सम्राट & कं
जर तुम्ही राजश्री प्रोडक्शनचा चित्रपट बघायला जाता तेंव्हा तीन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात १] कौटुंबिक नितीमुल्ये हा चित्रपटाचा आत्मा असतो आणि त्याच्या भोवताल कथा गुंफलेली असते २] आलोक नाथ आणि मोहनीश बेहल हे त्यात असतात ३]त्याचे संगीत हा त्याचा निर्विवादरित्या आकर्षक भाग असतो पण सम्राट & कं. आश्चर्यकारकरित्या तिन्ही गोष्टीना अपवाद ठरतात. शेरलॉक होम्स आणि त्याचा साथीदार डॉक्टर वॉटसन या दोन व्यक्तिरेखांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचे हिंदीत केलेले रूपांतरण म्हणजे सम्राट & कं.
वास्तविक बघता इथेही आलोक नाथ साठी आणि मोहनीश बेहल साठी स्कोप होता (गिरीश कर्नाड आणि गोपाल दत्तच्या जागी) पण
निर्मात्या कविता बरजात्या ज्या राजश्री प्रोडक्शनचे छोट्या पडद्यावरील प्रोजेक्ट्स सांभाळतात मुख्यत्वे त्यांना हे दोघे कास्टिंग साठी योग्य वाटले नाहीत बहुतेक. सुरवातीलाच मात्र त्यांनी निर्मात्या म्हणून सर ऑर्थर कॅनोन डायल यांचे आभार मानलेले आहेत.
कहाणी:
मिस्टरी स्टोरीज म्हणजेच रहस्य कथा या संकल्पनेला सावरणारे एक कथानक म्हणजे सम्राट & कं. त्यातही शेरलॉक होम्स आणि त्याचा मित्र डॉक्टर वाटसन हे दोघ पडद्यावर चितारणे हे लक्ष्य त्यामुळे सिनेमात दोन्ही व्यक्तिरेखा हिंदी पद्धतीने. आणि त्यातही हिंदी प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युजन न होता सगळे नीट पचनी पडावे हा लेखक/दिग्दर्शक कौशिक घातक यांचा प्रयत्न. या प्रयत्नात
मंदावलेली पटकथेची गती हि गोष्ट या चित्रपटाच्या कमर्शियल performance वर निश्चितपणे असर करेल हे नक्की.
अभिनय:
एस टी डी (सम्राट तिलक धारी) हि नायकाची मुख्य व्यक्तिरेखा राजीव खंडेलवालने निभावलेली आहे. पण कुठेही तो कमी पडत नाही. शेरलॉक होम्सला हिंदीत साकारणे म्हणजे त्याची analysis पॉवर/observation पॉवर आणि conclusion पॉवर यांचा योग्य मेळ लेखकाला अपेक्षित पद्धतीने साकारणे. आणि या कसोटीवर राजीव खंडेलवाल पुरेपूर उतरतो. त्याची observe करून निष्कर्षावर येण्याची पद्धत प्रेक्षकांना पटते.
दिग्दर्शन:
कौशिक घातक यांचा वापर निर्मात्याने दिग्दर्शक म्हणून केलेला आहे. कौशिक घातक हे छोट्या पडद्यावरील एक नाव. राजश्रीच्याच या आधीच्या एक "एक विवाह ऐसा भी" चे दिग्दर्शक. तेच इथे लेखक आणि पटकथेतही सहलेखक. थोडक्यात ऑल इन वन package . पण सगळीकडे अगदी पुरेपूर उतरतात ते प्रेक्षकांच्या अपेक्षेवर. अर्थात राजीवनेही अभिनयाने त्यांना साथ तोडीस-तोड दिलेली आहे. पण त्यांना त्यांचे श्रेय हे मिळायलाच हवे. कारण एका अतिशय दुर्लभ विषयावर हिंदीत एक चित्रपट काढून तो तिकीट बारीवर चालणार नाही याचा अंदाज असूनही प्रयत्नात कसूर न करणे हे खरोखर कौतुकास्पद. याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे हॉलीवूड ची बरोबरी करताना वापरलेली पटकथा आणि प्रकाशयोजना. हाच चित्रपट जर आणखी कमी लांबीचा बनवून त्याची स्पीड थोडी वाढवली असती तर फरक पडला असता असे प्रेक्षकांना जाणवून जाते बघितल्यावर.
संगीत:
मागील वर्षी गाजलेल्या आशिकी-२ मधील संगीतकार जोडी अंकित तिवारी आणि मिथुन यांना इथे निर्मात्याने संधी दिलेली आहे.
आता एका रहस्य कथेत संगीताला मुळातच काही स्कोप नसतो पण जितका असतो तितका तितका दोघांनीही पुरेपूर निभावलेला आहे.रहस्य कथेत पार्श्वसंगीत उत्तम हवे आणि त्या कसोटीवर दोघंही फिट्ट बसतात.
का बघावा-बघू नये:
एका वेगळ्या विषयावरील एक उत्तम कलाकृती म्हणून बघण्यास काहीही हरकत नसलेला एक चित्रपट. जर तुम्हाला टिपिकल बॉलीवूड सिनेमे आवडत असतील म्हणजे प्रेम/संगीत इत्यादी तर या चित्रपटाची पटकथा फारच संथ वाटण्याची शक्यता आहे.
रेटिंग: कौशिक घातक आणि राजीव खंडेलवाल या दोघांच्याही प्रयत्नासाठी मी २ * देईन,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

