हवाइझादा
विमान हा शब्द आठवायला सांगितला तर आपल्याला काय क्लिक होते?? पुरातन काळात पुष्पक विमान ज्यात प्रभू रामचंद्र सीतेला घेऊन अयोध्येला परतले पण हे जरा अतीच पुरातन झाल पण थोडं पुढे आल्यास राईट ब्रदर्सने विमानाचा शोध लावला १९०३ साली आणि मग त्या विमानाला पुढे सुधारत सुधारत आजच विमान बनलं असे आपल्याला शाळेत वगेरे समजल्याच आठवते. पण राईट ब्रदर्सने विमान शोधायच्या आठ वर्षे आधी पंडित शास्त्री आणि शिवकर तळपदे या महाराष्ट्रीय व्यक्तींनी विमान यशस्वीपणे शोधले होते पण राज्यकर्त्या इंग्रजांनी हे कधीच मान्यता देऊन जगासमोर आणले नाही. त्यामुळे त्यांना त्याचे श्रेय कधीच मिळाले नाही. हि कहाणी जनतेला/जगाला कळावी या हेतूने लेखक-पटकथा लेखक विभु पुरी नवीन चित्रपट घेऊन आलेले आहेत "हवाइझादा"
कहाणी:
शिवकर तळपदे हा एका जमीनदाराचा सुपुत्र, काहीही करत नसलेला, अक्षरश: चौथीत आठ वर्ष वगेरे दाखवून त्याची बौद्धिक पातळी हिन हे सिद्ध करण्याचा विभु पुरीचा प्रयत्न पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांच्या मनावरची पकड गमावतो. वास्तविक बघता हाच जर हेतू होता तर त्याला पूर्णत्वास नेण्याचे अनेक पर्याय होते पण हा पर्याय जमलेला नाही.
हा शिवकर तळपदे घरातला काहीही करण्यास असमर्थ व्यक्ती पुढे योगायोगाने पंडित शास्त्रींच्या (मिथुन चक्रवर्ती) संपर्कात येतो.
शात्रीजींच्या संपर्कात येउन त्याच्या जीवनाला नवीन कलाटणी मिळते. पुढे शास्त्रीजींचा मृत्यू होतो अर्थात या शिवकरच्या कृत्याने मानसिक धक्का बसून. मग शास्त्रीजींचे अपूर्ण स्वप्न विमान बनवण्याचे ते शिवकर पूर्ण करून विमान बनवण्यात यशस्वी होतो.
दिग्दर्शन:
विभु पुरींचे दिग्दर्शन लाभलेले आहे पण त्यांचे नवागतपण खूप ठिकाणी कळून येते. हा त्यांचा पहिलाच चित्रपट असूनही त्यांनी चित्रपट दिग्दर्शन स्वतंत्रपणे करण्याआधी सहायक दिग्दर्शक किंवा तत्सम एखादी भूमिका निभवायला हवी होती अनुभव मिळवण्यासाठी असे वाटून जाते. बर्याच गोष्टी खुपतात कथेतल्या, काही उदाहरणे घेऊ-१.चौथीत आठ वर्ष नापास असलेला मुला "पारा" चे दोन अर्थ शिकवण्याइतपत हुशार कसा बनतो?२. पंडित शास्त्रींचा मृत्यू त्याच्यामुळे जर होतो तर या महत्वाच्या बाबीला पुढे पूर्णपणे दुर्लक्षित कसे काय गेलेले आहे?३. gasoline चा सोर्स त्याला कुठून व कसा मिळतो? ४.पल्लवी शारदा (सितारा) सोबतच्या त्याच्या प्रेमप्रकरणात त्याला असं ठरवल्यासारख यश कसं मिळते? काहीही न करता??५.चित्रपटात देशभक्ती दाखवण्यासाठी लोकमान्य टिळकांचा समावेश दिग्दर्शकाने केलेला आहे मग त्याचे aftereffects नंतर
काय घडले हे दाखवण्याइतपत भान का बाळगले गेलेले नाही?अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या अगदी इरिटेट करतात मुळात विषय कितीही चांगला असला तरी एखाद्या हिंदी चित्रपटाला कमर्शियलि यश मिळवण्यासाठी अनेक गोष्टीना सांभाळावे लागते. हिंदीत तमिळ-तेलगु सारखी प्रेक्षक संख्या कन्फर्म नसल्यामुळे एका हिंदी चित्रपटाला सगळंच बघावं लागते आणि हे आता विभु पुरीला समजेल पण त्याला समजण्यासाठी एका चांगल्या विषयाला वाहिलेल्या चित्रपटाचा बळी मात्र जाईल.
मी हवाईझादाला पाव (१/४*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा
-समीर



