हिरोपंती
Jacki श्रॉफ पुत्र टायगर श्रॉफ व नवीन नायिका कृती सेनन यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण म्हणजे हिरोपंती
हिरोपंती अर्थात साध्या शब्दात हिरोगिरी म्हणजेच कोणत्याही कथेत एका नायकाला नायक म्हणून कराव्या लागणाऱ्या उठाठेवी.
कहाणी:
मित्रांचा एक एकमेकांना मदत करणारा ग्रुप आणि त्याचा नायक बबलू (टायगर श्रॉफ). आता या नायकाच्याच भोवती कहाणी फिरते.पोरगी पळवणे आणि ज्या मित्राने मुलगी पळवली त्या मित्राला पूर्ण ग्रुप ने मदत करणे आणि साईड-बाय-साईड त्याचभोवती नायक-नायीकेचीही कहाणी गुंफणे हे तत्व लेखक संजीव गुप्ताने पाळलेलं आहे.
अभिनय:
टायगर श्रॉफच्या रूपाने सलमान खान/ह्रितिक रोशन या तगड्या शरीरयष्टीवाल्या नायकांना मिळालेला एक शानदार प्रतिस्पर्धी म्हणजे टायगर श्रॉफ. आधी मित्रांना मदत करणे व नंतर स्वत:ची कहाणी निभावणे या दोन्ही चक्कर मध्ये त्याची अभिनय क्षमता आणि शरीरयष्टी अन फिजिकल stunts करण्याची क्षमता लोकांना कळावी हे दिग्दर्शक सब्बीर खान चे लक्ष्य व्यवस्थित पूर्ण होते.
दिग्दर्शन:
दिग्दर्शक सब्बीर खान हे निर्माता साजिद नदीयादवालाच्याच आधीच्या कम्बख्त इश्कचे दिग्दर्शक. याही वेळेस एक नवीन नायकाचे पदार्पण करवताना त्याच्या अभिनय क्षमतेवर अन शारीरिक compatibility वरून लोकांचे लक्ष्य विचलित होऊ नये हे त्यांचे लक्ष्य व्यवस्थित पूर्ण होते. अभिनय क्षमता दर्शवण्यासाठी त्यांनी अनोखे प्रयत्न केलेले आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रयत्न म्हणजे मध्यंतर होईपर्यंत नायक नायिकेचा एकमेकांशी डायरेक्ट संपर्कच होऊ न देता फक्त अंदाजे-अंदाजे केलेली कथेची adjustment . पण टायगर श्रॉफ पुरेपूर उतरतो दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर.
संगीत:
साजिद-वाजीद जोडीच प्रसंगोचित संगीत सगळ्या गाण्यात आहे पण प्रेक्षकांवर छाप पडते Manj Musik यांच्या "व्हिस्तल बजा"
["Whistle Baja"] या गाण्यातील बासरीच्या सुरांचा. खरोखर अप्रतिम सुरवात बासरीची या गाण्यात वापरलेली आहे आणि या सुरावटीचा पार्श्वसंगीतातही चपखलपणे उपयोग केल्या गेलेला आहे.
रेटिंग:
टायगर श्रॉफच्या रूपाने हिंदी चित्रपटसृष्टीला एक नृत्यात वाकबगार व फिजिकली extravagant नायक मिळाल्याच
दाखवणाऱ्या या चित्रपटाला १.५* देईन. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

