही परफेक्टलि सूट होतात आणि प्रेक्षकांची (कादंबरी वाचलेल्या) अपेक्षा पूर्ण करतात.तमिळ आणि पंजाबी परिवार जर बघितलेले असले तर दोन्ही परिवार एकदम उत्तमरीत्या शोभतात. आणि हा निर्मात्या/दिग्दर्शकाचा/लेखकाचा एक विजय असे म्हणूया कारण या चित्रपटाला पब्लिसिटीची पात्रांद्वारे फारशी गरज नव्हतीच. कादंबरीमुळे आधीच पुरेसा लोकप्रिय होता २ स्टेट्स.
दिग्दर्शन:
अभिषेक वर्मनचे कौतुक कारण त्याने दोन प्रांत involve असलेली हि गुंतागुंतीची कहाणी एकदम व्यवस्थित हाताळली. पंजाब आणि तामिळनाडू हे दोन प्रांत involve असल्यामुळे टाचणी पडून धुरळा उडण्याचा खूप चान्स होता पण त्याने व्यवस्थित हाताळले.
का बघावा: चेतन भगत हा लेखक एक उत्तम लेखक आहे. "कई पो चे" या त्याच्या एका कादंबरीवर आधारित (वन नाईट एट कॉल सेंटर) एक चीतपट आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे आणि cinematic लिबर्टी या संकल्पनेचा वस्तविकतेशी फारकत घेताना कितपत उपयोग करावा याची जाण असलेला एक लेखक असल्यामुळे नक्कीच बघावा असे वाटते याच्र स्पष्ट उदाहरण म्हणजे त्याचा कादंबरीत एक बॉस दाखवला आहे जो चेन्नई मध्ये त्याची खूप मदत करतो पण हे पात्र चित्रपटात नाही.
एका उत्तम कादंबरीवर आधारलेल्या चित्रपटाला मी 4* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर