पीके
विधू विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी हि जोडी म्हणजे यशाची हमखास खात्री अस समीकरण होत, मग जर यश मिळतेच आहे तर तीच टीम घेऊन नि तश्याच मनोरंजनात्मक पद्धतीने थोडाफार जनजागृतीचा प्रयत्न का करू नये या विचाराने याच जोडीचा नवीन चित्रपट म्हणजे पीके. राजकुमार हिरानीची कथा म्हणजे कल्पनाशक्तीचा असलेला सुयोग्य वापर आणि आणि त्याच कथेत उत्तमोत्तम पात्र अन त्या पात्रांची आपापसात असलेली अभिनयाची जुगलबंदी अस एक समीकरण बनलेलं होत. सर्किट-मुन्नाभाई-फरहान--राजू रस्तोगी-रांचो आणि व्हायरस असे अनेक उदाहरणं घेता येतील. शंतनू मोईत्रा चे संगीत आणि अभिजात जोशी चे कथा व पटकथा लेखन हा त्या सगळ्या यशस्वी कडीतील पाया. याही वेळेस पडद्यावर असलेले कलाकार जवळपास तेच असले तरी पडद्यामागची टीम पूर्ण तीच होती. कुटुंबासमवेत चित्रपट बघण्यासाठी जाता येईल असे केवळ दोन नावं हिंदी चित्रपटसृष्टीत आहेत. सुरज बडजात्या आणि राजकुमार हिरानी. याही वेळेस प्रयत्न पूर्ण असलेला जाणवतो पण भट्टी जमलेली नाही.
अभिनय:
आमिर खान त्याची अभिनय क्षमता यावर कुणाचा आक्षेप असण्याची शक्यताच नाही पण प्रत्येक अभिनेत्याला जीवनात एक कठीण भूमिका मिळते. माझ्यामते पीके हे अमीरखानच्या आता पर्यंतच्या करिअर मधील सगळ्यात वेगळी अन कठीण भूमिका.
आणि अमीर खान शब्दश: त्याच वेगळेपण आणि अभिनयक्षमता सिद्ध करतो या भूमिकेने. आता या अंतराळातील त्रांगड्यात
जनजागृतीच्या दृष्टीने सौरभ शुक्ला (तपस्वी) या व्यक्तिरेखेचा समावेश राजकुमार हिरानीने केलेला आहे पण.....
दिग्दर्शन:
हिंदी चित्रपट हे अंतराळ किंवा तत्सम बाबीवर जेंव्हा बनतात तेंव्हा हे हॉलीवूड नसल्यामुळे बजेट चा प्रश्न असतोच. हा सिनेमाही अगदी दिग्दर्शकच एक निर्माता असला तरी याला अपवाद ठरलेला नाही. पण राजकुमार हिरानीने खरोखर अमीर खानच्या व्यक्तिरेखेला हाताळण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही.पण अभिजात जोशीबरोबर मिळून त्याने लिहिलेल्या पटकथेची गती इतकी मंदावते कि प्रेक्षक irritate होण्यापर्यंत. हि चूक अनवधानाने झाली असावी हे स्पष्ट आहे पण पटकथेची मंदावलेली गती या चित्रपटाच्या कमर्शियल एक्सलंस वर असर टाकणार हे नक्की. एक अत्युत्कृष्ट व्यक्तिरेखा चित्रपट तडीस नेत नाही हे प्रेक्षक नक्कीच जाणून आहेत.
मी आमिर खान च्या अभिनयासाठी मुखत्वे पीकेला अडीच (२ १/२*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
एलिझाबेथ एकदशी (मराठी)सध्या गाजणाऱ्या होणार सून मी या घरची या मालिकेच्या लेखिका मोठ्या पडद्यावर उतरल्या असून मधुगंधा कुलकर्णी यांचा चित्रपट कथा लेखिका म्हणून पहिलाच चित्रपट म्हणजे एलिझाबेथ एकादशी.एलिझाबेथ हि एक सायकल अन घरच्या परिस्थितीमुळे तिला विकण्याची असलेली गरज, मग घरातल्या लहान मुलांचा त्या सायकलीला वाचवण्याचा प्रयत्न अन त्या प्रयत्नाभोवताल फिरणारी कथा म्हणजे एलिझाबेथ एकादशी.आजकालच्या काळात "मनोरंजनाचा एक तरतरीत डोस" या नावाखाली वास्तविकतेशी फटकून असलेल्या तद्दन निर्बुद्ध अन फुटकळ कथा आजकाल दिसतात. लेखिका मधुगंधा कुलकर्णी या स्वत:च एक निर्मात्या असून त्यांनी हरिश्चंद्राची factory फेम दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या सोबत एक उत्तम कथा तीन तासात बांधलेली आहे. कौटुंबिक पातळीवर रंगवलेली एक अप्रतिम कथा असून श्रीरंग महाजन या बाल अभिनेत्याचा उल्लेख करावाच लागेल. या लहान मुलाने कथेच्या मागणीप्रमाणे अक्षरश: एकहाती तोलून धरलेली कथा आहे हि. आणि म्हणूनच बहुधा दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी त्याच्यावर विसंबत त्याला कथेत
पूर्ण स्कोप दिलेला आहे.
एकूणच, गाणे नाही,मोठमोठे सेट्स/कलाकार नाहीत आणि कथाही एकदम हायफाय वगेरे वगेरे नाही पण एक वास्तविकतेवर अवलंबून असलेली कथा,इतकी वास्तविक कि चित्रपटातले पात्र वास्तविक जीवनात कुठे-ना-कुठे आपल्याला भेटल्याचे जाणवून जाते प्रेक्षकांना बघितल्यावर.
मी या चित्रपटाला ४.५ * देईन ५ पैकी,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर