जय हो
जर तुम्ही सलमान खान अभिनित एखादा चित्रपट बघायला जात असाल,तर हे लक्षात घ्यायला हवच कि त्यात फक्त आणि फक्त सलमान खानच असू शकतो,बाकी काहीही नाही आणि हा ही याला अपवाद नाही,फक्त सलमान खान बस्स बाकी काहीही नाही,सलमान आवडत असल्यास चित्रपट आवडण्याच्या शक्यता खूप पण चित्रपट नीट सर्व दृष्टीने analyse करून बघायची सवय असेल तर......
समजा तीन भाऊ आहेत,आणि मोठ्या भावाने मधल्या भावाचं एखाद अडकलेलं काम आटपून दिल आणि त्यापासून प्रेरित होऊन सगळ्यात लहान भावानेही तसाच हट्ट धरला आणि त्याच्या त्याच मोठ्या भावाने तो हट्ट पुरवण्यासाठी थोडी मेहनत घेतली तर काय होईल? जय हो तयार होतो,बाकीचे संदर्भ दबंग-१ व २. (जिज्ञासूनी संदर्भ तीन खान बंधूंशी लावावा)
कहाणी: जय अग्निहोत्री- एक एक्स आर्मीवाला. स्वभावाने तापट व इमानदार. त्याची एक adjust केलेली कहाणी म्हणजे जय हो.मेगास्टार चिरंजीवी अभिनित तेलगु चित्रपट 'स्टालिन' चा रिमेक. दक्षिणी चित्रपट म्हणजे साहजिकच नायक प्रधान व नायकाला अवास्तव महत्व वाढवून हिरोहिरी बहाल केलेली एक कहाणी.तर हा जय अग्निहोत्री काही कारणाने आर्मितुन बाहेर
पडून सामान्य नागरिकाचे जीवन जगत असलेला पण attitude आर्मिचाच असलेला.तो आर्मितुन का बाहेर पडतो हे विशद वगेरे करण्याचा दिग्दर्शक सोहेल खान याने यत्न केलेला आहे पण तो जमलेला नाही.बाय द वे,या प्रयत्नात सुनील शेट्टीचे
प्रेक्षकांना दर्शन घडून उगाचच त्याचे 'बॉर्डर' काळातले दिवस आठवून जातात आणि दिग्दर्शकाचा तो प्रयत्न नसेलही कदाचित पण तसे प्रेक्षकांना वेशभूषा-संवाद-सिन्सचा अनुक्रम वगेरे याने जाणवून जाते.
तर हा जय अग्निहोत्री इतरांना मदत करण्याची सवय असलेला. थोडक्यात मदत करण्यात समाधान मिळवणारा.
त्याची ती सवय व त्याने त्याची होणारी गृह मंत्री दशरथ सिंग (danny dengzongpa) याच्याशी झालेली भेट व त्या चक्कर मध्ये त्याने वाचवलेला मुख्यमंत्री प्रधान (मोहनीश बेहल) यांचा जीव म्हणजे "जय हो".
लेखक बघितला तर पूर्वीचा अनुभवी व यशस्वी व्यक्ती A R Murugadoss (गजिनी वाला दिग्दर्शक-लेखक) पण इकडे.......
अभिनय: अभिनयात सगळाच फोकस दिग्दर्शक सोहेल खान याने सलमान खान याच्यावर ठेवलेला आहे.आणि सलमान खान त्याला पुरून उरलेला आहे. अक्ख्या चित्रपटात फक्त एकदा ते ही सगळ्यात शेवटी शर्टलेस होतो सलमान पण त्याच्या शरीर सौष्ठवावरून प्रेक्षकांचे लक्ष विचलित होऊ नये हे दिग्दर्शक सोहेल खानचे लक्ष्य व्यवस्थित पूर्ण होते.
वास्तविक बघता दिग्दर्शक सोहेल खान याने सलमान ची एंट्रीच त्याचे सामर्थ्य असलेल्या फायटिंग सिक्वेन्स करवून
रंगत भरण्याचा प्रयत्न केलेला आहे,पण सलमानचे दुसरे एक सामर्थ्य विलक्षण संवाद फेक,याकडे दुर्लक्ष घडलेले जाणवून जाते प्रेक्षकांना बघितल्यावर. अर्थात त्याचाही प्रयत्न आहेच उदाहरणार्थ thank यु व त्याचे एक्स्प्लेनेशन पण भट्टी.....
संगीत:साजिद-वाजीद जोडी व इतर दोन नाव नसलेले संगीतकार आहेत पण भट्टी... वास्तविक बघता अभिनेत्री डेझी शाह
ही नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांची मदतनीस,त्यामुळे नृत्यात वाकबगार,दिग्दर्शक सोहेल खान यानेही याला महत्व देत तिची एंट्री गाण्याद्वारे म्हणजेच नृत्याद्वारे करवलेली आहे,पण .........
जर तुम्ही सलमान खान या व्यक्तीचे fan असाल तर तुम्हास एकदम योग्य चित्रपट बघण्यास
मी फक्त सलमान खानसाठी अर्धा १/2* देईन,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा
-समीर

