जगावेगळी ती
स्वप्न असतो एक अजोडसा ठेवा
कोणत्याही क्षणी आठवणीला एकटे सुटू देत नाही
स्वप्नांचे असते सगळ्यांशीच सख्य
हा आपला अन तो परका असा भेदभाव तिथे होत नाही
'ती' हा व्यक्तिविशेष
कोणी न कोणी प्रत्येकच तरुणाच्या स्वप्नात असेल
तरीही कवितेत सही पण 'माझी ती' वेगळीच वाटो
या अट्टाहासाला अजिबात तळ मिळत नसेल
कोणी न कोणी प्रत्येकच तरुणाच्या स्वप्नात असेल
तरीही कवितेत सही पण 'माझी ती' वेगळीच वाटो
या अट्टाहासाला अजिबात तळ मिळत नसेल
प्रेम हि कल्पना प्रत्येकच जण अनुभवतो
हातात हात घेऊन नशिबाशी भांडाया बघतो
पण 'जिचा' हात 'माझ्या' हातात आहे तीच जगावेगळी
या अन यासम मान्यतेला अजिबातच अंत नसतो
हातात हात घेऊन नशिबाशी भांडाया बघतो
पण 'जिचा' हात 'माझ्या' हातात आहे तीच जगावेगळी
या अन यासम मान्यतेला अजिबातच अंत नसतो
वेगळेपणा तिचा
कुठे नि कसा स्मरावा??
सावरणारा तिचा आडोसा
नेहमिपुरता हृदयात बंदिस्त असावा!!!
कुठे नि कसा स्मरावा??
सावरणारा तिचा आडोसा
नेहमिपुरता हृदयात बंदिस्त असावा!!!
तिच्या आठवणींना कधीही अंत
असूच शकत नाही
पण नशिबापुढे आपण सगळेच पांगळे या वास्तविकतेला पर्याय
असूच शकत नाही
-समीर
असूच शकत नाही
पण नशिबापुढे आपण सगळेच पांगळे या वास्तविकतेला पर्याय
असूच शकत नाही
-समीर