शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

गोलमाल अगेन

प्रथितयश दिग्दर्शक रोहित शेट्टी "गोलमाल" सिरीज मधल्या या चौथ्या चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहेत. गोलमाल सिरीज मधील आधीचे  तीनही  चित्रपट म्हणजे "डोके घरी ठेवा आणि फक्त performances आणि दिग्दर्शन बघा" असा सरळ सरळ हिशेब होता. हा चौथाही त्याला कसा अपवाद राहील ???




गोलमाल सिरीज म्हणजे निर्बुद्ध कथा अन कथानक चांगलं दिग्दर्शन असेल तर तिकीटबारीवर चित्रपट कसा कमाल करू शकतात याचे एक निर्विवाद उदाहरण. कथा हि असते पण जेवताना लोणचं जस असते "तोंडी लावण्यापुरतं" तितक्याच महत्वाची. कथा येथेही आहे, छान भूत वगैरे सुद्धा आहे पण चित्रपट कोठेही भीतीदायक नाही उलट विनोदी आहे. या यशामागे पूर्ण श्रेय हे रोहित शेट्टीचेच. 

रोहित शेट्टी आधीच्या तीनही गोलमाल मध्ये शानदार ऍक्शन सिक्वेन्सेस आणि चित्रपट संपतानाच्या श्रेय  नामावलीच्या वेळेसचे नवीन प्रयोग यामुळे प्रेक्षकांमध्ये आपली छाप सोडून गेला. शेवटच्या श्रेयनामावलीच्या वेळेस त्याने चित्रपट शूट करताना होणाऱ्या गमतीदार प्रसंगांचे चित्रीकरण करून श्रेयनामावलीच्या काही मिनिटांत प्रेक्षकांना ते दाखवले.चेन्नई एक्स्प्रेस मध्ये त्याने शेवटी बदल करून श्रेयनामावलीच्या वेळेस ते आयटम सॉंग (लुंगी डान्स)  वापरलं आणि ते हि हिट झालं. यावेळेस त्याने शेवटी गाणे अन त्याची दृश्यांची पद्धत यांचे मिक्श्चर वापरलं. 

अजय देवगण (गोपाल), अर्शद वारसी(माधव), तुषार कपूर (लकी), श्रेयस तळपदे (लक्ष्मण 1), कुणाल खेमू (लक्ष्मण २)  मुकेश तिवारी (वसुली भाई), व्रजेश हिरजी (पप्पू) हि सगळी आधीच्याच गोलमालची स्टारकास्ट रोहितने या भागासाठी रिपीट केली आणि या भागात परिणीती चोप्रा (खुषी) निल नितीन मुकेश (निलेश) अन प्रकाश राज (वासू) याना नवीन स्टारकास्ट मध्ये ऍड केलं. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेला कथेच्या लायकीप्रमाणे पुरून उरलेला आहे हे आधीच्या तीनही भागात सिद्ध झालं होतंच. याही वेळेस जुने सगळे जण नवीन ऍडिशन सकट पुरून उरलेत.      

गोलमाल सिरीज म्हणजे "सब कुछ रोहित शेट्टी" असा साधा सरळ हिशेब आहे आणि चौथा भागही त्यापासून वेगळा. नाही डोक्याला जास्त शॉट लावून न घेता तीन तास जाऊन मनोरंजन व्हावे इतकी साधी-सरळ अपेक्षा असेल तर गोलमाल अगेन तुमचाच अन कदाचित आवडेलही.

मला रोहित शेट्टी अन त्याचे सगळे प्रयोग आवडतात म्हणून मी गोलमाल अगेन ला साडे तीन (३.5 *) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर      

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

अमर फोटो स्टुडियो

एकाच मराठी नाटकांत दोन सत्रात , वर्तमानकाळ - भूतकाळ - भविष्यकाळ  आणि डबल रोल ला फोडणी दिलेलं एक नाटक ज्यात "प्रेम" नाही. होय "प्रेम" हा मुख्य विषय नसूनही मनाला  स्पर्श करत अप्रतिमरित्या जमून आलेलं एक नाटक म्हणजे "अमर फोटो स्टुडिओ" 'दिल दोस्ती दुनियादारी" या गाजलेल्या मराठी मालिकेची टीम म्हणजेच  अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि सिद्धेश पूरकर  आणि लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांचे नवीन नाटक म्हणजे अमर फोटो स्टुडिओ.


मनस्विनी लता रवींद्र म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांच्या लेखीका आणि नुकत्याच गाजलेल्या "ती सध्या काय करते" च्या पटकथा लेखिका.  त्यांनी एक  गुंतागुंतीची कथा नाटकाचा कोणतेही रिटेक नसलेल्या अन लोकेशन बदलण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या वातावरणात अगदी कौतुकास्पद रित्या उभी केलेली आहे.

अमेय वाघ, सखी गोखले सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि सिद्धेश पूरकर या सगळ्यांचाच अप्रतिम अभिनय हे अमर फोटो स्टुडिओ चे मुख्य यश. अमेय वाघ ने अक्षरश: तीन ते चार वेगवेगळ्या भूमिका सराईतपणे वठवल्यात. आणि आजोबा - वडील - मुलगा या तीनही पिढ्यांच्या अभिनयात सुव्रत जोशी कोठेही कमी पडत नाही. उलट दुसऱ्या अंकात एक असा प्रसंग येतो कि त्याला एकाच सीनमध्ये दोन भूमिका कराव्या लागतात. त्या प्रसंगात फक्त वेशभूषेच्या फरकाने दोन भूमिका वठवून सुव्रत जोशी  अगदी अप्रतिम रित्या दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर पुरून उरतो. सखी गोखले हिने पण तिच्या भूमिकेत जीव ओतलेला आहे. स्टेजवरून खाली प्रेक्षकांत कहाणीच्या प्रसंगान्वये शिरून प्रेक्षकांना कहाणीत समरस होण्यास भाग पाडण्याचा तिचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद होता.

 एक अप्रतिम नाटक जे मनोरंजनाचा हेतू पूर्ण करते. वास्तविक एका नाटकाला रेटिंग मी काय देणार पण तरीही या नाटकाला ५* देण्याचा मोह मी चुकवणार नाही.

-समीर 

रविवार, १३ ऑगस्ट, २०१७

मला काहीच प्रॉब्लेम नाही

मला काहीच प्रॉब्लेम नाही

कॅशमीर महाजनी, स्पृहा जोशी आणि विजय निकम यांच्या प्रमुख भूमिका असलेला मराठी सिनेमा.  भारदस्त मराठी नाव अन फुटकळ कथा -पटकथा हे कॉम्बिनेशन आपण आजवर खूपदा बघितलं आहे. पण फुटकळ नाव आणि अति -फुटकळ कथा-पटकथा यांचे उदाहरण म्हणजे "मला काही प्रॉब्लेम नाही". नाव फुटकळ असू शकते पण जर ते कथेशी संबंध जोडता हास्यास्पद असेल तर?? "समझनेवालों को इशारा काफी". कॅशमीर महाजनी हा नायक आणि याच नायकाचे कन्फ्युज कॅरेक्टर क्लायमॅक्स मध्ये जर काहीही एक्सप्लेनेशन न घेता गेले तर?? हिंदीत चुटपुट सोडून जाते प्रेक्षकांत पण मराठीत इरसाल शिव्यांचा धनी बनवते नायकाला .

वास्तविक बघता दिग्दर्शक समीर विद्वांस हे अनुभवी दिग्दर्शक."YZ " आणि क्लासमेट्स सारखे चित्रपट देणारे. पण या वेळेस कौस्तुभ सावरकर सारखा नवखा पटकथाकार लाभला आणि   YZ  वाल्या "बत्तीस" सारखं प्रसंग सांभाळून घेणारे एकही कॅरेक्टर दिग्दर्शकाला अन कथा-पट्कथाकाराला सापडले नाही. थोडक्यात इतकी मेहनत करूनही बट्ट्याबोळ उभा राहिला एक.

तर या चित्रपटासाठी वेळ गमावू नका अजिबात, या प्रयत्नाला रेटिंग मी काय देणार बापडा.

-समीर  


शनिवार, २९ एप्रिल, २०१७

बाहुबली २ - The Conclusion

दक्षिण भारतीय चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा ते निर्विवादपणे नायक प्रधानच असतात. नायक प्रधान अन कहाणी असूनही कहाणीत नायकाच्या चारित्र्याला वेगळ्या उंचीवर सामान्यांच्या आवाक्याबाहेर पोचवणारे. अमोल पालकरांच्या छोटी सी बात सारखे हलके फुलके करमणूक प्रधान  चित्रपट दक्षिण भारतात बनतात कि नाही दे जाणे. अर्थात "देव जाणे" कारण भाषा सीमा. तर हा भाग बाजूला ठेवू पण बाहुबली म्हणजे भारतीय किंबहुना दक्षिण भारतीय सिनेमा हा खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोचला असेच म्हणावे लागेलएखादा हॉलिवूडचा सिनेमा ज्या शिताफीने कम्प्युटर ग्राफिक्सचा उपयोग करून सजलेला असतो, त्याला टक्कर देणारी कम्प्युटर ग्राफिक्सची करामत बाहुबली मध्ये आहे. जवळपास प्रत्येक फ्रेम मध्ये असणारी कम्प्युटर ग्राफिक्स ची करामत जेंव्हा तुम्हाला कोठेच ओळखू येत नाही पूर्ण वेळ, तेंव्हा निश्चितच अप्रतिम पातळीवर पोचलेला सिनेमा असे याचे    वर्णन करावेच लागेल





बाहुबली म्हणजे बाहुबली च्या कथेबरोबर होणारी तुलना हे अपेक्षितच आहे. पण लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या पटकथेबरोबर ज्या शिताफीने कथेची मांडणी केली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे. कारण बाहुबली हा कोठेही कहाणीसाठी बाहुबली वर अवलंबून वाटत नाही, जेथे आहे तेथे कहाणीचा संदर्भ संवादांच्या माध्यमातून बेमालूमपणे पडद्यावर उभा करण्यात आला आहे. जेणेकरून प्रेक्षकांना कोठेही "समजले नाही" असा फील येतच नाही.अडीचशे कोटींचे शब्दश: महाप्रचंड बजेट असलेल्या चित्रपटाकडून हे अपेक्षितही होतेच म्हणा.पण तरीही असं वाटण्याचं execution अप्रतिमरीत्या पडद्यावर   केलेलं आहे हे नक्की. मागच्या बाहुबली मध्ये कटप्पा ने बाहुबलीला का मारलं याचा उल्लेख कमीत कमी या कथेत होईल असे वाटते पण नाही, कथेत/संवांदांत तो संदर्भ आहे पण तुटपुंजा आहे अगदी. 

प्रभास चा बाहुबली, राणा दग्गुबत्तीचा बल्लालदेव अन सत्यराजचा कटप्पा हे नायक आणि अनुष्का शेट्टीची देवसेना या सगळ्या नायक नायिकांची कामगिरी उल्लेखनीय या सदरात मोडते. तमन्नाहि आहे काही प्रसंगात पण अगदी काहीच प्रसंगात. प्रभास ने ज्या कमांड ने बाहुबली (अमरेंद्र + महेंद्र) उभा केलेला आहे त्याला खरोखर तोड नाही. बल्लालदेवचा राजा बनण्याचा हव्यास, त्यासाठी तो करत असलेले षडयंत्र, कटप्पाची बाहुबलीला असलेली साथ इत्यादी इत्यादी विषयाबरहुकूम प्रसंगात  प्रत्येक जण शोभून गेलेला आहे.   अनुष्का शेट्टीही मुख्य नायिका आहे पण ती शब्दश: सुंदर दिसलेली आहे पूर्ण सिनेमात. अगदी शेवटच्या काही प्रसंगात तिचे म्हातारे दिसणे आवश्यक होते. पण ती कदाचित प्रयत्न करूनही म्हातारी दिसू शकलीच नाही.      

प्रभास अन राणा दग्गुबत्ती हे दोघेही फिजिकली शब्दश: प्रचंड मेहनत घेत असल्याचे   जाणवून देतात कैक प्रसंगात. तुलना करु नये पण आपला हिंदीतला अक्षय कुमार सोडून कोणीही करोडपती अभिनेता इतकी मेहनत घेऊ शकत नाही हे नक्की. आपली खानावळ जिम वगैरे करून "दाखवू" शकतात फिजिक पण ज्या मेहनतीची जाणीव  प्रभास करवतो तसे हिंदीत कुणालाच शक्य नाही आणि मराठी तर कुठे स्पर्धेतही नाही करोडोंच्या. आपल्या मराठीला आता सैराटचीच पुण्याई शंभरएक वर्षे पुरेल आणखी..........    

एस एस राजामौलीनचे दिग्दर्शन हे बाहुबली श्रुंखलेचे सगळ्यात मोठे यश. मान्य कि सगळे अभिनेते आपापल्या भूमिकांत शोभले पण अडीचशे कोटींच्या जहाजाचा कॅप्टनच कचखाऊ असता तर?? अडीचशे कोटींचा प्रोजेक्ट धुळीला मिळाला असता. पण एस एस राजामौलीचे खरोखर कौतुक. कारण त्यांनी दुसरा भाग असूनही प्रेक्षकांना कुठेही ' समजल्याची' भावना येऊ दिली नाहीतीन तासांच्या चित्रपटांत प्रत्येक फ्रेम इंग्रजी शब्द आहे ना "लॅव्हिश" त्याप्रमाणे चित्रित केली. बाकीचे जाऊ देऊ देऊ डिटेल्स पण प्रभासची एंट्री हि खास असली पाहिजे हा एक उल्लेखनीय असा त्यांचा कटाक्ष. पहिल्या बाहुबलीत खांद्यावर शिवलिंग घेत त्याचे महत्व सांगत तर दुसऱ्या बाहुबलीत राजमातेची अग्नीला घेऊन जाण्याची कवायद  सुरु असतानाची हत्तीच्या फायटिंग मधली एंट्री. मान्य कि या फायटिंगमधला बराचसा भाग हा कम्प्युटर ग्राफिक्स असावा. पण हा एंट्रीचा महत्वाचा भाग हा भरपूर मेहनत करून किंवा कम्प्युटर ग्राफिक्स असल्यास भरपूर पैसे खर्च करून चित्रित केल्यासारखा वाटतो. पहिल्या बाहुबलीत एंट्री नंतर पूर्ण चित्रपटभर प्रभास भरून राहिला होता. या त्याच्या 'भरून राहण्यात' त्याच्या एंट्रीचा महत्वाचा वाटा होता. तेच काम बाहुबली मध्येही त्याच्या एन्ट्रीमुळे घडते. या लहानश्या निरुपद्रवी पण अतिशय महत्वाच्या गोष्टीसाठी एस एस राजामौलीचे विशेष कौतुक.   
एम एम करीम चे संगीत बाहुबली ला लाभलेले आहे. एम एम करीम मला जिस्म मधल्या 'आवरापन बंजारापन" या गाण्यामुळे आठवतात अन आवडतात. बाहुबली मध्ये एकदम छप्पर फाड के अत्युत्तम संगीत नाही. पण कमीही पडत नाही कुठेच.

अमरेंद्र बाहुबलीचा मुलगा महेंद्र बाहुबलीची एंट्री कथेत झालेली आहे. त्यामुळे बाहुबली पुढच्या काही वर्षात पडद्यावर आल्यास आश्चर्य वाटायला नको. हॅरी पॉटर चे अनेक भाग, सगळे सारख्याच पात्रांचे  पण कथेच्या नाविन्यामुळे आम्हीच भारतीय दर वेळेस डोक्यावर घ्यायचो. मग बाहुबलीची आणखीही भाग आले तर प्रेक्षकांनी स्वीकारण्यात काहीही हरकत नाही कारण टेक्निकली बाहुबली हा बाहुबली पेक्षा हाताळणीत सरस वाटला मला. म्हणजेच एस एस राजामौली अनुभवांतून शिकताहेत हे नक्की. कोणतीही खोट नसलेल्या बाहुबली ला मी पाच पैकी पाच (*) देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा .  
   
 -समीर