शुक्रवार, १९ एप्रिल, २०१३

एक थी डायन


एक थी डायन

एक अप्रतिम हॉरर चित्रपट.कोणत्याही हॉरर चित्रपटाची हि खासियत असते कि भीती वाटावी पण तिरस्कार वाटू नये,
त्या अपेक्षेवर पुरेपूर उतरणारी एक कलाकृती. एकता कपूर (बालाजी टेलिफिल्म्स) आणि विशाल/रेखा भारद्वाजहे निर्माते  कानन अय्यर हे दिग्दर्शक,मुख्य भूमिकेत  इम्रान हाशमी,पण सांगण्यात हा आनंद कि कोणतेही शरीर प्रदर्शन नाही,स्त्री देहाचे दर्शन नाही,इव्हन "हाश्मी खासियत"
एक किसिंग सीन पण नाही. एक छोटासा आहे पण इतक चालायचच. 

हॉरर चित्रपट म्हटल कि अति मानवीय शक्ती  त्यांचा मानवीय जीवनावर पडणारा प्रभाव हे विशद करण्यात लेखक किती यशस्वी ठरलाय यावर कहाणीच भवितव्य ठरते.पण लेखक द्वयी मुकुल शर्मा  विशाल भारद्वाज स्वत:हे यात पूर्ण यशस्वी झालेत.  इम्रान हाश्मी हा एक जादुगार. आता त्याच्या जादुगारीत हातचलाखी किती  जादू किती हे मुख्य प्रश्न लेखक दिग्दर्शकाने मुद्दाम अनुत्तरीत ठेवलेत. आणि इम्रान चा अतिमानविय व्यक्तींमध्ये नंतर समावेश करून आपोआप याच उत्तर दिलेलं आहे

हा 'बोबो'(इम्रान हाश्मी) लहानपणापासून जादूत इंटरेस्ट असलेला.तो इतका इंटरेस्ट काइतकी प्रगती त्यात का/त्याच्या जवळच्या 
लोकांचा त्यात मदतरुपीप्रतीसाद का असे अनेक प्रश्न लेखक द्वयी  दिग्दर्शकाने नंतर निकालात काढलेले आहे. हा जो बोबो असतो तो नंतर किंवा सुरवातीपासूनच एका विच उर्फ फिमेल भूत च्या संपर्कात आपोआप येतो.
 निर्मात्याने सिनेमाच्या सुरवातीलाच टायटल्स च्या हि आधी हे सांगून टाकलंय कि भूत म्हणजे फिमेल्स असा गैरसमज पसरवण्यात वाढवण्यात त्याचा काहीही हेतू नाही हि सगळी कथा काल्पनिक आहेय़ विशेष सूचनेच महत्व नंतर पटते.

बॉलिवूड हॉरर चित्रपटात पार्श्व संगीत हा 'आत्मा' असतो.उदहरणार्थ फक्त एक 'खुट्ट' पण त्याची इंटेनसिटी चुकली तर तो प्रसंग हास्यास्पद बनायला वेळ लागत नाही. पण संगीतकार विशाल भारद्वाजने  ने ती जबाबदारी समर्थपणे निभवून सिनेमाला हास्यास्पद होण्यापासून वाचवलेलं आहे     
          . 
एका भूमिकेत कोंकणा सेन-शर्मा व हुमा कुरेशी ने हि छाप सोडलेली आहे 

बॉलीवूड चित्रपट सृष्टीत असलेला हॉरर चित्रपटाचा सुकाळ लक्षात घेता एक खरोखरच उत्तम चित्रपट असे मी म्हणेन मी याला चार 4* देईन,बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा

-समीर       

गुरुवार, ४ एप्रिल, २०१३

टीव्ही वरची धूळ

टीव्ही वरची धूळ
नेहमीच्या भांडणाला कारण मिळाल
पण देव-दयेने त्याच टीव्हीतल्या सासू-सुना योग्यवेळी भांडल्या 
अन त्या रोजच्या भांडणात 
आमच भांडण विरलं 

तीच वाढत वजन 
आमच्या भांडणाला पुन्हा एक कारण बनल 
पण त्याच वेळी पिझ्झा हट वाल्यांची 
फ्री होम डिलिव्हरी मी स्मरली 
अन आमच भांडण विरलं 

फिरायला जाऊया म्हणे 
गमतीत गाडी पेट्रोल पंपावर टाकली 
नेहमीचं भांडणाला कारण बनलं 
अन त्याच वेळी नेमका गाडीनी ड्रायचा दिवा लावला 
त्या क्षीण प्रकाशात 
आमच भांडण विरलं 

आमच्या भांडणाच सदाहरित कारण 
तिच्या दिसण्यावर मी दिलेली कॉमेंट 
पुन्हा एकदा कारण बनल 
पण नेमका त्याच वेळी आय सर्जन मित्राचा फोन यावा 
तिच्या डोळ्यांची त्याने चौकशी करावी 
भौजींच्या त्या चौकशीत आमच भांडण विरलं

तिचा नि माझा 
स्वयंपाक घरातला प्रवेश 
दिसण्या इतकच आमच्या भांडणच सदाहरित कारण बनल 
पण नाही म्हटल तरी पंजाब्यांच कौतुक 
त्यांनी सगळीकडे धाबे काढले 
त्या प्लान मध्ये 
आमचं भांडण विरलं 

-समीर