रविवार, १७ नोव्हेंबर, २०१३

गोलीयो कि रासलीला-राम लीला

गोलीयो कि रासलीला-राम लीला 

प्रथितयश दिग्दर्शक,सहपटकथा लेखक,सह संगीतकार,सह कथालेखक संजय लीला भंसाली यांचा एक न जमलेला प्रयत्न म्हणजे रामलीला. रणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांना एका सुंदरशा लव्ह स्टोरीने री-लॉंच करण्याचा एक न जमलेला प्रयत्न म्हणजे रामलीला. चित्रपटाच्या आधीच 'बेस्ड ऑन' रोमियो व ज्युलिएट अशी ठसठशीत सूचना पण प्रेम हि कन्सेप्ट सोडून त्यावर बेतण्याचा काय रोल हे कोणालाच काळत नाही. सह संगीतदिग्दर्शक असल्यामुळे (कि असूनही?) स्वत: संजय लीला भंसाली पण इस्माईल दरबारची पदोपदी आठवण करून देणारे संगीत. अगदी 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटांच्या घेतलेल्या अनेक ट्युन्स.

थोडक्यात एक फसलेला प्रयत्न.

मी १ * देईन
-समीर