सनी देओलचा राजकुमार
संतोषीचा नव्वदीच्या दशकातला गाजलेला सिनेमा म्हणजे घायल. त्याचा पार्ट 2 म्हणजेच सिक्वेल घेऊन आणि त्याला म्हणजेच ज्येष्ठ
पुत्र सनी देओललाच दिग्दर्शक बनवून घेऊन आलेत धर्मेंद्र. मागचा घायल हि त्यांचीच निर्मिती
आणि सिक्वेल देखील त्यांचाच. मागच्या घायल मध्ये अमरीश पुरी ची व्यक्तिरेखा प्रचंssssड
गाजली होती. एक नायक म्हणून सनी देओल प्रेक्षकांना जितका लक्षात राहिला तितकाच एक खलनायक
म्हणून अमरीश पुरी. हा सिनेमा तशी जादू करू शकेल काय? याचे उत्तर काळच देईल पण सनी
देओलने जर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण कमर्शियलि केले तर action सिक्वेन्सेस साठी
रोहित शेट्टीला एक प्रबळ प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याची प्रेक्षकांची खात्री पटते.
मागील घायल मधल्या
नायिकेच्या म्हणजेच मीनाक्षी शेषाद्रीच्या एका वाक्यावरून सिक्वेल मध्ये पूर्ण कहाणी
ओढलेली आहे. मागील घायलचा संदर्भ तितकाच एका वाक्यापुरता पण पूर्ण कहाणी उभी राहिली
तीन तासांची एका वाक्यावर. मग नव्या दमाचे तरुणाईचे प्रतिनिधी वगेरे संमिलीत करून छानपैकी
एक कहाणी यशस्वीपणे सनी देओलने उभी केली. झालेला अन्याय, अन्यायाविरुद्ध पेटलेली तरुणाई
असा माल मसाला पेरून त्यात मुख्य भूमिकेत स्वत:च असल्यावर स्वत:च्या तारस्वरातील डायलॉग
डिलीव्हरीलाही मस्तपैकी सनीने स्कोप ठेवलेला आहे. कहाणीत तरुणाईचा समावेश करून त्यांचे
अन्यायाविरुद्ध पेटून उठणे नाटकी आहे कि काय अशी प्रेक्षकांना शंका येण्याइतपत नाट्यमयता
आहे. हि शंका प्रेक्षकांना कितपत येईल/येईल कि नाही यावर सिनेमाचे भवितव्य ठरेल??
अभिनयासाठी सनी देओल
म्हणजे मागच्याच घायल १ मधला अजय मेहरा आहे पण या वेळेस बळवंत राय मागच्या भागात अन
खर्या आयुष्यातही अमरीशजीनचा मृत्यू झाल्यामुळे नाही. सनी देओल मागील भागात अन्यायाविरुद्ध
पेटलेला एक वकील असतो, तारीख पे तारीख वगेरे त्याचे संवाद आजपर्यंत प्रेक्षकांच्या
स्मरणात आहेत. या वेळेस थीम तीच असली तरी आता स्वत: दिग्दर्शक बनल्यावर कथेच्या मागणीनुसार
त्याने तरुण चेहर्यांचा कथेत समावेश केलेला आहे. पण वयाचा जो फरक पडायचा तो अजय मेहरावर
पडतोच पडतो. कथेनुसार त्याचे वय वाढलेले आहेच पण स्वत:च दिग्दर्शक असल्यावर/मुळे त्याने
जर अती-आत्मविश्वासाने आपल्या संवादांना म्हणजेच त्याच्या बाबतीत डायलॉग डीलीव्हरीला
महत्व दिलेले आहे. त्याची संवाद फेक हि काही विशिष्ट प्रसंगात चालून जाते, घायल-गदर
वगेरे काही केसमध्ये चालून गेली पण प्रत्येकच वेळेस ती चालून जाईल या आत्मविश्वासाला
मुजरा!!!! अनिल शर्मासारखा एखादाच असतो जो शून्यातून विश्व उभे करू शकतो!!!
सनी देओल स्वत:च दिग्दर्शक
आहे. पहिलाच प्रयत्न असल्यामुळे दिग्दर्शन शैलीवगेरे डीटेल्स आपण जाऊ देऊ आणि इमोशनल
म्हणजेच भावनात्मक प्रसंग साकारण्यातला अननुभवहि दुर्लक्षित करू पण एका गोष्टीचा आवर्जून
उल्लेख करावाच लागेल. आणि तो म्हणजे फायटिंग सिक्वेन्सेस अर्थात action सिवेन्सेस.
action सिवेन्सेस मध्ये रोहित शेट्टीचा हातखंडा आहे पण त्याला टक्कर कोणी देईल तर दिग्दर्शक
म्हणून भविष्यात तर सनी देओल. सनी देओलने जर टायगर श्रॉफ सारख्या फिजिकली फिट अभिनेत्याला
घेऊन जर एखाद्या चांगल्या कथेची/संगीताची जोड दिली तर कदाचित एक चांगली कथा साकारू
शकेल तो हे प्रेक्षकांना वाटून गेल्याशिवाय राहत नाही.
संगीतासाठी या वेळेस
दोन जोड्या वापरल्यात पण बाप्पिदासारखी मजा सिक्वेल मध्ये नाही हे नक्की.
घायल वन्स अगेन जर
सनी देओल आवडत असेल तर आवडण्याचा खूप चान्स आहे आणि टाईमपास करायचा असेल तर कदाचित
भ्रमनिरास होण्याचा धोका आहे. माझा झाला पण सनी देओलची दिग्दर्शन शैली मला आवडली खासकरून
action सिक्वेन्सेस म्हणून मी चित्रपटाला दोन २ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा