रमा-माधव (मराठी)
२० वर्षापूर्वी स्वामी या मालिकेतून "रमा" या भूमिकेने अभिनेत्री म्हणून पदार्पण करणाऱ्या मृणाल कुलकर्णी आता दिग्दर्शक म्हणून त्याच कथेला प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आलेल्या आहेत. नुकतेच मागील वर्षी "प्रेम म्हणजे प्रेम असत" या चित्रपटाने त्यांनी दिग्दर्शक म्हणून सुद्धा पदार्पण केल. आणि आता हा त्यांचा दुसरा चित्रपट.
रमाबाई पेशवे आणि माधवराव पेशवे यांची लव्ह स्टोरी वगेरे इतिहासात प्रसिद्ध नाही (बाजीराव-मस्तानी सारखी) पण तरी त्यांनी या कथेला निवडलं आणि निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मृणालजींनी.
कहाणी:
रमाबाई व माधवरावांचा त्या कालच्या परंपरेप्रमाणे बालविवाह. मग वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी त्यांच्या शनिवारवाड्यातल्या आगमनापासून कथेची सुरवात आणि त्यांनी माधवरावांसोबत सदेह सती गेल्याच्या कथेवर शेवट. त्या दोघांच्या सहवासावर आणि सहवासातून फुलणाऱ्या प्रेमावर कथावस्तू टायटलनुसार डिपेंड असेल हि प्रेक्षकांची अपेक्षा लेखक व दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी पूर्ण करू शकत नाहीत. पानिपतचा पराभव अन त्या युद्धात झालेली सदाशिवराव भाऊ अन विश्वासराव यांची हानी याचा समावेश कहाणीत आपोआप होतो. नव्हे करावाच लागतो कारण त्या शिवाय कहाणी पुढे सरकत नाही. पण सदाशिवराव भाऊंचा एक तोतया
पुढे माधवारावांपर्यंत पोचतो आणि सदाशिवराव असण्याचा दावा करतो या क्षुल्लक गोष्टीचा कहाणीत का समावेश केला असावा हे प्रेक्षकांना कळत नाही. राक्षसभुवनची लढाई अन निजामाविरुद्ध मिळवलेला विजय या गोष्टीला जरा जास्तच महत्व दिल्या जाऊन अमराठी प्रेक्षकांचा समज माधवरावांच contribution फक्त तितकच आहे कि काय अशी होईल अशी शंका येते. राजयक्ष्मा किंवा स्टमक कॅन्सर याची सरमिसळ होण्याइतकी दोन्ही संकल्पनाची सरमिसळ आहे.
अभिनय:
लहानगी रमा म्हणून श्रुती कार्लेकर हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेले आहे. आणि दिग्दर्शकाने हे ओळखून तिला व्यवस्थित हाताळलेल आहे.प्रसाद ओक यांनी साकारलेल्या अप्रतिम राघोबा दादांचा उल्लेख करावाच लागेल. अप्रतिम भूमिका त्यांनी निभावलेली आहे राघोबदादांची. श्रुती मराठे (राधा हि बावरी फेम) हिचेही पार्वती बाईंच्या भूमिकेतून प्रेक्षकांना दर्शन घडते.
पण आलोक राजवाडे यांचा माधवराव प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही, हे नक्की.
दिग्दर्शन:
मृणाल कुलकर्णी यांनी पदार्पणातच प्रेम म्हणजे प्रेम असत या चित्रपटात एक मोठ्या वयाची लव्ह स्टोरी हाताळली होती. थोडक्यात एक वेगळा विषय. आणि हा विषयही थोडाफार वेगळाच. पण मुळात हा विषय इतिहासावर जरा जास्तच अवलंबून असल्यामुळे आणि त्या काळातली माहिती उपलब्ध नसल्यामुळे जो फरक पडायचा तो पडतोच. उदाहरणार्थ रमाबाईंच्या सती जाण्यावर जर शेवट करायचा होता तर सती कस जातात याची माहिती कदाचित उपलब्ध नसावी त्यामुळे शेवटी २-३ ओळीत प्रेक्षकांना फक्त सांगुत शेवट केलेला आहे. राघोबादादांच्या काळ्या जादुविषयक कथेला पुढे सरकवताना सुरवातीला काळ्या जादूला समर्थन मिळावे असा निर्माता/दिग्दर्शकाचा कोणताही हेतू नाही अशी डिस्क्लेमर मात्र मिळते.
मराठीतला एक वेगळा प्रयत्न आणि रमाबाई-माधवराव या इतिहासात दुर्लक्षित असलेल्या एका जोडीला लाइमलाईट मध्ये आणण्याचा प्रयत्न असणार्या या चित्रपटाला मी २* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

