The Attacks of 26-11
२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई येथे खूप मोठा दहशतवादी हल्ला झाला.पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी १६६ बळी घेतलेत.हा हल्ला कसा झाला?नेमक तिथे काय घडल असेल? या जनतेच्या उत्सुकतेवर आधारित एक बॉलीवूड कलाकृती ते हि
रामगोपाल वर्मासारख्या उत्कृष्ट दिग्दर्शकाकडून.आजपासून काही वर्षांपूर्वी (पक्षी रंगीला/सत्या च्या काळात)रामगोपाल वर्माचा स्वत:चाही विश्वास नसेल कि तो एक सिनेमा दिग्दर्शित करेल ज्यात गाणे नसतील/डान्स नसेल/हिरोइन सुद्धा नसेल.पण केल.
सुमारे फक्त ६० मिनिटे म्हणजे २ तासाचा सिनेमा पण 'based on true story' अस सिनेमाच्या अगदी सुरवातीलाच सांगून टाकल्यामुळे तितकसं जनतेला काहीच वाटत नाही.आमिर अजमल कसाब च्या २६-११ ते फाशी या प्रवासासभोवताल पूर्ण सिनेमा फिरतो.मूळ प्रश्न,आजही,माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेचा कि (का?). हे हल्ले का केले गेले?इतक पद्धतशीर planning करून? तर या मुख्य प्रश्नाच उत्तर उत्तर दिग्दर्शकाने (त्याच्या पद्धतीने) दिलंय . दाखवण्यासाठी (म्हणजे भारत विरोध धर्म वाचवणे इत्यादी)काहीही असल तरी खर कारण हे त्या गटाचं (संमिलीत सर्वच मंडळींच्या गटाचं) पद्धतशीरपणे केल्या गेलेलं "ब्रेन वॉशिंग".'आका' या व्यक्तीचा उल्लेख आहे पण या आका शब्दाआड कुणीही कुशल ब्रेनवॉशरअसू शकतो. मुबई हल्ल्याने सुरवात झालेला चित्रपट कसाब ला पुण्याला येरवडा जेल मध्ये झालेल्या फाशीवर संपतो.नाना पाटेकर याने त्या काळात मुंबईचे joint पोलिस कमिशनर असलेल्या राकेश मारिया यांची भूमिका केलेली आहे.संदीप जैस्वाल याने अजमल आमिर कसाब याची.दोघंही 'सूट' होतात आपापल्या भूमिकात.
कोणत्याही चित्रपटाला रेटिंग हे त्या चित्रपटाच्या कमर्शियल एक्सलंस वर अवलंबून असते.पण इथे हा भागच पूर्णत:जाणीवपूर्वक दुर्लक्षित असल्यामुळे मी या चित्रपटाला रेटिंग-पूर्ण ५* देईन एकदा मुंबई हल्ले समजून घेण्यासाठी कोणताही पूर्वग्रहदुषित 'माइंडसेट' न बाळगता नक्की बघावा असा एक चित्रपट.
-समीर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा