शिवाय
अभिनेता अजय देवगण हे आता दिग्दर्शक बनले असून कारकिर्दीतील या नव्या टप्प्यात प्रेक्षकांसाठी एक नवीन कलाकृती घेऊन आले असून, शिवाय हे त्याचे नाव. कोणत्याही नवीन दिग्दर्शकाची पहिली कलाकृती जेंव्हा प्रेक्षक बघायला जातात तेंव्हा दिग्दर्शकांचे मूळ कल्पनेशी\कहाणीही\कन्सेप्टशी एकनिष्ठ राहण्याच्या प्रयत्नात कहाणीची होणारी वाताहत हा एक कॉमन सिन असतो. कौतुकास्पदरित्या अजय यातून सुटला असून एका वेगळ्या पण कदाचित मेनस्ट्रीम चित्रपटांशी फटकून असणाऱ्या कहाणीही एकनिष्ठ राहूनही अन मुख्य अभिनेता असूनही त्याची कहाणीवरील पकड अजिबात ढिली होत नाही.
शिवाय हा एक गिर्यारोहण प्रशिक्षक, त्याचे एका विदेशी युवतीशी फुललेले प्रेम अन त्याच्या मुलीचे विदेशी गुन्हेगारांकडून/अंग-तस्करांकडून झालेले अपहरण अन त्याने केलेला तिचा बचाव अशी एकदम वेगळीच कहाणी शिवाय मध्ये बघायला मिळते
अजय देवगण यात मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक दोन्हीहि असून, दोन्ही आघाडयांवर पुरेपूर प्रेक्षकांच्या पसंतीस तो उतरतो. शिवाय म्हणून त्याचे गिर्यारोहण प्रशिक्षक म्हणून वर्तन असो\ प्रेमाच्या आघाडीवर फुललेले रूप असो\ मुलीला वाचवताना व्याकुळलेला बाप असो सर्व आघाडीवर त्याच्यातील अभिनेता प्रेक्षकांची निराशा करत नाही हे नक्की. वास्तविक बघता काही स्टंट्स इतके अचाट आहेत सिनेमातले कि एक दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीही लाजावा. पण ज्या शिताफीने तो ते निभावून नेतो ते खरोखर कौतुकास्पद आहे. बाकी सगळे जाऊ देऊ पण सिनेमातील त्याच्या एंट्रीलाच जो ज्या पर्वतावरून उडी मारतो गिर्यारोहण प्रशिक्षण संदर्भात (ज्यामुळे त्याला आर्मीची ऑफर मिळते) ते शूटिंग हे प्रेक्षकांना समजत असूनही त्याचे चित्रीकरण ज्या जबरदस्तरीतीने करण्यात आले आहे ते बघून एखाद्या हॉलिवूड वाल्यानेही इम्प्रेस व्हावे. या चित्रिकरणात संगणकाचा हात किती असावा हा भाग वेगळा पण हिंदी प्रेक्षकांसाठी हा अनुभव शब्दश: "अचाट" या कॅटेगरीत येतो हे नक्की. त्याचा फिजिकल फिटनेस या त्याच्या एन्ट्रीमुळेच प्रेक्षकांना तो पटवून देतो जो पुढे रजनीकांत लाजेल असे स्टंट्स कहाणीत असूनही प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवतो अन हसवत नाही.
त्यानंतर त्याचे एक बाप म्हणून व्याकुळ होणे अन मुलीच्या शोधार्थ धावपळ करणे हे प्रेक्षकांना पटणे महत्वाचे होते कारण नाही म्हटले तरी त्याचे त्याच्या पत्नीपासून वेगळे होण्याचे कारण भारतीय प्रेक्षकांना पचण्यासारखे नव्हते. हे कारण प्रेक्षकांनी इग्नोर करावे अन नंतरच्या त्याच्या धावपळीकडे\अभिनयाकडे लक्ष द्यावे असा त्याचा हेतू असावा. त्यात अजय देवगण एक दिग्दर्शक म्हणून पूर्णतः यशस्वी होतो हे नक्की.
अजय देवगण हा ऍक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचा मुलगा, त्यामुळेच कि काय कदाचित पण एक वेगळा असा ऍक्शन डायरेक्टर सिनेमात नसूनही दक्षिणेकडील अभिनेते लाजतील असे शानदार ऍक्शन सिक्वेन्सेस\स्टंट्स शिवाय मध्ये आहेत. परममित्र रोहित शेट्टीकडील प्रोजेक्ट्स मध्ये ऍक्शन वर असणारा भर यातून आपोआप धडा शिकल्यामुळे कि काय कदाचित पण यांचे चित्रीकरण अप्रतिमरीत्या झालेले आहे.
एका चित्रपटाला वाहिलेल्या खानदानातील व्यक्ती असूनही आपल्या पहिल्याच दिग्दर्शनाच्या व्हेंचरचा मुहूर्त अजयने चुकवावा हे दुर्दैवी पण असे घडलंय खरं. आर्ट फिल्म या संकपनेकडे वळणारे चित्रपट दिवाळीत आणू नये कारण प्रेक्षकांची उत्सवी मानसिकता विरोधात जाण्याची पुरेपूर शक्यता असते, असा आजवरचा प्रॅक्टिकल अनुभव आहे. मला हा चित्रपट अजय देवगण चे दिग्दर्शन अन अभिनय दोन्हीसाठी आवडला म्हणून मी "शिवाय" ला 3 1/2* (साडे तीन) स्टार देईन पाचपैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
