सौ.शशी देवधर (मराठी)
जेंव्हा कोणताही मराठी चित्रपट बघायला तुमचे पाय चित्रपट गृहाकडे वळतात तेंव्हा एक गोष्ट कंसीडर करायलाच हवी कि तो चित्रपट "प्रेम" या संकल्पनेवर बेतलेला असतो आणि त्याच संगीत हा त्याचा आत्मा असतो पण सौ शशी देवधर
आश्चर्यकारकरित्या त्याला अपवाद ठरतो. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणत्याही स्वरुपात हा चित्रपट प्रेम संकल्पनेच्या संपर्कात येत नाही. आणि "आर्ट फिल्म" हि संकल्पना वाटू शकते इतके ट्विस्ट आणि टर्न कहाणीत आहेत आणि तरीही प्रेमाशी संपर्क आल्याविना.या मुव्हीला माजी बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने निर्मिती करण्याची हिम्मत दाखवली हे विशेष उल्लेखनीय.
कहाणी:
मराठी सिनेमात प्रेम या संकल्पनेवर अवलंबून नसलेली एका स्त्रीची कहाणी जी आपल्या आयुष्याचे उसवलेले ठिगळ जोडायचे प्रयत्न करते आहे,एका सायकियाट्रीस्ट,एका पोलिस इन्स्पेक्टर आणि एका शिक्षकासोबत. मराठी सिनेमा "स्प्लीट personality " या अवघड विषयावर पूर्णपणे अवलंबून राहू शकतो का? उत्तर हो आणि सौ शशी देवधर हे त्याच उदाहरण. डॉ अजिंक्य वर्तक(अजिंक्य देव) यांच्या कार सोबत सौ शुभदा देवधर यांच्या अपघाताने कहाणीची सुरवात होते. आणि अनेक वळणे घेऊन सौ नीलिमा वर्तक यांच्या कहाणीने संपते. सायको थ्रिलर हा प्रकार मराठीत जवळपास नाहीच पण हा चित्रपट सुरवात करतो आहे अशी अपेक्षा एक रसिक म्हणून आपण बाळगूया. .
अभिनय:
सगळ्यात आधी सई ताम्हणकर हिचे खरोखर कौतुक. सौ शुभदा देवधर आणि सौ नीलिमा ठाकूर अश्या दोन वेगवेगळ्या साच्यातील भूमिका तिने समर्थपणे पेललेल्या आहेत.दुनियादारी मधली शिरीन किंवा इतर कोणत्याही प्रेम या संकल्पनेवरच्या भूमिकेपासून पूर्णपणे वेगळी एक सायकिक भूमिका समर्थपणे सईने निभावलेली आहे.अजिंक्य देव याचेही बर्याच काळानंतर डॉ अजिंक्य वर्तक या सायकीयाट्रीस्टच्या एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांना दर्शन घडते. आणि त्यानेही अगदी विशेष उल्लेखनीय नसली तरी समर्थपणे भूमिका पेललेली आहे. वास्तविक बघता सईची भूमिका पूर्णच फुटेज खाऊन गेली असती पण अजिंक्य देवने तसे होऊ दिलेले नाही. तुषार दळवीने देखील व्यवस्थित हाताळलेली आहे त्याची भूमिका.
दिग्दर्शन:
दिग्दर्शक अमोल शेटगे यांचे विशेष कौतुक कारण मराठी सिनेमा अक्षरश: एका वेगळ्या विषयावर बेतलेला,इतकी गुंतागुंतीची कथा असलेला आणि कोणताही अभिनयासाठी विशेष उल्लेखनीय चेहरा नसूनही त्यांनी समर्थपणे विषय पेललेला आहे.वास्तविक बघता स्वत: दिग्दर्शक पटकथा लेखनात सहलेखक त्यामुळे त्याने बरेचसे प्रसंग आधीच manage केले असतील या शंकेस वाव आहे.पण तरीही त्यांनी मराठीत एक वेगळा विषय आणून तो पेलून दाखवला म्हणून त्यांचे कौतुक करावेच लागेल.एक दिग्दर्शक हा एका सिनेमाच्या नौकेचा मुख्य captain असतो.सगळ्या चांगल्या वाईट बाबींना जबाबदार.आता सिनेमा मराठी तो हि इतका वेगळ्या धाटणीचा म्हणजे तिकीटबारीवर जास्त चालण्याची अपेक्षाच नाही तरीही प्रयत्नात कसूर न ठेवणे यासाठी विशेष दाद हि द्यावीच लागेल. वास्तविक बघता असे बरेच प्रसंग होते ज्यात दिग्दर्शक स्वत: कन्फ्युज झाला असता तर कपाळमोक्ष नक्की होता सिनेमाचा.पण अमोल शेटगे अक्षरश: पुरून उरलेत.
संगीत: मराठी सिनेमात संगीत हे लागतेच कारण गीत हे मुळात कविता वाटण्याइतक्या चपखलपणे प्रेक्षकांना "आत पोचतात". tubby - parik अशी जोडी यात निर्मात्याने वापरलेली आहे आणि ते हि याला पुरून उरतात.फक्त दोन गाणे पण ते कमी पडत नाहीत.चपखलपणे सूट होतात.गीतकार आशिष कुलकर्णी यांचेही गीतांसाठी विशेष कौतुक पण सगळ्यात शेवटी अजिंक्य देवच्या आवाजात एक कविता वाचन आहे त्यासाठी विशेष कौतुक कारण ती संगीत नसलेली कविता खरोखर उत्कृष्ट categoryत येते.
का बघावा:
मराठीत वेगळे सिनेमे बनतच नाहीत,वेगळ्या विषयाला मराठी फिल्ममेकर्स हातच घालत नाहीत,अशी चर्चा आपण बर्याचदा बघतो. या चर्चेला हा सिनेमा एक उत्तर देऊ शकतो. स्प्लीट personality या वेगळ्या विषयावरचा एक मराठी सिनेमा म्हणून हा सिनेमा नक्कीच बघावा असा आहे.
रेटिंग:पूर्ण प्रयत्नासाठी आणि सईच्या अभिनयासाठी मी या सिनेमाला ३.५* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर