दम लगा के हैशा
यशराज फिल्म्सची धुरा आदित्य चोप्राने घेतल्यापासून आदित्य चोप्राने या मल्टीप्लेक्सच्या जमान्यात चित्रपटनिर्मितीच्या तंत्रात अनेक स्वागतार्ह बदल केले असून यशराज फिल्म्स आता संगीत विरहित आणि पूर्णत: कहाणीवर अवलंबून असलेल्या आशयगर्भ चित्रपट निर्मितीत आली असून या क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व आधीच्याच वेगळेपणानुसार ठसे उमटवीत आहे हे हा चित्रपट बघितल्यावर रसिकांना जाणवते हे मात्र नक्की.
आर्ट फिल्म ज्याला मराठीत कदाचित आशयगर्भ असे म्हणूया त्यात कहाणी आणि त्या कहाणीत पात्रांना असलेले दिग्दर्शन यांना अनन्यसाधारण महत्व असते. ते संबंधित पात्र जर कहाणीला नीट प्रेक्षकांपर्यंत सादर करू शकले नाहीत तर असे चित्रपट कदाचित समीक्षकांच्या दृष्टीने यश मिळवतातहि पण पदरमोड करून तिकीट काढणारे प्रेक्षक मात्र फारसं चांगले बोलत नाहीत आणि कमर्शियलि सपशेल अपयशी ठरतात असे प्रयत्न. यशराज फिल्म्सने याची काळजी घेतलेली असल्याचे बर्याच ठिकाणी जाणवून जाते, आणि तितके अनुभवी असल्यामुळे त्यांच्या कडून अपेक्षितही आहे.
याचे सगळ्यात स्पष्ट उदाहरण म्हणजे कास्टिंग अर्थात पात्र निवड. हि पात्र निवड naturally कहाणीच्या अपेक्षेनुसारच असली तरीही ती जर चुकली असती तरीही नक्कीच एक ढिसाळ प्रयत्न आपोआप बनला असता हा.पण आदित्य चोप्राने यात नक्कीच अनुभवाचे योग्य analysis करून प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत.
कहाणी:
नव्वदीच्या दशकातली कहाणी ज्यात नायक एक सामान्य मुलगा असून त्याचे ऑडियो कॅसेट्सचे दुकान असून एक सामान्य मध्यमवर्गीय घरातला व्यक्ती असून त्याचे त्याच्या मनाविरुद्ध जुळवलेले अरेंज marriage आणि शेवटी झालेला सगळ्या गुंत्याचा
शेवट अशी एक एकदम यशराजच्या इमेजपेक्षा वेगळी कहाणी असून कदाचित काही विशिष्ट वयोगटात जाणवणाऱ्या काही ज्वलंत पण सार्वत्रिक नसणाऱ्या पण असणार्या आणि हे आपण कधी ना कधी नक्कीच अनुभवलेल्या प्रश्नाला हात घालणारी हि एक कहाणी.
अभिनय:
प्रेम तिवारी (आयुष्मान खुराणा) हा तो सामान्य तरुण. दहावीही नसलेला आणि वडलांचे ऑडियो कॅसेट्सचे दुकान इमाने इतबारे चालवणारा. आयुष्यमान खुराणाची अभिनय निवड किंवा रोल करण्याची निवड (मिळालेल्या कहाण्यांपैकी) हि उत्तम असते हे विकी डोनर आणि हवाईझादा या उदाहरणामुळे प्रेक्षक नक्कीच समजून असतील. पण त्याने निवडलेल्या या भूमिकेमागे निर्माता आणि त्याचे वेगळेपण नक्कीच अवलंबून असतील असे वाटल्याशिवाय राहत नाही. कारण हिरोगिरी अर्थात प्रेम-नृत्य-फायटिंग इत्यादी काहीही करणारा नायक हा नाही. दहावी न झालेला एक सामान्य तरुण रंगवताना त्याचे आयुष्यात यशस्वी होण्यासाठीचे प्रयत्न रंगवताना आणि सोबतच लग्नाळलेला आणि लग्नासाठी काही विशिष्ट अपेक्षा बाळगणारा आणि त्या अपेक्षांची practicality पूर्णत: दुर्लक्षित करून फक्त खंडीभर अपेक्षा बाळगणारा एक निम्न मध्यमवर्गीय तरुण उत्कृष्टपणे उभा केलेला आहे आयुष्यमान खुराणाने.
संध्या वर्मा (भूमी पेडणेकर) हि मुख्य नायिकेच्या भूमिकेत असून वाढलेले वजन आणि त्या वजनामुळे आपोआप संयमित झालेल्या अपेक्षा अशी एक वेगळीच दोलायमान व्यक्तिरेखा साकारताना तिने खरोखर तिचे वेगळेपण जाणवून दिलेले आहे.
दिग्दर्शन:
भेजा फ्राय (१ आणि 2)चे लेखक शरत कटारिया दम लगा के हैया मध्ये रसिकांना दिग्दर्शक म्हणून भेटतात. आणि दोन्ही भेजा फ्राय इतकेच त्यांचे वेगळेपण आणि अस्तित्व जाणवून देतात. वास्तविक बघता हि कहाणीही थोडी विचित्र categoryत येते कारण सामान्य मुलीना लग्नाआधी आणि बायांना लग्नानंतर वजनावर केलेली गमतीतलीहि टिप्पणी चालत नाही हे आपल्याला जाणवते.पण खरोखर कुठेही प्रेक्षकांना पूर्ण चित्रपटात अशी pratyaksh टिप्पणी नायिकेवर जाणवत नाही आणि जाणवण्याइतपत अप्रत्यक्ष संदर्भ मात्र जाणवतात. मान्य असो वा नसो हा कंट्रोल दिग्दर्शकाचाच आणि याच महत्व बघताना जाणवते.
बरेचदा आपण बर्याच विजोड जोड्या प्रत्यक्ष आयुष्यात बघतो. कोणत्याही प्रकारची शारीरिक compatibility नसलेल्या. आपण लक्ष देत नाही पण लक्ष दिलं तर प्रश्न पडतो कि या जोड्या टिकल्या कश्या? या "टिकल्या कश्या" ला काहीही उत्तर नसते आणि शोधूही नये पण बनतात कश्या याचे उत्तर मिळू शकते याचा अंदाज या चित्रपटाने लागतो. असा अंदाज प्रेक्षकांना लागावा आणि कहाणी नीटपणे पडद्यावर उतरावी हि निर्मात्याची/लेखकाची अपेक्षा दिग्दर्शक आणि अभिनेत्यांची जोडी पूर्ण करते आणि दिग्दर्शन आणि अभिनयासाठी मी चित्रपटाला (४) चार * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा