मराठी सिनेमा हा
"प्रेम" हा विषय सोडून साय-फाय थ्रिलर अश्या मराठीला कदाचित पूर्णत: अनोळखी
असणार्या प्रांतात शिरू शकतो काय?? उत्तर आहे होय!!!! तसली हिंमत करणारे फिल्ममेकर्स
मराठीत आहे आणि तसा प्रयत्नही ते करण्याची हिंमत करू शकतात, या हिमतीला लोकाश्रय कितपत
मिळेल हे काळ ठरवेलच पण प्रयत्न मनापासून केलेला आहे हे जाणवते हे मात्र नक्की.
त्यातही उल्लेखनीय असे की साय-फाय थ्रिलर हा प्रकार कदाचित मराठीत नाही
आणि मराठीचं एकूणच आर्थिक गणित बघता ते शक्यही नाही पण हि हिंमत करून दिग्दर्शक सुजय
एस. डहाके मराठीत कदाचित पहिल्यांदाच एक साय-फाय थ्रिलर घेऊन आलेत. शेवट करताना त्यातही
तो अर्धवट ठेवून आणि फुन्त्रू-२ अशी पाटी देऊन सुजयजींनी सिक्वेल येणारच असे अप्रत्यक्षपणे
दर्शकांना सुचित केलेले आहे.
मोहन आगाशे हे एक इंजीयारिंग
कॉलेजचे प्राध्यापक-संशोधक-फाउंडर-संशोधक वगेरे. मेकॅनिकल इंजिनियरिंग कॉलेजचे. साय-फाय थ्रिलर अर्थात सायन्स वर बेतलेली रहस्यमय
कथा जेंव्हा बनवल्या जाते तेंव्हा आपण जे साधर्म्य कथेसाठी जोडतोय ते खरोखर बघण्यासारखे
नाही काय? एक मेकॅनिकल इंजिनियरिंग कॉलेज मधले विद्यार्थी-प्राध्यापक इतक्या शिताफीने
कम्प्युटर software प्रॉब्लेम्स इतक्या डीटेल्ससकट उलगडू शकतात??थोडावेळ विनोद बाजूला
ठेवू पण केतकी माटेगावकर सारखी मुलगी देखील मेकॅनिकल इंजिनियरिंग मध्ये admission घेत
नाही, त्याची कारणे आपण बाजूला ठेवू पण असे घडते हे मात्र नक्की.
मदन देवधर (वीरा) हा
एक मेकॅनिकल इंजिनियरिंगचा विद्यार्थी आणि (अनया) केतकी माटेगावकर ही त्याची क्लासमेट.
ती त्याला आवडते आणि तो प्रयत्न करतो पण त्याला जवळपास रिजेक्ट करते. मग तो एका प्रोजेक्टपर्यंत
पोचतो आणि तिची एक प्रतिकृती तयार करतो. या सगळ्या गुंत्याला साकारताना कहाणी मैत्री-effective
task execution इत्यादी इत्यादी बर्याच विषयांना स्पर्श करते.
संजय डहाके हे या आधी
राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या "शाळा"या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांना
भेटलेत. फुन्त्रू हे टायटल का तर इमेज क्रिएशन चा जो प्रोजेक्ट विराला सापडतो त्या
प्रोजेक्टचे नाव असते फुन्त्रू. संजयजीच याचे कथा व पटकथा लेखक. कथा व्यवस्थित जुळवून
आणलेली आहे त्यांनी काही क्षुल्लक डीटेल्स वगळले तर कुणीही कथेवर बोट दाखवू शकणार नाही
उदा. इंजिनियरिंगचे विद्यार्थी सोडले तर. पण मुद्दा आहे पटकथा कारण ही देखील संजयजिंचीच.
कथेला नीट जुळवण्यात कदाचित इतकी मेहनत घेतल्या गेली की पटकथेकडे दुर्लक्ष झालेले आहे
हे नक्की. इतके स्पष्ट दुर्लक्ष की कथेचा अंदाज प्रेक्षकांना लागून जातो पण कथाच पुढे
न सरकल्यामुळे प्रेक्षक कंटाळून जातात.
हृषीकेश-सौरभ-जसराज
असे तीन संगीतकार या चित्रपटाला लाभलेत आणि सांगण्यास आनंद की अप्रतिम संगीत सगळ्या
गाण्यांना त्यांनी दिलेले आहे.बाकी सगळे गाणे तर उत्तम आहेतच पण वैभव जोशी यांनी लिहिलेल्या
"अलख निरंजन तू" हे गाणे विशेष उल्लेखनीय. आणखी एक संगीतात संगीत दिग्दर्शकांनी
जे कमावलं ते साकेत कानेटकर यांनी पार्श्व-संगीतात गमावलं. असे बरेच प्रसंग होते ज्यात
उत्तम पार्श्व-संगीत ही कहाणीची गरज होती कारण कहाणी ही एक साय-फाय थ्रिलर होती. पण........
संजय जाधव यांनी टाईमपास
१ च्या वेळेस शेवट न करवता अर्धवट ठेवून सिक्वेल्ची मुहूर्तमेढ केली होती. त्यांच्या
पावलावर पाऊल ठेवत या संजयजींनी सिक्वेल्ची मुहूर्तमेढ केलेली आहे. सिक्वेल आल्यास
हरकत नाही पण नवीन भागात संथ पटकथा आणि पार्श्व संगीत या बाबींकडे लक्ष देतील अशी अपेक्षा
प्रेक्षक बाळगतात. मला चित्रपट ठीक वाटला म्हणून मी दोन (२*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी
घ्यावा.
-समीर